अंघोळ कशी करता यावरून कळतं तुमचं व्यक्तिमत्त्व! असं ओळखा स्वतःचं स्वभाववैशिष्ट्य

तुम्ही अंघोळ कशी करता यावरून तुमचं स्वभावविश्लेषण करता येतं. काही वेळा स्वतःच्या व्यक्तिमत्त्वची जाणीव स्वतःलाच नसते. पाहा तुमचा स्वभाव आणि अंघोळ करायची पद्धत जुळते का?

News18 Lokmat | Updated On: Aug 2, 2019 10:04 PM IST

अंघोळ कशी करता यावरून कळतं तुमचं व्यक्तिमत्त्व! असं ओळखा स्वतःचं स्वभाववैशिष्ट्य

वाचून आश्चर्य वाटेल, पण तुम्ही अंघोळ कशी करता हे तुमच्या व्यक्तिमत्त्वावर अवलंबून असतं. म्हणजेच तुमचा स्वभाव आंघोळीच्या पद्धतीवरून ओळखता येतो. कसा ते वाचा खालच्या स्लाईड्समध्ये

चेहरा : स्नान करतेवेळी सर्वात आधी तुम्ही चेहरा धूत असाल तर, तुम्ही कसे दिसता किंवा तुमच्या सौंदर्याविषयी तुम्ही जागरूक आहात. समोरची व्यक्ती आपल्याबद्दल कसा विचार करते याची तुम्हाला काळजी असते. लोक तुम्हाला बघणार आहेत याची जाणीव ठेवून अंघोळ करता. म्हणून तुम्ही आधी चेहऱ्याला प्राधान्य देता.

मान आणि खांदा : अंघोळ करताना जर तुम्ही सर्वात आधी मान आणि खांदा स्वच्छ करत असाल तर नक्कीच तुम्ही मेहनती व्यक्ती आहात. तुमच्यावर कामाची जबाबदारी आणि भार आहे. तो तुम्ही अतिशय मेहनतीने पार पाडताय. काम पूर्ण करण्याची तुमची जिद्द असल्याने तेवढाच ताण आहे. सर्वांपेक्षा पुढे जाऊन तुम्हाला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा आहे.

हात आणि पाय : हात आणि पायाची सर्वात आधी निगा राखणं म्हणजे तुम्ही फार नम्र व्यक्ती आहात. तुमचं व्यक्तिमत्त्व विनम्र असून सर्वकाही जुळवून घेणं हा तुमचा स्वभाव आहे. पण आपले मुद्दे आणि मतं तुम्ही ठामपणे मांडता कारण, हात आणि पाय मजबुतीचं प्रतीक आहे.

प्रायवेट पार्ट : अंघोळ करताना सर्वात आधी तुम्ही जर गुप्तांग किंवा प्रायवेट अवयवांना जर तुम्ही स्वच्छ करत असाल तर, तुम्ही लाजाळू आहात. कोणाचंही मन तुम्हाला मोडता येत नाही. मत मांडताना तुम्ही खूप विचार करता आणि ते व्यक्त होताना संकोचता. लाजाळू स्वभाव असल्याने तुम्ही दुसऱ्यांचा ही तितकाच विचार करता. समोरची व्यक्ती दुःखी होणार नाही याची काळजी घेता.

Loading...

केस : अंघोळ करताना सर्वात आधी केस धुण्याला तुमचं प्राधान्य असेल. तुम्ही नियम, कायदा, शिस्त पाळणारे व्यक्तिमत्त्व आहात. बाकी सर्व अवयव वगळून तुम्ही थेट केस धुता म्हणजे तुम्ही खूप व्यावहारिक आहात. आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन प्रॅक्टिकल आहे.

पाठ : पाठ आधी स्वच्छ करता म्हणजे तुम्ही दुसर्‍यांवर लवकर भरवसा ठेवत नाही. याचं मुख्य कारण असं आहे की तुम्ही जीवनात फार धोके पत्करले आहेत.

छाती : तुम्ही जसं आहे त्यातच सुखी आहात. ठेविले अनंते तैसेची राहावे हे तत्त्वज्ञान तुम्हाला मान्य आहे. तुम्ही तुमचे विचार आणि मतं सरळ शब्दांमध्ये सांगणं पसंत करता. तुमचं व्यक्तिमत्व फार व्यावहारिक आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2019 10:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...