• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Mud Pack benefits: तळव्यांना या मातीचा चिखल लावल्याने मिळतात जबरदस्त फायदे, जाणून घ्या पद्धत

Mud Pack benefits: तळव्यांना या मातीचा चिखल लावल्याने मिळतात जबरदस्त फायदे, जाणून घ्या पद्धत

आपण जी माती तळव्यावर लावणार आहोत, ती माती म्हणजे मड फूट पॅक (Mud Foot Pack benefits). ही माती विशेष प्रकारची आहे, जी खोल जलाशय किंवा तलावाच्या तळातून काढली जाते आणि नंतर शुद्ध केली जाते.

 • Share this:
  मुंबई, 19 नोव्हेंबर : आपल्या शरीरात टॉक्सिन्स वाढल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात. ज्याचा प्रभाव मनावर, त्वचेवर आणि शरीरावर पडतो. ते काढून टाकण्यासाठी शरीराला डिटॉक्स करणं फार महत्वाचं आहे. म्हणूनच बॉडी डिटॉक्स करण्याचा एक चांगला उपाय जाणून घेऊयात. तळव्यांना विशेष प्रकारचा चिखल (Mud) लावून तुम्ही शरीराला डिटॉक्स करू शकता. याबाबत 'झी न्यूज'ने माहिती दिली आहे. एवढेच नाही तर तुम्हाला यातून 3 जबरदस्त फायदे (Mud Pack benefits) मिळतील. त्याबद्दलही जाणून घेऊया. तळव्यांना कोणती माती लावावी? आपण जी माती तळव्यावर लावणार आहोत, ती माती म्हणजे मड फूट पॅक  (Mud Foot Pack benefits). ही माती विशेष प्रकारची आहे, जी खोल जलाशय किंवा तलावाच्या तळातून काढली जाते आणि नंतर शुद्ध केली जाते. या मातीमध्ये असे गुणधर्म आणि घटक असतात, जे तळव्यांच्या माध्यमातून तुमच्या शरीरातील विषारी घटक काढून टाकते. मड फूट पॅक कसा लावायचा मड फूट पॅक बाजारातून सहज खरेदी करता येतो. तसेच मड फेस पॅक पायाच्या तळव्यावरच लावता येतो. सर्व प्रथम तळवे साबणाने स्वच्छ धुवा. यानंतर पॅकमधून माती काढून टाका आणि तळव्यांवर चांगली लावा आणि नंतर किमान 30 मिनिटे कोरडे होऊ द्या. यानंतर तळवे स्वच्छ पाण्याने धुवा. जर तुम्हाला मड फेस पॅक मिळत नसेल तर तुम्ही घरच्या घरी मुलतानी माती वापरू शकता. मुलतानी मातीनेही तुम्हाला हे सर्व फायदे मिळतील. जर तुम्हाला मुलतानी माती देखील वापरायची नसेल तर तुम्ही बाजारात उपलब्ध असलेले शीट मास्क देखील वापरू शकता. हे वाचा - Mental health: डिप्रेशनमध्ये जाण्याची ही असतात लक्षणं; त्यातून बाहेर काढण्यासाठी मित्र, नातेवाईकांना अशी करा मदत मड फूट पॅक लावण्याचे 3 आश्चर्यकारक फायदे चमकदार त्वचा : जेव्हा शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात, तेव्हा त्याचा पहिला परिणाम त्वचेवर होतो. त्वचा चमकू लागते आणि मुरुम, ब्लॅक हेड्स, सुरकुत्या इत्यादी समस्या दूर होतात. शांत मन: चिकणमाती आपल्या शरीरातील विषारी घटक आणि अतिरिक्त उष्णता तळव्यांच्या माध्यमातून काढून टाकते. त्यामुळे मेंदूला थंडपणा जाणवतो आणि मन शांत होते. हे वाचा - Chemical Castration: केमिकल कॅस्ट्रेशन म्हणजे नेमकं काय? बलात्काऱ्यांना अशी दिली जाणार ही शिक्षा पायाची दुर्गंधी दूर : घाम येणं किंवा तळवे जास्त वेळ ओले राहिल्याने पायांना दुर्गंधी येण्याची समस्या उद्भवू शकते. पण मड पॅक तुमचे टॉक्सिन्स काढून टाकते आणि घामाची समस्या दूर करते आणि पायाच्या दुर्गंधीपासून सुटका मिळते. तसेच तळवे मऊ आणि सुंदर होतात.
  Published by:News18 Desk
  First published: