जिमचा व्यवसाय करून कमवा लाखो रुपये, ही आहे संपूर्ण प्रोसेस

सध्या जिमला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे, बरं इतकंच नाही तर मुळात जिम व्यवसायाची मागणीही वाढली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2018 10:38 AM IST

जिमचा व्यवसाय करून कमवा लाखो रुपये, ही आहे संपूर्ण प्रोसेस

मुंबई, 11 जुलै : आजकाल प्रत्येकालाच फिट रहायचं आहे. सुंदर दिसायच आहे. पण कामाच्या व्यापातून आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी कोणाला वेळ मिळत नाही. पण त्यातूनही फिट राहण्याच्या या स्पर्धेत उतरण्यासाठी आजकाल सगळेच जिममध्ये जातात. त्यामुळे सध्या जिमला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे, बरं इतकंच नाही तर मुळात जिम व्यवसायाची मागणीही वाढली आहे.

त्यामुळे जिमच्या व्यवसायातून आता तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. त्यासाठी जाणून कशा पद्धतीने तुन्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.

भारतात व्यायामशाळेसाठी परवाना कसा प्राप्त कराल?

जिमच्या परवण्यासाठी पोलीस एनओसीची आवश्यक्यता असते. तुम्ही आपल्या स्थानिक पोलीस खात्यामध्ये जाऊन हा परवाना मिळवू शकता. किंवा ऑनलाइन अर्जही करू शकता. आपल्या स्थानिक पोलीस खात्यामध्ये जाऊन याबद्दल आपण अधिक माहिती मिळवू शकता.

लाखो रुपये कमवण्याचा सोपा उपाय, नोकरी सोडून करा हे काम !

Loading...

भारतात तुमची जिम रजिस्टर करा?

- जर तुम्ही जिम सुरू करू इच्छित असाल तर प्रथम त्यासाठी चांगली जागा निश्चित करा. त्यासाठी होणारा खर्च आणि आवश्यक सामानाचं नियोजन करा.

- भारत सरकार आपल्याला जिमचे नोंदणीकरण प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा लिमिडेट याच फर्मने देते. हे आपल्याला प्रमोटर्सकडून सुरक्षा आणि ट्रान्सफर एबिलिटी प्रदान करते. ट्रान्सफर एबिलिटीमुळे तुम्ही तुमची जिम कधीही विकू शकता.

तुमच्या जिमची फ्रॅन्चायझी कशी उघडाल?

व्यवसाय सुरू करण्याआधी लक्षात घ्या की जिमचे दोन प्रकार आहेत. त्यामुळे फ्रॅन्चायझी जिम सुरू करण्यापूर्वी हे नक्की जाणून घ्या.

- वेट लिफ्टिंग, जिम आणि कार्डियो उपकरणंसह जिम

- फिटनेस सेंटर

अशा दोन प्रकारच्या जिम भारतात आहे. त्यामुळे या प्रकारांनुसार जिमच्या उपकराणांचं नियोजन करा आणि त्यातून ठरवा की तुम्हाला कोणत्या पद्धतीच्या जिमची फ्रॅन्चायझी उघडायची आहे. या सगळ्या माहितीनंतर तुन्ही जर जिम व्यवसाय सुरू करण्याच्या विचारात असाल तर त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा.

हेही वाचाः

फेडररच्या पदरी निराशा, 9व्या विम्बल्डन कपचे स्वप्न भंगले

वडिलांनी दिलेल्या केमिकलमुळे मायकल जॅक्सन झाला होता नपुंसक, डॉक्टरांचा नवा खुलासा

बोल्ड फोटो शेअर केल्यामुळे मान्यता पुन्हा खाणार संजय दत्तचा ओरडा?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2018 10:38 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...