मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

पालकांनो, लहान मुलांना मोबाईलचं व्यसन लागलंय? चिंता नको; अशा पद्धतीनं सोडवा पाल्यांची सवय; वाचा टिप्स

पालकांनो, लहान मुलांना मोबाईलचं व्यसन लागलंय? चिंता नको; अशा पद्धतीनं सोडवा पाल्यांची सवय; वाचा टिप्स

सोडवा पाल्यांची सवय

सोडवा पाल्यांची सवय

लहान मुलांना लागलेलं मोबाइलचं व्यसन (Adverse Effects of Technology) कसं सोडवता येईल, याबाबतची माहिती घेऊ या

मुंबई, 31 मार्च: पूर्वी दिवसाची सुरुवात भूपाळीने व्हायची; पण आता उशाशी ठेवलेल्या मोबाइलच्या रिंगटोनने जाग येते आणि नकळत मोबाइल हातात घेऊन गुड मॉर्निंगचे मेसेजेस पाहिले तरी जातात किंवा पाठवले तरी जातात. 21व्या शतकात तंत्रज्ञानाच्या विकासामुळे इंटरनेट (Internet) आणि मोबाइल फोन (Mobile Phone Addiction) या दोन गोष्टी आपल्या जीवनाचा एक अतिशय महत्त्वाचा भाग बनल्या आहेत. त्याच्या मदतीने दैनंदिन जीवनातल्या गोष्टी अगदी सोप्या झाल्या आहेत; पण या अनोख्या तंत्रज्ञानाचे (Advance Technology) काही तोटेही आहेत. मोबाइलचं व्यसन जवळपास प्रत्येकाला लागलं आहे! मोठ्या माणसांचं ठीक आहे; पण लहान मुलंही ह्याला अपवाद नाहीत. कामासाठी किंवा करमणुकीसाठी मोठी माणसं मोबाइलला चिकटलेली असल्याने लहान मुलंही फोन पाहिल्यानंतर वापरण्याचा हट्ट करू लागतात. त्यांच्यासाठी ते नक्कीच वाईट असतं. लहान मुलांना लागलेलं मोबाइलचं व्यसन (Adverse Effects of Technology) कसं सोडवता येईल, याबाबतची माहिती घेऊ या. याबद्दलची माहिती देणारं वृत्त 'झी न्यूज हिंदी'ने दिलं आहे.

पूर्वी मुलं मैदानी खेळ खेळत असत. परंतु आता मात्र लहान मुलं मोबाइलमध्ये डोकं घालून बसलेली दिसतात. पालकांनी लहान मुलांची ही मोबाइलची सवय सोडवण्यासाठी काही उपाय करायला हवेत.

मैदानी खेळ (Outdoor Games)

कोरोना विषाणूच्या साथीमुळे लॉकडाउनमुळे मुलं बराच काळ घरातच होती. त्यामुळे अनेकांना मोबाइलचं व्यसन लागलं. दरम्यान, ऑनलाइन शिक्षणामुळे मोबाइल मुलांच्या हातात आला आणि मुलांची बाहेर खेळायची सवयसुद्धा गेली. त्यामुळे मुलांना मैदानी खेळ खेळण्यास आई-वडिलांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यामुळे त्यांचं लक्ष मोबाइलवरून दुसरीकडे वेधलं जाईल.

काय सांगता! व्यक्तीच्या मृत्यूनंतरही जिवंत राहील मेंदू?; 'ही' NGO करतेय संशोधन

पुस्तकांची आवड (Reading Books)

पालकच दिवसभर मोबाइलमध्ये गुंग असतात. त्यामुळे मुलांनासुद्धा पुस्तकं वाचायला आवडत नाहीत. पालक स्वतः पुस्तकं वाचू लागले, तर मुलांनासुद्धा वाचनाची आवड निर्माण होईल. काही वेळा मुलांना पुस्तकं वाचूनसुद्धा दाखवावीत. त्यामुळे त्यांच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण करता येईल. मुलांशी सर्व विषयांवर चर्चा करणंही तितकंच गरजेचं आहे.

मोबाइलमध्ये पासवर्ड (Password in Mobile)

प्रयत्न करूनही मूल मोबाइल फोन वापरणं टाळत नसेल, तर कठोर पावलं उचलणं आवश्यक आहे. मुलांना फोन वापरता येणार नाही म्हणून मोबाइलमध्ये पासवर्ड टाकावा.

उन्हाळ्यात अन्नातून विषबाधा होण्याचं प्रमाण वाढतं; या गोष्टींची नीट खबरदारी घ्या

मुलांना निसर्गाच्या सान्निध्यात न्या (Nature Trail)

तुम्ही मुलांना निसर्गाच्या जितक्या जवळ न्याल तितकी ती मोबाइल फोनपासून दूर होतील. निसर्गाचं महत्त्व त्यांना पटवून द्या. निसर्गाच्या सौंदर्याची ओळख करून देण्यासाठी त्यांना उद्यानं, तलाव किंवा हिल स्टेशनवर न्या. त्यामुळे ती त्यात रमतील. आई-वडिलांनी प्रयत्न केले तर नक्कीच मुलांचं मोबाइलचं व्यसन कमी होऊ शकेल.

First published:

Tags: Lifestyle, Mobile, School children