ऑफिसमध्ये होणाऱ्या सततच्या टीकेपासून कसे वाचाल

अनेकदा ऑफिसमध्ये दुसऱ्यांच्या माध्यमातून अनेक गोष्टी कानावर पडत असतात. तिसरी व्यक्ती तुमच्याबद्दल काय बोलते याची माहिती तुम्हाला मिळते.

News18 Lokmat | Updated On: Aug 30, 2019 04:44 PM IST

ऑफिसमध्ये होणाऱ्या सततच्या टीकेपासून कसे वाचाल

शाळ- कॉलेजपासून ते ऑफिसपर्यंत आपले अनेक मित्र आणि सहकारी होतात. या सगळ्यांसोबत काही अशी लोकंही भेटतात ज्यांच्यामुळे तुमच्या आयुष्यात नकारात्मक उर्जा येते. या नकारात्मतेला कंटाळून तुम्ही अनेकदा चुकीचे निर्णय घेतो ज्याचा पश्चाताप नंतर होतो. शाळा- कॉलेज आणि ऑफिसमध्ये होणाऱ्या टीकेपासून कसं वाचायचं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

टीकांचं स्वागत करा- आयुष्यात यश फक्त मेहनत आणि विश्वासाच्या जोरावरच मिळतं असं नाही तर यात टीकेचीही महत्त्वाची भूमिका असते. जर तुम्ही टीकेमधून शिकून तुमचं ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा या सगळ्या गोष्टींचा तुम्हालाच सर्वाधिक फायदा होईल. तुमच्यावर टीका करणाऱ्यांचं नेहमीच स्वागत करा.

दुसऱ्यांकडून ऐकलेल्या गोष्टींचा फार विचार करू नका- अनेकदा कॉलेज आणि ऑफिसमध्ये दुसऱ्यांच्या माध्यमातून अनेक गोष्टी कानावर पडत असतात. तिसरी व्यक्ती तुमच्याबद्दल काय बोलते याची माहिती तुम्हाला मिळते. पण अशा पद्धतीच्या गोष्टी या अफवाही असू शकतात किंवा तुम्हाला त्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने सांगण्यात आलेल्या असू शकतात. त्यामुळे कोणाच्याही बोलण्यावर थेट विश्वास ठेवून स्वतःहून टीका ओढवून घेऊ नका. तिसऱ्या व्यक्तिने सांगितलेली गोष्टी एका कानाने ऐका आणि दुसऱ्या कानाने सोडून द्या.

ग्रुप करू नका- तुम्हाला हे माहीत आहे का कोणत्याही प्रकारच्या ग्रुपीझमचं मोठं नुकसान तुम्हाला भोगावं लागू शकतं. अनेकदा कॉलेज आणि ऑफिसमधले लोक अनेक ग्रुपमध्ये विभागलेले असतात. अशावेळी कोणत्याही ग्रुपमध्ये जाण्यापूर्वी सगळ्यांसोबत एकसारखं वागा. ग्रुपमुळे तुम्ही स्वतः तुमच्या टीकाकारांना बोलण्याची संधी देता.

टीकेचं कारण जाणून घ्या- अनेकदा जवळचे मित्रच आपले शत्रू होऊन जातात. यानंतर तुम्हाला त्यांच्या टीकेचा सामना करावा लागतो. अशावेळी संबंधित व्यक्तीसोबत वादात अडकण्यापेक्षा तुमच्यात काय कमतरता आहे आणि समोरच्याची वागणूक कशी आहे याचं निरीक्षण करा. अशी व्यक्ती भविष्यात तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

Loading...

आयुर्वेदानुसार या गोष्टी कधीही एकत्र खाऊ नयेत, शरीराचं होतं नुकसान

Vastu: लग्नाला होतोय उशीर तर हे 6 उपाय करून पाहा, एका महिन्यात मिळेल परिणाम

चुकूनही पार्टनरला विचारू नका हे 6 प्रश्न, नात्यात येऊ शकतो दुरावा

SPECIAL REPORT : काश्मीर मुद्यावरून संरक्षणमंत्र्यांनी पाकला चांगलंच ठणकावलं, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 02:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...