Home /News /lifestyle /

ऑक्सिजन निर्मितीत अडचणी; जाणून घ्या कच्च्या मालासह, प्लांटसाठी किती खर्च लागतो

ऑक्सिजन निर्मितीत अडचणी; जाणून घ्या कच्च्या मालासह, प्लांटसाठी किती खर्च लागतो

देशात ऑक्सिजनचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असलं, तरी मागणीपेक्षा कमीच आहे. ऑक्सिजन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध नसल्याने ऑक्सिजन निर्मितीत अडचणी येत आहेत.

नवी दिल्ली, 26 एप्रिल : देशात कोरोनाबाधितांची आणि मृतांची संख्या दररोज उच्चांक गाठत आहे. गेल्या एका आठवड्यापासून देशात दररोज 3 लाखांपेक्षा अधिक रुग्णांची वाढ होत आहे. अनेक रुग्णांना बेड्स मिळत नाही, तर अनेकांना ऑक्सिजन. ऑक्सिजनअभावी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये रुग्णांचे प्राण जात आहेत. श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या रुग्णांसाठी ऑक्सिजनची मागणी वाढत आहे. देशात ऑक्सिजनचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असलं, तरी मागणीपेक्षा कमीच आहे. ऑक्सिजन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध नसल्याने ऑक्सिजन निर्मितीत अडचणी येत आहेत. टीव्ही9 ने दिलेल्या वृत्तात, एका अहवालानुसार, सद्यस्थितीत देशात लहान आणि मध्यम स्वरुपाचे 300 प्लांट, तसंच 25 मोठे प्लांट असून तिथे ऑक्सिजन, नायट्रोजन आणि ऑर्गन गॅस बनवले जातात. या प्लांटमध्ये तयार होणाऱ्या गॅसला पाईपलाईन, क्रायोजेनिक ट्रान्सपोर्ट अथवा सिलेंडरच्या मदतीने रुग्णालयात पोहचवण्यात येतं. भारतात ऑक्सिजन निर्मिती आणि बाजारपेठांची काय स्थिती आहे? भारतातील गॅसची बाजारपेठ - एका रिपोर्टनुसार, भारतात सध्या 3 हजार कोटी रुपयांची गॅस इंडस्ट्री आहे. देशात कारखाने आणि रुग्णालयांची संख्या जसजशी वाढेल तेवढ्याच झपाट्याने ऑक्सिजनची मागणी वाढेल. मात्र, सध्या देशातील कोरोनाची परिस्थिती आणि ऑक्सिजनची मागणी पाहता सरकारला प्राधान्याने ऑक्सिजन प्लांट (oxygen plant) उभारावे लागणार आहेत.

(वाचा - तुमच्या फक्त 30 मिनिटांनी कोरोनाचा धोका 30 टक्के होईल कमी)

कच्च्या मालाच्या कमतरतेमुळे अनेक कंपन्या बंद - देशात सध्या ऑक्सिजनची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, ती मागणी भरून काढण्यासाठी ऑक्सिजन निर्मिती करण्यासाठी आवश्यक तेवढा कच्चा माल उपलब्ध नाही. त्यामुळे देशातील जवळपास 12 कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, असं वृत्त 'बिझनेस टूडे'ने दिलं आहे. ऑक्सिजन प्लांटसाठी लागणारा कच्चा माल - अनेक ऑक्सिजन प्लांट्सना सरकारने उत्पादन वाढवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, तेवढा कच्चा माल पुरवला जात नाही. त्यामुळे उत्पादनात अडचणी येत आहेत. प्लांटमध्ये ऑक्सिजन गॅसला लिक्वीड आणि गॅस दोन्ही रुपांत तयार केले जाते. ऑक्सिजन निर्मितीसाठी सर्वाधिक हायड्रोजन पेरॉक्साइचा वापर केला जातो. यासोबतच हवा, लुब्रिकेंट्स, ग्रीस, कॅटलिस्ट आणि इतर केमिकल्सची गरज असते. या सर्व केमिकलचा वापर करून मेडिकल ऑक्सिजन तयार केला जातो.

(वाचा - ऑक्सिजनची पातळी कमी होतेय? Oxygen ची व्यवस्था होईपर्यंत करा हा उपाय)

ऑक्सिजन प्लांटसाठी येणारा खर्च - एका वर्षात 20 हजार मेट्रिक टन ऑक्सिजन अथवा नायट्रोजन गॅस बनवण्यासाठी 2 एकर जमिनीवर प्लांट उभारायचा असेल, तर त्यासाठी 45 कोटी रुपयांचा खर्च येईल. प्लांटसाठी येणारा खर्च गुवाहाटीतील एमएसएमई डेव्हलपमेंट इन्स्टिट्युटच्या एका प्रोजक्ट पेपरच्या आधारे सांगण्यात आला आहे. एवढा मोठा प्लांट चालवण्यासाठी दररोज तब्बल 2 लाख लीटर पाणी, प्लांटसाठी 3.5 मेगा वॅट विजेचा प्लांट आणि 133 किंवा 132 केव्हीचा एक फीडर बसवावा लागेल.
First published:

Tags: Coronavirus, Oxygen supply

पुढील बातम्या