मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुमचा विश्वास बसणार नाही पण, आपलं शरीर एक पूर्ण रेजर ब्लेड पचवू शकतं!

तुमचा विश्वास बसणार नाही पण, आपलं शरीर एक पूर्ण रेजर ब्लेड पचवू शकतं!

मानवी शरीर अनेक चमत्कारिक गोष्टींनी भरलेलं आहे की, बहुतेक लोकांना त्याच्याबद्दल माहितीही नसते. इतकेच काय तर आपण काय करू शकतो, आपल्या क्षमतेचीही आपल्याला जाणीव नसते.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : मानवी शरीर अनेक प्रकारे चमत्कारिक आहे. प्रत्येक क्षणी त्याच्या आत कित्येक घडामोडी घडत असतात. माणूस झोपलेला असो किंवा जागा असो, त्याचे अवयव, शरीर यंत्राप्रमाणे काम करत राहते. मानवी शरीर अनेक चमत्कारिक गोष्टींनी भरलेलं आहे की, बहुतेक लोकांना त्याच्याबद्दल माहितीही नसते. इतकेच काय तर आपण काय करू शकतो, आपल्या क्षमतेचीही आपल्याला जाणीव नसते. तुम्हालाही माहीत नसेल की मानवी शरीर असं आहे की, ते रेझर ब्लेड (razor blade) देखील पचवू शकतं.

ब्लेडचे कसे पचन होऊ शकते

आपल्या सर्वांना माहित आहे की मानवी शरीरात आम्ल (Acid) तयार होते. 1 ते 14 पर्यंत पीएम स्तरावर आम्ल मोजले जाते. म्हणजे पीएम पातळी जितकी कमी तितके आम्ल मजबूत असतं. मानवी पोटात आढळणारे आम्ल साधारणतः 1.0 ते 2.0 असते. म्हणजे pH पातळी खूप जास्त असते. RD.com च्या रिपोर्टनुसार, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोस्कोपी जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात वैज्ञानिकांना आढळले आहे की, मानवी पोटात आढळणारे आम्ल एक धारदार ब्लेड सहजपणे पचवू शकते.

हे वाचा - Smartphone बाबत धक्कादायक खुलासा, टॉयलेट सीटपेक्षाही खराब आहे तुमची Phone Screen; गंभीर आजारांचा धोका

फक्त 2 तासात पचन होऊ शकतं

एवढेच नाही तर या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, पोटात आढळणारे हे अॅसिड इतके मजबूत असते की, केवळ 2 तासात ब्लेड पचवू शकते. म्हणजेच लोहापासून बनवलेले हे ब्लेड 2 तासात या आम्लामध्ये विरघळून जाईल आणि मानवी शरीराला कोणतीही हानी होणार नाही.

हे वाचा - तोंडात तंबाखू असल्याने नीट साक्ष दिली नाही; संतापलेल्या न्यायाधीशांनी ठोठावला दंड

परंतु, सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, तोंडावाटे कोणी ब्लेड खाण्याचा किंवा गिळण्याचा प्रयत्न केला तर ते पोटा जाईपर्यंत शरीराचे इतके नुकसान होऊ शकते की, त्यामुळे एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे चुकूनही कधी रेजर ब्लेड खाण्याचा प्रयत्न करू नका. या बातमीत केवळ मानवाची पचन क्षमता किती मजबूत असते हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

First published:

Tags: Health, Lifestyle