Home /News /lifestyle /

कोणत्या राशीवर होणार चंद्रग्रहणाचा चांगला परिणाम; कसं असेल 12 राशींच भविष्य?

कोणत्या राशीवर होणार चंद्रग्रहणाचा चांगला परिणाम; कसं असेल 12 राशींच भविष्य?

चंद्रग्रहणाचा राशींवर परिणाम होत असतो.

चंद्रग्रहणाचा राशींवर परिणाम होत असतो.

Lunar Eclipse 2021: चंद्रग्रहणाचा राशींवर परिणाम होत असतो, अशी मान्यता आहे. यावेळी होणाऱ्या चंद्रग्रहणाचा 12 राशींवर वेगवेगळे परिणाम होणार आहेत.

    दिल्ली,26 मे : वर्षातलं पहिलं चंद्रग्रहण (Lunar Eclipse) बुधवारी लागलं. हे ग्रहण वृश्चिक (Scorpio) राशी आणि अनुराधा नक्षत्राला लागणार आहे. हे खग्रास चंद्रग्रहण असणार आहे. भारतात ग्रहणांचा  परिणाम राशींवर (Zodiac) होत असतो अशी मान्यता आहे. जाणू घेऊ या बारा राशींवर चंद्र ग्रहणाचा कसा परिणाम होणार आहे. मेष रास मेष राशीसाठी चंद्र ग्रहणानंतर थोडा चांगला काळ येणार आहे. चंद्र ग्रहण या राशीच्या आठव्या घरात लागणार आहे. या राशीच्या लोकांच्या पराक्रमात वाढ होईल.पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. वृषभ रास वृषभेच्या आर्थिक जीवनावर सर्वाधिक परिणाम होणार आहे. हे ग्रहण वृषभ राशीच्या सातव्या घरात असेल. त्यामुळे नुकसान होण्याची भीती आहे. बोलण्यात आक्रमकता येईल. (घडणार दोन Superb खगोलीय घटना! सुपरमून आणि चंद्रग्रहण दोन्हींचा अनुभव एकाच दिवशी) मिथुन रास मिथुन राशीत सहाव्या घरात ग्रहण लागणार आहे. ग्रहणामुळे या राशीवर प्रतिकुल परिणाम होईल. तणाव आणि चिंता वाढणार आहे. चिडचिड वाढल्याने वादविवादाचे प्रसंग ओढावतील. त्यामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे. कर्क रास चंद्र कर्क राशीचा स्वामी असल्याने, कर्क राशीच्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण फार महत्त्वाचं असेल. हे ग्रहण आपल्या राशीच्या पाचव्या घरावर परिणाम करेल, ज्यामुळे अनपेक्षित खर्चामध्ये अचानक वाढ होईल. प्रियकराबरोबर वाद होतील. सिंह रास चंद्रग्रहण सिंह राशीवर मिश्र परिणाम करेल. सिंह राशीच्या चौथ्या घरात प्रभाव दिसेल,त्यामुळे आर्थिक जीवनात यश मिळेल.पण, प्रेम संबंधातील काही अडचणींना सामोरं जावं लागेल. कन्या रास कन्या राशीसाठी हे चंद्रग्रहण तिसऱ्या घरात लागतंय. या राशीवर मिश्र परिणाम दिसतील. कामात यश मिळेल. पण, कौटुंबिक जीवनात, मानसिक ताणतणाव वाढण्याची शक्य आहे. तूळ रास तूळ राशीच्या लोकांसाठी हे ग्रहण थोडं प्रतिकूल असेल, राशीच्या दुसर्‍या घरात हे ग्रहण लागेल. तूळ राशीच्या धैर्यात आणि सामर्थ्यात कोणतीही कमी येणार नाही. पण,असं असूनही इतरांशी मतभेदांचा सामना कराला लागेल. वृश्चिक रास हे चंद्रग्रहण फक्त वृश्चिकेत होणार आहे,म्हणूनच या राशीसाठी हे खूप महत्वाचं ठरणार आहे. सावधगिरी बाळगण्याचा सल्ला आपल्या राशीला दिला जात आहे. कारण अपघाताचे प्रसंग उद्भवू शकतात. धनु रास चंद्रग्रहणाचा धनु राशीवर परिणाम होणार आहे. कौटुंबिक जीवनावर परिणाम दिसणार आहे. मानसिक तणाव आणि कौटुंबिक कलहांची शक्यता आहे. (चंद्रग्रहण कुठे दिसणार,यावेळी काय करावं-काय करू नये? वाचा सर्व प्रश्नांची उत्तरं) मकर रास मकर राशीत हे चंद्रग्रहण अकराव्या घरात लागणार आहे, या काळात चांगले परिणाम मिळतील. कामाच्या ठिकाणी सर्व शत्रूंपासून मुक्त व्हाल. ज्यामुळे आपली कामगिरी पूर्वीपेक्षा चांगली होईल. कुंभ रास कुंभ राशीसाठी हे चंद्रग्रहण शुभ असेल. कारण या राशीच्या दहाव्या घरात लागेल. याचा परिणाम म्हणून,सर्व विवाहितांन चांगले परिणाम मिळतील. मुलांकडून सुख मिळेल. शिक्षणामध्ये चांगली कामगिरी करतील. मीन रास मीन राशीत हे चंद्रग्रहण नवव्या घरात होणार आहे. म्हणूनच त्यांना आरोग्य समस्या निर्माण होतील. पैशासंबंधी व्यवहार जपून करावेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Moon

    पुढील बातम्या