Mission Paani: भारतातल्या मुबलक पाण्याचा सर्वोत्तम वापर कसा करता येईल? घ्या जाणून

Mission Paani: भारतातल्या मुबलक पाण्याचा सर्वोत्तम वापर कसा करता येईल? घ्या जाणून

स्वच्छ पाण्याचे अनेक अनेक स्रोत भारताकडे असले तरी फक्त नियोजन नसल्यामुळे पाणी प्रश्न हा आ वासून उभाच आहे. जर आपण ह्या स्रोतांचा योग्य उपयोग केला तर मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होऊ शकेल.

  • Share this:

नवी दिल्ली, 20 जानेवारी: भारताच्या सध्याच्या पाणीप्रश्नाचं कारण हे देशात मोठ्या प्रमाणात असलेले स्वच्छ पाण्याच्या अनेक स्रोतांमध्येच दडलेलं आहे. हे थोडंसं उपरोधिक वाटेल पण ते सत्य आहे. भारतात स्वच्छ पाण्याचे अनेक स्रोत आहेत पण दुसरीकडे पाणीवाटपाचं नियोजन नसल्याने पाणीप्रश्नही आ वासून उभा आहे. सामाजिक स्वच्छता आणि सार्वजनिक स्रोतांची काळजी घेणं याची परंपरा आपण दुर्लक्षिली आहे. जगातील एकूण स्वच्छ पाण्यापैकी 4 टक्के पाणी भारतातच आहे ते राखलं पाहिजे. या स्रोतांमध्ये देशातील सुमारे 1,869 क्युबिक किलोमीटर जमिनीवरून वाहणाऱ्या 10 हजार 360 नद्यांमधून भारताला पाणी उपलब्ध होत असतं. भौगोलिक रचना विषम पद्धतीची असल्यामुळे या सगळ्या नद्यांचं पूर्ण पाणी भारतीय वापरू शकत नाहीत पण या आकड्यांवरून भारतात किती मोठ्या प्रमाणात जलस्रोत उपलब्ध आहेत आणि योग्य व्यवस्थापन केलं तर ते किती उपयुक्त ठरू शकतं याचा अंदाज येईल.

समृद्धीची गंगा

भारतातील नद्यांची पात्रं आणि क्षमता पाहिली तर त्यातूनच लक्षात येतं की एक संधी अस्पर्शितच राहिली आहे. जरी गंगा, यमुना आणि ब्रह्मपुत्रा यासारख्या नद्यांना जनसामान्यात मातेचं स्थान असल्यामुळे त्यांच्या पात्राची काहीप्रमाणात स्वच्छता होत असली तरीही ती पुरेशी नाही. मानवी  मलमूत्र आणि औद्योगिक रसायनांमुळे या नद्यांच्या पाण्याचं होणारं प्रदूषण नदीच्या पाण्यावर चरितार्थ चालवणाऱ्यांच्या दृष्टिने अतिशय घातक आहे. या नद्यांचं आरोग्य व्यवस्थित ठेऊन पाण्याचं व्यवस्थापन केलं तर त्यांच्याभोवती राहणाऱ्या माणसांच्या आयुष्यातही चांगले बदल घडतील.

भूगर्भापासून मुख्य प्रवाहापर्यंत

भारतातील भूगर्भातील जलपातळी चांगली राखण्यातही पाणी व्यवस्थापन महत्त्वाची भूमिका बजावू शकतं. भारतात सर्वाधिक प्रमाणात जमिनीतील पाण्याचा वापर केला जातो त्यामुळे भारताचा ग्रामीण भाग पाण्याबाबतीत स्वावलंबी आहे. पण जमिनीतलं पाणी काढल्याने भूगर्भातील जलपातळी कमी होत आहे. त्यामुळे लोकांच्या आयुष्याशीच खेळ होत नाही तर शेतीच्या जमिनीची सकसता कमी होते. त्यामुळेच जमिनीतील पाण्याच्या वापरावर नियंत्रण आणणं आणि पावसाळ्यात त्याचं पुनर्भरण करणं गरजेचं आहे.

हंगामी पाण्याचा योग्य वापर

भौगोलिक बदल झाल्यानंतरही अजून भारतात पुरेसा पाऊस पडतो आणि पावसाचं पाणी वापरायला उपलब्ध असतं. प्रेसिप्रिटेशनतच्या माध्यमातून देशात एकूण सुमारे 4000 क्युबिक किलोमीटर्स इतंक ताजं पाणी भारतात दरवर्षी पावसामुळे उपलब्ध होतं. जलसंचयाची अनेक अभियानं राबवल्यानंतरही उरलेलं पावसाचं पाणी वायाच जातं. निसर्गाने देशाला दिलेली ही देणगी योग्य प्रकारे साठवून ठेवण्यासाठी अनेक पावलं उचलली गेली पाहिजेत.

हे देखील वाचा : पाण्यामार्फतही पसरू शकतो coronavirus; काय सांगतात तज्ज्ञ?

जरी भारतातील पाणीप्रश्न भीषण वाटत असला तरीही योग्य जल व्यवस्थापन आणि वैयक्तिक पुढाकाराने तो सहज हाताळता येण्याजोगा आहे. कदाचित या जलसंवर्धनाच्या सर्व कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हीच योग्य वेळ असेल.

सीएनएन न्यूज18 नेटवर्क आणि हार्पिक इंडिया यांनी एकत्रितपणे भारतातील अमूल्य जलस्रोतांचं संवर्धन आणि स्वच्छतेला जगण्याचा एक भाग बनवण्यासाठी काम करणाऱ्या ‘मिशन पानी’ या अभियानाला सुरूवात केली आहे. तुम्हीही जलप्रतिज्ञा घेऊन यात सहभागी होऊ शकता. इथे भेट द्या. - www.news18.com/mission-paani

First published: January 20, 2021, 9:07 PM IST

ताज्या बातम्या