नवी संधी मिळतील; आजचे राशीभविष्य

नवी संधी मिळतील; आजचे राशीभविष्य

12 राशींसाठी आजचा दिवस कसा आहे पाहा

  • Share this:

मेष- कौटुंबीक जीवनात मुलांसोबत वेळ घालवाल. प्रेमसंबंधांमध्ये आज मोठे वाद होतील. कठोर परिश्रम केल्यास तुम्हाला त्याचं चांगलं फळ मिळेल. भूतकाळातील घटना आणि घेतलेले निर्णय यांचा काहीसा प्रभाव आज तुमच्यावर राहण्याची शक्यता आहे.

वृषभ- आरोग्य उत्तम राहिल. खर्चावर वेळीच आवर घातला तर फायदा होईल. प्रेमसंबंधांमध्ये तणावाचं वातावरण राहिल. प्रिय व्यक्तींच्या भेटीगाठी होतील.

मिथुन- आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल. महत्त्वाचे निर्णय घेताना मोठ्यांचा सल्ला घ्या. मन चलबिचल राहिल मात्र शांत डोक्यानं काही गोष्टी अथवा निर्णय घेतल्यास फायद्याचं ठरेल.

कर्क- प्रवास होण्याची शक्यता आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असल्यानं महत्त्वाची कामं करून घ्या. मित्रपरिवारासोबत घालवलेला वेळ सत्कारणी लागेल. परिस्थितीवर पकड राहिल.

सिंह- पोटाचे त्रास पुन्हा डोकं वर काढू शकतात. आततायीपणा करू नका. तुम्हाला ज्या समस्या त्रास देत आहेत त्या लवकरत दूर होतील मात्र थोडा धीर धरणं आवश्यक आहे. आततायीपणा करून घेतलेल्या निर्णयानं अधिक गुंता वाढेल. प्रेमीयुगुलांसाठी आजचा चांगला दिवस आहे. जुन्या भेटीगाठी होतील. प्रेम मिळेल,

कन्या- नोकरदार, व्यवसायिक आणि विद्यार्थ्यांना चांगल्या संधी मिळतील. आर्थिक लाभ होईल. जोडीदाराचं कौतुक कराल. प्रेमात आपल्या बोलण्यामुळे वाद होणार नाहीत याची काळजी घ्या.

तूळ- कामाचा अधिक ताण जाणवेल. महत्त्वाची कामं कराल. नव्या क्षेत्रात संधी मिळतील. प्रेम प्रकरणांना उजाळा मिळेल. वैवाहिक जीवनात आजचा दिवस आनंदात जाईल.

वृश्चिक- हातचं राखून कौतुक करू नका. हाती घेतलेलं काम पूर्ण करा. अंगी असलेली कला आणि कौशल्याचा आपल्या कामाच्या ठिकाणी पुरेपूर वापर कराल. सुप्त गुणांना वाव मिळेल. नव्या संधी प्राप्त होतील.

धनु- चांगल्या-वाईट प्रसंगामध्ये योग्य निर्णय घेण्याचा कस लागेल.  कोणतेही धाडसी निर्णय घेण्याआधी जेष्ठांचा सल्ला आवश्यक. नको ते धाडस अंगाशी येऊ शकतं.

मकर- नकारात्मक विचारांमुळे कामात अडथळे निर्माण होतील. अशावादी दृष्टीकोन ठेवा. हाती घेतलेलं काम पूर्ण करा. आळशीपणामुळे दिवस फुकट घालवू नका.

कुंभ- आप्त  स्वकियांकडून प्रोत्साहन मिळेल. कौटुंबीक जीवनात आज थोडं तणावाचं वातावरण राहिल.

मीन- खर्च वाढेल. लोकांसोबत होणाऱ्या भेटीगाठींमधून लाभ घेता येतील. प्रेमात पडाल. प्रवास करताना सामानावर लक्ष ठेवा. कौटुंबीक जीवनात वाद होतील.

(वर दिलेली माहिती ही जोतिष्यशास्त्र आणि पंचागानुसार असून राशीभविष्यात करण्यात आलेल्या दाव्याशी News18Lokmat सहमत असेलच असं नाही.)

हेही वाचा-नाश्ता करताना या 10 गोष्टी लक्षात ठेवल्यात तर आरोग्य राहिल उत्तम

हेही वाचा-मोबाईल चोराने घेतला चावा, ब्लेड ने वार करून लांबविला मोबाईल आणि पैसे

First published: January 18, 2020, 7:33 AM IST
Tags: astrology

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading