विद्यार्थी ते व्यवसायिकांपर्यंत कसा असेल आजचा दिवस, जाणून घ्या राशीभविष्य

विद्यार्थी ते व्यवसायिकांपर्यंत कसा असेल आजचा दिवस, जाणून घ्या राशीभविष्य

12 राशींसाठी आजचा दिवस कसा आहे पाहा

  • Share this:

12 राशींसाठी आजचा दिवस कसा आहे पाहा

मेष- आर्थिक स्थिती सुधारेल. आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार आणि व्यवसायिकांसाठी आजचा दिवस जास्त कामाचा ताण असेल. प्रेमी युगुलांसाठी आजचा दिवस अनुकुल आहे. पाळीव प्राण्यांसोबत वेळ घालवल्यानं कामाचा ताण दूर होईल.

वृषभ- कामासोबतच आराम करणं महत्त्वाचं आहे. अति कामाचा ताण प्रकृतीवर जाणवू शकतो. जोडीदाराच्या निर्णयांमध्ये साथ द्याल. नव्या भेटीगाठी होतील. जोडीदारासोबत संध्याकाळचा वेळ उत्तम घालवाल.

मिथुन- नकारात्मक विचारांपासून दूर रहा. कोणतीही माहिती इतरांना देणं आज धोक्याचं ठरेल. वेळापत्रक आखून कामं करा अन्यथा कामं राहू शकतात. नोकरदार आणि विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल.

कर्क- सदसद विवेकबुद्धी जागृत ठेवून बोला. तुमच्या बोलण्यामुळे अडचण होणार नाही याची काळजी घ्या. अर्धवट कामं आज पूर्ण करण्यासाठी चांगला दिवस आहे.

सिंह- पूजा आणि धार्मिक विधींमध्ये सहभागी व्हाल. जोडीदारामुळे तुमचे नुकसान होऊ शकतं. रागावर नियंत्रण ठेवल्यानं तुमचं काम चांगलं होईल.

कन्या- आत्मविश्वास वाढेल. आजचा दिवस आशावादी राहिल. निर्णय चुकल्यास आर्थिक फटका बसू शकतो. प्रियजनांच्या भेटीगाठी होतील.

तूळ- दीर्घ आजारापासून मुक्तता मिळेल. हसत रहा तुमचं हसण्यानं बऱ्य़ाच समस्या दूर होतील. घरगुती वाद होऊ शकतात. आज गाणी ऐकल्यानं तुमचा दिवस चांगला जाईल.

वृश्चिक- आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाची काम आजच करून घ्या. प्रेम संबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल.

धनु- आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्या. खर्च जास्त मिळकत कमी अशी गत होऊ नये. आपल्या आवडत्या व्यक्तीला भेटण्याचा योग.

मकर-कामाच्या वेळा सांभाळून जोडीदाराला वेळ द्याल. अडथळ्यातून मार्ग काढाल.

कुंभ- खर्चाचं प्रमाण वाढू शकतं. आळस येईल. मात्र कामाचा कंटाळा भोवेल. मित्र परिवार, प्रेम संबंध आणि कौटुंबिक वातावरण आज चांगल असेल. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आहे.

मीन-वरिष्ठांचा सल्ला आणि भेटीगाठी महत्त्वाच्या ठरतील. व्यवसायात चांगली प्रगती होईल.

(वर दिलेली माहिती ही जोतिष्यशास्त्र आणि पंचागानुसार असून राशीभविष्यात करण्यात आलेल्या दाव्याशी News18Lokmat सहमत असेलच असं नाही.)

First published: January 17, 2020, 8:10 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading