मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

धकाधकीच्या जीवनात Mental Stress ला पळवून लावण्यासाठी गाणी ऐका; जाणून घ्या म्युझिक थेरपी

धकाधकीच्या जीवनात Mental Stress ला पळवून लावण्यासाठी गाणी ऐका; जाणून घ्या म्युझिक थेरपी

मानसिक आरोग्य (Mental Health) हा विषय खूप महत्त्वाचा बनलाय. मानसिक ताण, नैराश्य, उन्माद, स्मृतिभ्रंश, फोबियासारखे अनेक मानसिक आजार जगभरात झपाट्यानं वाढताहेत. त्यांच्याबद्दल जागरूक राहणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.

मानसिक आरोग्य (Mental Health) हा विषय खूप महत्त्वाचा बनलाय. मानसिक ताण, नैराश्य, उन्माद, स्मृतिभ्रंश, फोबियासारखे अनेक मानसिक आजार जगभरात झपाट्यानं वाढताहेत. त्यांच्याबद्दल जागरूक राहणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.

मानसिक आरोग्य (Mental Health) हा विषय खूप महत्त्वाचा बनलाय. मानसिक ताण, नैराश्य, उन्माद, स्मृतिभ्रंश, फोबियासारखे अनेक मानसिक आजार जगभरात झपाट्यानं वाढताहेत. त्यांच्याबद्दल जागरूक राहणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.

    नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर : मानसिक समस्यांविषयी जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो. मानसिक आरोग्य (Mental Health) हा विषय आपल्या जीवनात खूप महत्त्वाचा आहे. मानसिक ताण, नैराश्य, उन्माद, स्मृतिभ्रंश, फोबियासारखे अनेक मानसिक आजार जगभरात झपाट्यानं वाढताहेत. त्यांच्याबद्दल जागरूक राहणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आज आम्ही तुम्हाला मानसिक तणावाविषयी माहिती देत ​​आहोत. सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळं तणावात असते. काहींना वैयक्तिक जीवनाचा ताण आहे. तर, काहींना व्यावसायिक जीवनाचा ताण आहे. याचा थेट परिणाम लोकांच्या आरोग्यावर होत आहे. काही सोप्या तंत्रांचा वापर करून त्यांच्या मदतीनं तुम्ही मानसिक तणावातून मुक्त होऊ शकता. यापैकी एक आहे 'संगीत चिकित्सा' (Music Therapy). मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात की, म्युझिक थेरपी तुम्हाला मानसिक तणाव दूर करण्यात मदत करू शकते. ही चिकित्सापद्धती कशी कार्य करते, यासंदर्भात झी न्यूज डॉट इंडियानं मानसोपचारतज्ज्ञ डॉ. विकास खन्ना यांच्याशी केलेल्या विशेष संभाषणाचं वृत्त देत आहोत. हे वाचा - RBI ची मोठी घोषणा! इंटरनेटशिवाय ट्रान्सफर करता येणार पैसे, काय आहे Offline Payment ची योजना? म्युझिक थेरपी ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्यामध्ये डॉक्टर रुग्णांचं आरोग्य सुधारण्यासाठी संगीताचा वापर करतात. म्युझिक थेरपी ही ध्वनी निर्माण करणाऱ्या वेगवेगळ्या कंपनांची मालिका आहे. शरीर ही स्पंदनं शोषून घेताच शरीरात सकारात्मक बदल घडतात. म्युझिक थेरपी म्हणजे फक्त संगीत ऐकणं नव्हे; तर, त्यात वाद्य वाजवणं, गाणी लिहिणं आणि ऐकणंही समाविष्ट आहे. ताण कमी करण्यासाठी म्युझिक थेरपीची मदत म्युझिक थेरपी मेंदूमध्ये भावनिक क्रिया निर्माण करते. यामुळं आराम आणि विश्रांती मिळते. संगीत ऐकून मेंदूत रिवॉर्ड सर्किट तयार होतात. यामुळं आपल्याला आनंदाची अनुभूती मिळते. म्युझिक थेरपिस्ट व्यक्तीच्या आजारानुसार म्युझिक थेरपी देतात. हे 'पुनर्वसन सत्र'(Rehab Session) म्हणून काम करते. हळूहळू, एखाद्या व्यक्तीला कोणत्या प्रकारचं संगीत आवडतं, ज्याचा त्याच्या मानसिक स्थितीवर सकारात्मक परिणाम होतो, ते समजतं. अनेक संशोधनांमधून असं दिसून आलंय की, तणाव कमी करण्यासाठी आरामदायी संगीत सर्वात प्रभावी आहे. म्युझिक थेरपी मुख्यतः लयबद्ध संगीताचा वापर करते. हे वाचा - अरे देवा! कोरोनानंतर आता अज्ञात आजाराचं थैमान, थेट मेंदूवरच करतोय अटॅक; 6 जणांचा घेतला बळी तणाव दूर करणं का आहे महत्त्वाचं? आपला मेंदू आणि शरीर वेगळे नाहीत. जे परिणाम मेंदूवर होतील तेच शरीरावर होतील. ज्यांना चिंता आहे, त्यांना पोटाशी संबंधित समस्या आहेत. झोपेचा अभाव आणि लैंगिक समस्या उद्भवतात. जे लोक खूप तणावाखाली राहतात, त्यांची प्रतिकारशक्ती खूप कमकुवत होते. या समस्या टाळण्यासाठी, तणाव दूर करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. वाढत्या तणावाचा आरोग्यावरील दुष्परिणाम चिंता ही चितेसारखी असते. खरोखरच ताण-तणाव आपल्याला जाळत राहतात. यामुळं सांधे आणि स्नायूंमध्ये समस्या निर्माण होतात. यामुळं सामाजिक वर्तनात नकारात्मक बदल होतात. तणावामुळं नातेसंबंध बिघडतात आणि बराच काळ तणावाखाली राहिल्यानं काम करण्याची क्षमता कमी होते. म्हणून, वेळेतच तणाव दूर करणं खूप महत्त्वाचं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Mental health

    पुढील बातम्या