नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : ओठांची त्वचा अतिशय पातळ आणि संवेदनशील असल्यानं ओठ कोरडे होणं आणि त्यांना तडे जाणं ही बाब खूप सामान्य आहे. फुटलेले ओठ कोणत्याही वयात आणि कोणत्याही ऋतूत होऊ शकतात. पण हिवाळ्यात हा त्रास वाढतो. कोरडे आणि फुटलेले ओठ केवळ दिसायला अनाकर्षक वाटतातच. याशिवाय, ते शरीरात पाणी कमी झाल्याचं (डिहायड्रेशन - Dehydration) किंवा व्हिटॅमिनच्या कमतरतेचंही लक्षण असू शकतं. अशा काही टिप्स आहेत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही फुटलेल्या ओठांपासून मुक्त होऊ शकता आणि त्यांना मऊ-मुलायम करू (Lips Care In Winter season) शकता.
हिवाळ्यात ओठ कोरडे का दिसतात?
वास्तविक, ओठांची त्वचा चेहऱ्याच्या इतर त्वचेपेक्षा जास्त संवेदनशील असते. ती थंड वाऱ्याच्या संपर्कात येताच त्याच्यातील ओलावा कमी होऊ लागतो. त्यामुळं ओठ कोरडे दिसू लागतात.
जर तुम्हीही कोरड्या आणि फुटलेल्या ओठांच्या समस्येनं त्रस्त असाल तर, त्यांची विशेष काळजी घेऊन तुम्ही त्यांना मुलायम आणि मऊ करू शकता. यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचीही मदत घेऊ शकता. हिवाळ्यात ओठांची काळजी कशी घ्यायची, हे जाणून घेऊ.
1. आहारावर विशेष लक्ष द्या
हिवाळ्याच्या काळात आहाराकडं विशेष लक्ष दिल्यास तुमचे ओठ नेहमीच मृदू आणि मुलायम दिसतील. आहारात व्हिटॅमिन ए आणि बीनं समृद्ध अन्न खावं. यासाठी रोजच्या आहारात हिरव्या भाज्या, दूध, तूप, लोणी, ताजी फळं आणि ज्यूस घेत राहा.
3. क्रीम वापरा
हिवाळ्यात कोरडेपणा दूर ठेवण्यासाठी ओठांवर मलई, साय, लोणी किंवा देशी तूप काही वेळ हलक्या हातांनी लावा. यानं ओठांची त्वचा मऊ राहते. हिवाळ्याच्या या दिवसांमध्ये रात्री पेट्रोलियम जेली किंवा अँटीसेप्टिक क्रीम लावून झोपा.
हे वाचा -
निरोगी हृदयासाठी रात्री यावेळात झोपी जाणं आहे फायदेशीर; नवीन संशोधनातील निष्कर्ष
4. भरपूर पाणी पिणं आहे आवश्यक
आपण पाहतो की हिवाळ्यात तहान कमी लागते. असं असतानाही सतत पाणी प्यायला हवं. असं केल्यानं शरीर आणि त्वचेत ओलावा टिकून राहतो (हायड्रेट - hydrate) राहते. तसंच, ओठांच्या त्वचेतही ओलावा टिकून राहतो.
हे वाचा-
मुलीचा जोडीदार पसंत नसल्याने Honor Killing, कुटुंबीयांनी ओलांडली क्रौर्याची सीमा
5. काकडी
काकडी हा व्हिटॅमिन सीचा समृद्ध स्रोत आहे. तुमच्या ओठांना मॉइश्चरायझिंग आणि हायड्रेटेड ठेवण्यासाठी हा एक उत्तम घटक आहे. फक्त एक काकडी सोलून त्याचे पातळ तुकडे करा. हे स्लाइस काही मिनिटं ओठांवर घासून घ्या. जवळपास प्रत्येक घरात हे अगदी सहज उपलब्ध असते किंवा बाजारातही सहजपणे मिळेल.
(सूचना: ही माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.