• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Stomach Gas Relief : पोटातील गॅसची समस्या होईल कायमची गायब; घरच्या घरी करा हे सोपे 5 उपाय

Stomach Gas Relief : पोटातील गॅसची समस्या होईल कायमची गायब; घरच्या घरी करा हे सोपे 5 उपाय

पोटात गॅसच्या (Stomach Gas) समस्येने त्रस्त असलेल्या व्यक्तीला दररोज पोटदुखी, छातीत दुखणे किंवा डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागू शकतो. थोडी जागरूकता आणि नियमित दिनचर्या सुधारल्यास पोटात गॅस तयार होण्याची समस्या कायमची बंद होऊ शकते.

 • Share this:
  नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर : सध्या लोकांमध्ये कोरोनाची भीती आहे. ही भीती टाळण्यासाठी प्रत्येकजण निरोगी जीवन जगण्यासाठी विविध उपाय करत आहे. मात्र, तरीही काही समस्या असतात ज्या तुमच्या पिच्छा सोडत नाहीत. या किरकोळ समस्यांपैकी एक म्हणजे पोटात गॅस तयार (Stomach Gas Relief) होणं, जी आजच्या काळात केवळ वृद्ध लोकांसाठीच नाही तर तरुणांसाठी देखील सर्वात मोठी समस्या बनत आहे. याबाबत आयुर्वेदिक डॉक्टर अबरार मुलतानी यांनी झी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, पोटात गॅसच्या (Stomach Gas) समस्येने त्रस्त असलेल्या व्यक्तीला दररोज पोटदुखी, छातीत दुखणे किंवा डोकेदुखीचा त्रास सहन करावा लागू शकतो. थोडी जागरूकता आणि नियमित दिनचर्या सुधारल्यास पोटात गॅस तयार होण्याची समस्या कायमची बंद होऊ शकते. पोटातील गॅसेस दूर करण्याचे उपाय 1. सकाळी कोमट पाणी प्या मुलतानी यांच्या मते, जर तुम्ही नियमितपणे गॅसच्या समस्येने त्रस्त असाल, तर तुम्ही सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे. गरम पाणी प्यायल्याने पोट तर साफ होतेच पण गॅस निघणेही सोपे होते. 2. हे मिश्रण बनवा पोटातील गॅसपासून आराम मिळवण्यासाठी घरातील जिरे, ओवा, काळे मीठ आणि हिंग पावडर एकत्र करून मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण फक्त 2 ग्रॅम पाण्यासोबत दिवसातून दोन वेळा घ्या. असे केल्याने पोटातील गॅस बाहेर काढण्यात खूप आराम मिळतो. 3. 1 टीस्पून ओवा किंवा जिरे खाणे जर तुम्हाला फक्त गरम पाणी प्यायला त्रास होत असेल तर तुम्ही 1 चमचा ओवा किंवा जिरे पाण्यात उकळेपर्यंत गरम करा. पाणी पुरेसे गरम झाल्यावर ते पाणी गाळून थंड होण्यासाठी वेगळ्या भांड्यात ठेवा. त्यानंतर ते पाणी दिवसातून २ वेळा प्यावे. हे वाचा - ‘या’ वर्षापासून अयोध्येतील राम मंदिर सर्वांसाठी होणार खुले, लवकरच पूर्ण होणार पाया भरणी 4. काळे मीठ गुणकारी गॅसच्या समस्येने त्रस्त असलेल्या लोकांनी काळे मीठ घ्यावे, यामुळे पोट थंड राहतेच, सकाळी पाण्यात चिमूटभर काळे मीठ टाकून प्यायल्यास गॅसच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. पोटातील गॅसपासून लगेच सुटका मिळवण्यासाठी ही कृती उत्तम आणि सोपा घरगुती उपाय आहे. हे वाचा - बायकोनं पतीला अक्षरशः कुत्रा बनवलं; गळ्यात पट्टा घालून गावभर फिरवलं, कारण वाचून लावाल डोक्याला हात 5. या आसनाचा आहे फायदा डॉक्टर अबरार मुलतानी सांगतात की, जर तुम्हाला गॅसच्या समस्येवर कोणतेही प्रिस्क्रिप्शन वापरायचे नसेल तर तुम्ही योगाचाही अवलंब करू शकता. तुम्ही पवनमुक्तासन, पश्चिमोत्तनासन आणि कपालभाती योग क्रिया करून पोटात तयार झालेला गॅस पूर्णपणे काढून टाकू शकता, जो गॅस काढून टाकण्यासाठी उत्तम आणि प्रभावी उपाय आहे.
  Published by:News18 Desk
  First published: