Wheat Grass खा आणि अनेक आजारांपासून करा स्वतःचं रक्षण

Wheat Grass खा आणि अनेक आजारांपासून करा स्वतःचं रक्षण

कर्करोग, हृदय रोग, मधूमेह, एक्झिमा आणि सोरायसिस यांसारख्या असाधारण त्वचा रोगांवर हे गवत रामबाण उपाय आहे.

  • Share this:

गव्हांकुराचे (Wheat Grass) अनेक फायदे आहेत. फार कमी लोकांना याच्या गुणांची महती आहे. कर्करोग, हृदय रोग, मधूमेह, एक्झिमा आणि सोरायसिस यांसारख्या असाधारण त्वचा रोगांवर हे गवत रामबाण उपाय आहे. आज आम्ही तुम्हाला या  गव्हांकुराचे फायदे सांगणार आहोत.

कोलेस्ट्रॉलचं प्रमाण करतं कमी- संशोधनात हे सिद्ध झालं आहे की, गव्हांकुर खराब कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करतं. तसेच हे शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतं. यामुळेच हृदय रोगाच्या रुग्णांसाठी हे गवत अतिशय फायदेशीर आहे.

एजिंगवर लगाम लावतं- गव्हांकुरात क्लोरिफिल नावाचं एक खास घटक असतो, ज्यात सुपर ऑक्साउड डायसूटेमेज (SOD) गुणधर्म असतो. जो सुपर ऑक्साइड रेडिक्लसवर प्रभाव टाकतो. SOD मुळे सुपर ऑक्साइड रेडिक्लस हा घटक सहजरित्या नष्ट होतो. या खास गुणामुळे एजिंगच्या प्रक्रियेला उशीर होतो आणि व्यक्ती जास्तीत जास्त तरुण आणि स्वस्थ दिसू लागतो.

एक्झीमा आणि सोरायसीससारख्या गंभीर आजारांशी लढायला करत मदत-  गव्हांकुर शरीरातील आणि शरीरा बाहेरील किटाणूंना मारायचं काम करतं. गव्हांकुरामध्ये असलेले पिगमेन्ट क्लोरोफिचं वैशिष्ट्य म्हणजे जमिनीतील जवळपास 115 खनिजांपैकी 90 हून जास्त खनिज शोषून घेतं. यामुळेच गव्हांकुर हे इतर कोणत्याही रोपापेक्षा जास्त फायदेशीर असतं. लिक्वीड क्लोरोफिल शरीरातील कोशिकांमध्ये जाऊन त्यांना खराब कोशिकांना पुनरुज्जीवित करण्याचं काम करतं. यामुळे याचं मलम सोरायसिस आणि एक्झिमाला फार फायदेशीर असतं.

मधुमेहाशी करतं दोन हात- यकृतातील खराब कोशिकांना ठीक करणं आणि रक्तातील साखरेचं प्रमाण संतुलित करण्यातही क्लोरोफिलचं महत्त्वपूर्ण योगदान असतं. एवढंच नाही तर मद्यपानामुळे शरीरातील अल्कहोलचं प्रमाण कमी करणं आणि इन्सुलिनची मात्रा योग्य प्रमाणात ठेवण्याचं काम करतं.

अॅण्टी- ऑक्सिडन्टच्या गुणांमुळे कर्करोगाशी लढण्यास करत मदत- अॅण्टी- ऑक्सिडन्ट असल्यामुळे ल्यूकेमिया आणि तोंडाच्या कर्करोगासारखे असाधारण रोगांवर हे प्रभावी काम करतं. मेडिकल सायन्समध्ये आतापर्यंत याच्या गुणवत्तेबद्दल काहीही बोलण्यात आले नसले तरी आर्युवेदात केमोथेरपीच्या दुष्परिणामांपासून वाचवण्यासाठी गव्हांकुराची महती सांगण्यात आली आहे. एवढंच नाही तर कोलोन कॅन्सरपासून ते अन्य आजारांपर्यंत सगळ्यांशीच लढण्यात गव्हांकुर मदत करतं.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

स्पीकरने संसदेतच मुलाला पाजले दूध, PHOTO VIRAL

लोकांना रात्री ही 7 स्वप्न हमखास पडतात, हे आहेत त्यांचे अर्थ

घरातील प्रदुषण या 6 रोपांमुळे क्षणात जाईल, एकतरी घरी लावाच!

उत्तम सेक्स लाइफसाठी जेवणात या पदार्थांचा समावेश करा!

मुलाच्या अंगावरून गाडी गेली पण खरचटलंही नाही, श्वास रोखून धरायला लावणारा VIDEO समोर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2019 03:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading