मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Food Miss Combination : चुकूनही एकत्र खाऊ नका हे पदार्थ; होईल गंभीर दुष्परिणाम

Food Miss Combination : चुकूनही एकत्र खाऊ नका हे पदार्थ; होईल गंभीर दुष्परिणाम

Food Miss Combination : काही पदार्थ एकत्र खाल्ल्याने त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला कोणत्या गोष्टी कशासोबत खाऊ नयेत याचीही काळजी घ्यावी लागेल. अशा मिस कॉम्बिनेशन आहाराविषयी जाणून घेऊया.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 23 डिसेंबर: आपण जे काही खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. अशा अनेक गोष्टी आहेत ज्या एकत्र खाल्ल्याने आरोग्याला बरेच फायदे होतात. तर काही गोष्टी अशा आहेत, ज्या एकत्र खाल्ल्यास आरोग्याला फायदा होण्याऐवजी अनेक प्रकारे नुकसान होऊ शकते. याला सामान्यतः फूड मिस कॉम्बिनेशन (Food miss combination) म्हणतात.

आपण आहारात वेगवेगळे पदार्थ घेत असतो, त्यातील काही पदार्थ एकत्र खाल्ल्याने त्रास होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला कोणत्या गोष्टी कशासोबत खाऊ नयेत याचीही काळजी घ्यावी लागेल. अशा मिस कॉम्बिनेशन आहाराविषयी जाणून घेऊया.

दह्यासोबत या गोष्टी खाऊ नका

चांगल्या आरोग्यासाठी तुम्ही नेहमी दही खात असाल. पण, जर तुम्हाला दह्याचे चांगले फायदे मिळवायचे असतील तर तुम्ही दह्यासोबत चीज, खीर, दूध, गरम पदार्थ, काकडी, खरबूज आणि टरबूज यांचे सेवन करू नये.

या गोष्टी चहा, कॉफीसोबत खाऊ नयेत

अनेकदा लोक चहासोबत विविध पदार्थ खातात. पण चहा, कॉफी, ग्रीन टी किंवा कोणत्याही प्रकारच्या हर्बल टीसोबत तुम्ही मध, कुल्फी, आईस्क्रीम आणि कोल्ड्रिंक्स यासारख्या गोष्टींचे सेवन करू नये. त्याचा शरीरावर उलटा परिणाम होतो.

हे वाचा - वजन कमी करण्यापासून ब्लड सर्कुलेशनही राहिल नीट; हिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे आहेत इतके फायदे

या गोष्टी दुधासोबत खाऊ नयेत

सर्वसाधारणपणे दिवसातून एकदा किंवा दोनदा अनेकजण दूध पितात. मात्र, दूध पिण्याचे चांगले फायदे मिळवण्यासाठी तुम्ही दूध कधीही मासे, मीठ, मुळा, मुळ्याची पाने, मोसंबी, खरबूज, टरबूज, नारळ, कांदा, बेरीज, डाळिंब, आवळा, उडीद, सत्तू, तेलकट पदार्थ, बेलफळ, संत्री, लिंबू, करवंद, आंबट गोष्टी खाऊ नयेत.

मधासोबत या गोष्टी खाऊ नका

चांगल्या आरोग्यासाठी लोक मधाचे सेवन करतात. पण तूप, गरम दूध, इतर गरम पदार्थ, तेल, चरबी, द्राक्षे, कमळाच्या बिया आणि मुळा खाल्ल्यानंतर किंवा खाण्यापूर्वी कधीही मध खाऊ नये.

हे वाचा - Healthy Lifestyle: दिवसाची सुरुवात करताना करा या फक्त 3 गोष्टी; कधीही पडणार नाही आजारी

यासोबत पाणी पिऊ नका

तसेच काही गोष्टींसोबत पाणी पिऊ नये. एवढेच नाही तर या गोष्टी खाल्ल्यानंतरही पाण्याचे सेवन लगेच करू नये. यामध्ये टरबूज, पेरू, काकडी, शेंगदाणे, तूप, तेलकट पदार्थ आणि गरम दूध यासारख्या गोष्टींचा समावेश आहे.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:

Tags: Food, Health, Health Tips, Lifestyle