सतत मूड स्विंग होतात का.. जरा झोपेकडे लक्ष द्या!

सतत मूड स्विंग होतात का.. जरा झोपेकडे लक्ष द्या!

अनेकदा निद्रानाशचं कारण नैराश्याशी जोडलं गेलेलं असतं. पण 15 टक्के लोक नैराश्यात वेगळ्या पद्धतीने वागताना दिसतात.

  • Share this:

गरज नसताना तुम्ही राग राग करता असं तुम्हाला कधी वाटतं का.. यासोबतच तुमचे मूड स्विंगही जास्त होतात असं वाटतं का... जर तुमच्यासोबत ही समस्या वारंवार होत असेल तर तुम्हाला झोपेच्या वेळेकडे (sleep time pattern) दुर्लक्ष करू नका. जेव्हा तुमची झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित नसते तेव्हा अनेकदा अशा प्रकारचे त्रास सुरू होतात. बेटरहेल्थ वेबसाइटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सतत बदलणारा स्वभाव आणि निद्रानाश यांचा घनिष्ठ संबंध आहे. निद्रानाश या समस्येमुळे तुम्हाला मूड स्विंग होऊ शकतात आणि मूड स्विंगचा थेट परिणाम झोपेवर होतो.

अनेक दिवस जर तुम्हाला वेळेत झोप येत नसेल तर तुम्हाला आरोग्याशी निगडीत अनेक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. हृदयविकार आणि मधुमेहासारखे गंभीर आजार निद्रानाशमुळे होऊ शकतात. झोप न येण्याने किंवा कमी झोपल्यामुळे स्वभाव चिडचिडा होतो आणि गरज नसतानाही राग येतो असे काही लक्षण दिसण्यात येतात.

अनेकदा निद्रानाशचं कारण नैराश्याशी जोडलं गेलेलं असतं. पण 15 टक्के लोक नैराश्यात वेगळ्या पद्धतीने वागताना दिसतात. नैराश्यात काहींना झोप येत नाही तर 15 टक्के लोक असेही आहेत जे तणावात किंवा नैराश्यात असताना गरजेपेक्षा जास्त झोपतात.

जर तुम्हाला कधी जाणवलं की तुमचं शरीर आधीपेक्षा जास्त संवेदनशील होत आहे तर तातडीने तुमच्या झोपण्याच्या सवयींकडे लक्ष द्यायला सुरुवात करा. कोणत्याही कारणामुळे तुम्हाला शांत आणि पूर्ण झोप मिळत नसेल तर त्याचा थेट परिणाम तुमच्या रोगप्रतिकारक शक्तीवर होतो. याचमुळे निद्रानाशमुळे सर्वसामान्यपणे शरीर फार संवेदनशील होऊन जाते.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

केस कापायला गेलेल्या व्यक्तीला सतत येत होते फोन, मग रागात त्याने...

लीवर सिरोसिस आजाराशी लढतायेत बिग बी, जाणून घ्या याची लक्षणं

याहून सोप्या रांगोळी डिझाइन तुम्हाला Tiktok, Youtube शिवाय दुसरीकडे दिसणार नाहीत

आता खुशाल झोपा, कारण तुमच्या प्रत्येक समस्येवर हेच आहे उत्तर!

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 19, 2019 03:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading