लसणीबद्दलचे गैरसमज खरे की खोटे? लसूण खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

लसूण खाण्याबाबत अनेक लोकांचे समज- गैरसमज असतात. तुम्हाला हे माहीत आहे का, लसणीचा वापर पदार्थाची चव वाढवण्यासाठी होतो असं नाही, तर याही कारणांसाठी होतो.

News18 Lokmat | Updated On: Jul 21, 2019 09:15 AM IST

लसणीबद्दलचे गैरसमज खरे की खोटे? लसूण खाण्याचे हे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

मुंबई, 20 जुलै : जेवणामध्ये लसणीचा वापर हमखास केला जातो. जेवणातली चव वाढवण्यासाठी लसणाची फोडणी द्यायची पद्धत भारतात बहुतेक ठिकाणी वापरली जातेच. शिवाय लसणीची चटणी कुठल्याही पदार्थाबरोबर तोंडी लावायला असली तरी त्याची चटकदार लागते. पण कांदा- लसूण खाण्याबाबत अनेक लोकांचे समज- गैरसमज असतात. लसणीचे गुणधर्म लक्षात घेतले तर लसूण स्वयंपाकात असलीच पाहिजे. त्याचं प्रमाण आपल्याला कमी-जास्त करता येईल. पण लसूण खाण्याचे फायदे लक्षात घेतले तर तुम्हाला याचा  वापर पदार्थांमध्ये करावा याबाबत शंका राहणार नाही.

एखादी ग्रेव्ही करण्यासाठी लसूण लागतोच. पंजाबी आणि दाक्षिणात्य स्वयंपाकाचा लसूण अविभाज्य भाग आहे. पण फक्त जेवणाची चव वाढवण्याव्यतिरिक्त लसणाचे अनेक फायदे आहेत. आयुर्वेदामध्येही लसणीचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. तरीही त्याच्या उग्र वासामुळे अनेकांना लसूण आवडत नाही. दाताखाली आल्यावर लसणीची पाकळी नकोशी वाटते. पण तुम्हाला हे माहीत आहे का, लसूण शरीरासाठी किती गुणकारी आहे? जाणून घ्या लसूण खाल्याचे काय फायदे आहेत.

दातांच्या दुखण्यानं त्रासलात? हे घरगुती उपाय नक्की करून पाहा

रिकाम्या पोटी कच्च्या लसणीची पाकळी खाल्याने शरीरातील फॅट्स आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते. शरीरात चांगल्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढून हानिकारक असणाऱ्या कोलेस्ट्रॉलचं प्रमाण हळू हळू कमी होतं. लसणीची पाकळी थेट खाता येत नसल्यास तुम्ही औषधांप्रमाणे पाण्यासोबतही खाऊ शकता. हृदयासाठी लसूण फायदेशीर आहे.

उच्चरक्तदाब असेलल्या व्यक्तींसाठी भाजलेला लसूण चांगला. ब्लड प्रेशरचा त्रास असेल अशा व्यक्तींनी भाजलेल्या दोन लसणीच्या पाकळ्या नियमित खाव्यात. उच्च रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. लसणीमध्ये असणारे घटक रक्ताभिसरण सुरळीत करण्यासोबतच रक्ताच्या गाठी होण्यापासून थांबवतात. रक्तप्रवाह व्यवस्थित राहिल्याने रक्तदाबाचा त्रास कमी होतो.

Loading...

'या' सोप्या उपायांनी करा तुमच्या दिवसाची सुंदर सुरुवात

भाजलेला लसूण खाल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे लहान मोठ्या व्याधी शरीरापासून दूर राहून शरीर निरोगी आणि सुदृढ राहण्यास मदत होते. भाजलेली लसूण खाल्ल्याने हाडं बळकट होतात.

लसणीमध्ये अँटी बॅक्टेरियल तत्त्व आणि  वेदना कमी करणारी तत्त्व आहेत. त्यामुळे संसर्ग झाल्याने जर दातदुखी होत असल्यास लसणीची एक पाकळी ठेचून ती दात दुखत असेल, तिथे ठेवावी. दातदुखी कमी होण्यास मदत होईल. सर्दी, खोकला, दमा, निमोनिया अशा विकारांमध्ये लसणीचे सेवन फायदेशीर ठरते. सर्दी झालेली असेल लहान मुलांच्या गळ्यात लसणीची माळ करून घालण्याची पारंपरिक पद्धत आपल्याकडे आहे. अगदी लहान मुलांना लसूण खाता येत नाही किंवा त्यांनी उग्र लसूण खाणं योग्यही नाही. अशा वेळी सर्दी- खोकला झाला असलेल्या तान्ह्या बाळांच्या गळ्यात कच्च्या लसणीची माळ घालतात. लसणीचा वास सतत येत राहिल्याने सर्दीपासून लवकर सुटका होते.

शेतकऱ्याची गाण्यातून व्यथा मांडणारा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2019 08:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...