मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

परदेशी सेलिब्रेटींमध्ये आहे 'संस्कृत' टॅटू डिझाइनची क्रेझ, काय आहे या शब्दांचा अर्थ?

परदेशी सेलिब्रेटींमध्ये आहे 'संस्कृत' टॅटू डिझाइनची क्रेझ, काय आहे या शब्दांचा अर्थ?

प्रसिद्ध अमेरिकन सिंगर केट पेरीने देखील ‘अनुगच्छतु प्रवाह’ लिहिलेला टॅटू बनवलेला आहे.

प्रसिद्ध अमेरिकन सिंगर केट पेरीने देखील ‘अनुगच्छतु प्रवाह’ लिहिलेला टॅटू बनवलेला आहे.

प्रसिद्ध अमेरिकन सिंगर केटी पेरीने (Katy Perry) देखील ‘अनुगच्छतु प्रवाह’ लिहिलेला टॅटू काढून घेतला आहे. या टॅटूचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral on social Media) झाले आहेत.

  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 8 जून : आपल्याला जरी पाश्चात्त्य संस्कृतीची (Western Culture)आवड असली तरी, पाश्चात्य लोकांना भारतीय संस्कृतीची ओढ आहे (Western people love Indian Culture).त्यामुळेच विदेशी लोक भारतीय संस्कृतीचं अनुकरण करताना पाहायला मिळतात. भारतीय परंपारिक कपडे, भारतीयांच्या हेअर स्टाईल याची क्रेझ पाश्चिमात्य लोकांमध्ये पाहायला मिळते. गेल्या काही दिवसांपासून टॅटू काढण्याचाही ट्रेन्ड (Tattoo in Trend)सूरू झाला आहेत. त्यात परदेशी लोक संस्कृत भाषेतल्या ओळींचा अंगावर टॅटू काढत आहेत. अशाच एका संस्कृत टॅटूची क्रेझ विदेशी लोकांमध्ये पाहायला मिळत आहे.

सेलिब्रेटिंनीमध्ये भारतीय टॅटूची क्रेझ

अनेक सेलिब्रेटिंनी हिंदी किंवा संस्कृत भाषेतले टॅटू आपल्या अंगावरती बनवले आहेत. काही विदेशी लोक देवनागरी भाषेतले टॅटू देखील बनवतात. सध्या ‘अनुगच्छतु प्रवाह’हा टॅटू ट्रेंडमध्ये दिसतोय. भारताबरोबर विदेशी लोक देखील हा टॅटू बनवतात. प्रसिद्ध अमेरिकन सिंगर केटी पेरीने (Katy Perry) देखील ‘अनुगच्छतु प्रवाह’ लिहिलेला टॅटू बनवलेला आहे. या टॅटूचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल (Viral on social Media) झाले आहेत. जाणून घेऊयात या टॅटूचा नेमका अर्थ काय आहे.

(सुंदर दिसण्यासाठी वापरताय आर्टिफिशियल आयलॅश? या सूचना ठरतील उपयोगाच्या)

अनुगच्छतु प्रवाह अर्थ

‘अनुगच्छतु प्रवाह’ या शब्दाचा अर्थ प्रवाहाबरोबर पुढे जात राहणं असा होतो. त्यामुळेच अनेक लोकांना हा शब्द आवडतो आहे आणि म्हणूनच असं लिहिलेला टी-शर्ट आणि टॅटू सध्या ट्रेंडमध्ये आहेत. अनेक विदेशी सेलिब्रिटीजनी हा टॅटू बनवलेला आहे.

‘अनुगच्छतु प्रवाह’ या शब्दाचा अर्थ प्रवाहाबरोबर पुढे जात राहणं असा होतो. त्यामुळेच अनेक लोकांना हा शब्द आवडतो आहे आणि म्हणूनच असं लिहिलेला टी-शर्ट आणि टॅटू सध्या ट्रेंडमध्ये आहेत. अनेक विदेशी सेलिब्रिटीजनी हा टॅटू बनवलेला आहे.

(चहाबरोबर ‘हे’ पदार्थ आवडतं असले तरी मोह आवरा; Cancer चा धोका वाढेल)

अनुगच्छतु प्रवाह ट्रेन्ड

‘अनुगच्छतु प्रवाह’ हा टॅटू भारतामध्ये सध्या ट्रेन्डमध्ये आहे. अनेक लोक हा टॅटू आपल्या शरीरावर बनवतात आता तर, मार्केटमध्ये ‘अनुगच्छतु प्रवाह’ लिहिलेला टी-शर्ट देखील मिळाला सुरुवात झालेली आहे. विदेशी कंपन्या आपल्या वेबसाईट वर ‘अनुगच्छतु प्रवाह’ लिहिलेले टी-शर्ट चढ्या भावाने विकत आहे. तर, आता अमेरिकन सिंगर केट पेरी हिने आपल्या उजव्या हातावर एक टॅटू बनवलेला आहे. याशिवाय अमेरिकेचे कॉमेडियन ऍक्टर रसेल ब्रॅन्ड  (Russell Brand) यांनीदेखील हा टॅटू बनवलेला आहे. रसेल ‘हरे कृष्णा’ या मेडिटेशन ग्रुप बरोबर काम करतात. हरे कृष्ण हा ग्रुप भारतात देखील लोकप्रिय आहे 2010 साली पॉपस्टार कॅटी पेरीने राजस्थानमध्ये हिंदू पद्धतीने लग्न केलेलं होतं. याशिवाय ती अनेक भारतीय सण सुद्धा साजरे करते.

First published:

Tags: Tattoo, Top trending