सिंगापूर, 05 डिसेंबर : प्राण्यांना न मारताही मनसोक्त मांसाहाराचा आनंद घेता आहे. कारण आता संशोधकांनी प्रयोगशाळेतच मांस तयार केलं आहे. सिंगापूरमध्ये lab grown meat ला मान्यता देण्यात आली आहे. याला 'क्लीन मीट' (Clean Meat) असंही म्हणतात. आता बाजारपेठेत देखील या गोष्टीची मागणी जास्त वाढेल आणि ज्यांनी पर्यावरणासाठी म्हणून मांसाहार करणं बंद केलं होतं ते लोक मांसाहार देखील सुरू करू शकतील.
अमेरिकन कंपनी 'जस्ट ईट' सिंगापूरसाठी मांस तयार करणार आहे. हे मांस प्रयोगशाळेत बनल्यामुळे यासाठी प्राण्यांच्या जीव घेण्याची आवश्यकता नाही. या पर्यायामुळे आता लोकांच्या आवडीचं जेवण खाऊ शकतात. मात्र प्राण्यांना न मारता एखाद्याला मांस कसं मिळेल? तर कंपनीकडे याचंही उत्तर आहे.
यासाठी प्राण्यांच्या पेशी 1200 लीटर बायोएक्टरमध्ये तयार केल्या जातील आणि त्यानंतर त्यामध्ये वनस्पती संबंधित घटक टाकले जातील. उत्पादन करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राण्यांच्या पेशी सेल बँकमधून घेतल्या जातील आणि त्यासाठी कोणत्याही प्राण्याला मारण्याची गरज भासणार नाही. हे थेट प्राण्यांच्या बायोप्सीजमधून घेतले जातील.
हे अगदी अन्नातील मांसासारखे असल्यामुळे प्राणी मारले जाणार नाहीत आणि पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचणार नाही. म्हणून याला 'क्लीन मीट' असं म्हटलं जातं. या पर्यायावर आता काम सुरू होणार आहे. याचा साठादेखील मर्यादित असणार आहे. पण लोकांना यासाठी प्राण्यांची हिंसा करण्याची किंवा त्यांना मारण्याची आवश्यकता नसेल. तसंच यामुळे आता मांसाची मागणी वाढेल असं म्हटलं जात आहे.
हे वाचा - 27 वर्षांपूर्वी गोठवून ठेवलेल्या भ्रूणातून दिला चिमुरडीला जन्म
जे लोक प्रयोगशाळेतील हे मांस खाण्यास तयार आहेत त्यांच्या मते, लॅबच्या मांसामध्ये पोषण द्रव्ये घालून सर्व रोगांचा धोका कमी केला जाऊ शकतो. बहुतेक मांसामध्ये सॅच्युरेटेड फॅट असतं मात्र लॅबमध्ये तयार केलेल्या मांसांमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आणि हेल्दी फॅट टाकले जाऊ शकतात. हे आरोग्यासाठी चांगले असेल तसंच जनावरांकडून मांस तयार करण्याच्या प्रक्रियेमुळे प्रदूषण थेट थांबवलं जाईल. तसंच तेथील काही लोक लॅबमध्ये तयार केलेल्या मांसाला विरोध देखील करत आहेत. ते म्हणतात की जेनेटिकली मॉडिफाईड आणि कृत्रिम या दोन्ही मांसामध्ये खूपच फरक असल्यामुळे शरीरात बरेच नवीन आजार उद्भवू शकतात.
मांस आणि पर्यावरणाचा संबंध काय आहे?
मांस खाणे पर्यावरणावर थेट परिणाम करतं. शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, मांसाचा वापर कमी करून हवामान बदलावर नियंत्रण ठेवलं जाऊ शकतं. जगभरात गुरंढोरं आणि इतर व्यावसायिक पण वाढवले जातील जेणेकरून दूध, लोकर यासारख्या सर्वात मोठ्या गरजा देखील पूर्ण केल्या जाऊ शकतात. त्यांची विष्ठा आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे उत्सर्जन एका वर्षामध्ये 14 टक्क्यांनी वाढेल. तसंच प्राण्यांशी संबंधित उद्योग हे सर्वात मोठ्या तेल कंपन्यांपेक्षा जास्त हरितवायूंचं ऊत्सर्जन करतात. त्यात कार्बनडायऑक्साईडपेक्षा धोकादायक मिथेन वायू देखील असतो.
हे वाचा - भारी आहे! दारूनं भरलेल्या बाथटबमध्ये डुबकी मारताच दूर होणार आजार
तसंच येल युनिव्हर्सिटीचा अहवालात शाकाहारातील फायदे मोजून त्या संबंधित आकडेवारी देण्यात आली आहे. उदाहरणार्थ जगात सर्वाधिक मांस खाणारे दोन अब्ज लोक जर शाकाहारी पदार्थांकडे वळले तर ते भारताच्या दुप्पट आकाराचं क्षेत्र वाचवू शकतील. ही मोठी गोष्ट असेल आणि या भागाचा उपयोग शेतीसाठी केला जाऊ शकतो जेणेकरून लोकांना आहार मिळेल. तसंच बीफ (Beef) बद्दल ही बऱ्याच गोष्टी बोलल्या जात आहेत. सुमारे एक किलो बीफ तयार करण्यासाठी 25 किलो धान्य आणि पंधरा हजार लीटर पाणी लागतं.
शाकाहारी लोकांचं प्रमाण वाढलं आहे
गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीवरून असं लक्षात येतं की, जगात शाकाहारी लोकांची संख्या वाढली आहे. लोक खूपच पटकन शाकाहारी होण्याचा निर्णय घेत आहेत. तसेच व्हेगन डाएटकडे देखील लोकांचा कल वाढला आहे. म्हणजेच मांसाहाराव्यतिरिक्त दूध किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ न खाणाऱ्या लोकांचादेखील एक ग्रुप बनवला आहे. हे शाकाहारी लोकांपेक्षा सुद्धा एक पाऊल पुढे आहेत. याला Vegan Movement असे म्हणतात. गुगल ट्रेंडच्या सर्च डेटा च्या अनुसार 2014 ते 2018 या जगात शाकाहारी लोकांचे प्रमाण अधिक वेगाने वाढले आहे. ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रिया, कॅनडा, न्यूझीलंड मध्ये शाकाहारी लोक वाढत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.