डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दिसतात ही लक्षणं, एकगा तुम्हीही वाचा!

डेंग्यूच्या रुग्णांमध्ये दिसतात ही लक्षणं, एकगा तुम्हीही वाचा!

पहिल्या टप्प्यानंतर रुग्णाच्या शरीराचं तापमान अचानक कमी होतं. याचा अर्थ रुग्ण बरा होतोय असा होत नाही.

  • Share this:

पावसाच्या दिवसांमध्ये मच्छरांचा उच्छादही वाढतो. डेंग्यूच्या सुरुवातीच्या स्टेजमध्ये दोन दिवसांपासून ते सात दिवसांपर्यंत ताप राहतो. मच्छर चावल्यानंतर जवळपास चार ते 10 दिवसांपर्यंत डेंग्यूचा ताप शरीरात पसरतो.  यात 40 अंश सेल्सियस/ 104 अंश सेल्सियस पर्यंत ताप येतो. डेंग्यूमध्ये शरीरातील प्लेटलेटचा काउंट झपाट्याने कमी होतो. याची काही लक्षणं खालीलप्रमाणे-

डेंग्यूची लक्षणं- डोकेदुखी, डोळे सतत दुखणं, सर्दी, उल्टी, ग्रंथींना सूज येणं, हाडं आणि स्नायूंमध्ये तीव्र वेदना, अंगावर तसेच त्वचेवर लाल चट्टे उठणं.

गंभीर डेंग्यू- डेंग्यू शरीरात पसरल्यानंतरचे तीन ते सात दिवस फार गंभीर असतात. पहिल्या टप्प्यानंतर रुग्णाच्या शरीराचं तापमान अचानक कमी होतं. याचा अर्थ रुग्ण बरा होतोय असा होत नाही. याउलट, या स्थितीत रुग्णाकडे जास्त लक्ष द्यावं लागतं आणि त्याची काळजी घ्यावी लागते. डेंग्यू जेव्हा गंभीर रुप घेतं तेव्हा रुग्णाच्या शरीरात काय लक्षणं दिसतात याबद्दल थोडी माहिती घेऊ...

गंभीर डेंग्यूची लक्षणं- पोटात असह्य दुखणं, हिरड्यांमधून रक्त येणं, रक्ताच्या उल्ट्या होणं, श्वास घ्यायला त्रास होणं, जाड होणं आणि लगेच थकणं. जेव्हा रुग्णांमध्ये डेंग्यूची लक्षणं दिसतील तेव्हा त्यांना तात्काळ डॉक्टरांना दाखवावे किंवा रुग्णालयातील आपत्कालीन वॉर्डमध्ये भरती करावे.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

Sawan 2019: ...म्हणून श्रावणात महिला हिरव्या रंगाचे कपडे घालतात

उशीरापर्यंत रात्री जागायची सवय आहे तर वेळीच व्हा सावध!

रेड मीट खाल्याने महिलांमध्ये वाढतो ब्रेस्ट कॅन्सरचा धोका! 

VIDEO: आगमनाआधीच बाप्पा पाण्यात, मनाला चटका लावणारं गणपती कारखान्याचं दृष्य

First published: August 11, 2019, 7:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading