मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

कधी, कुठे, कुणाला मिळणार CORONA VACCINE? कोरोना लशीकरणाची प्रक्रिया एका क्लिकवर

कधी, कुठे, कुणाला मिळणार CORONA VACCINE? कोरोना लशीकरणाची प्रक्रिया एका क्लिकवर

कोरोना लस (corona vaccine) आणि कोरोना लशीकरणाबाबत (corona vaccination) तुमच्या मनात बरेच प्रश्न असतील. या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथं मिळतील.

कोरोना लस (corona vaccine) आणि कोरोना लशीकरणाबाबत (corona vaccination) तुमच्या मनात बरेच प्रश्न असतील. या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथं मिळतील.

कोरोना लस (corona vaccine) आणि कोरोना लशीकरणाबाबत (corona vaccination) तुमच्या मनात बरेच प्रश्न असतील. या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला इथं मिळतील.

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 27 डिसेंबर : कोरोना लशींच्या (Corona Vaccine) चाचण्या (Trials) आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या सार्वजनिक सूचनांनुसार केंद्र सरकार (Central Government) लवकरच लशीकरणाच्या (Vaccination) प्रक्रियेला गती देणार आहेत. लशीकरणाच्या वेळापत्रकानुसार एका व्यक्तीने 28 दिवसांच्या अंतराने लशीचे दोन डोस घेणं आवश्यक आहे.

ही लस कधी, कुठे आणि कुणाला मिळणार? मला कोरोना लस मिळणार का? कोरोना लस मिळण्यासाठी मला काय करावं लागेल? असे कित्येक प्रश्न तुमच्या मनात असतील. त्यामुळे  लशीकरणाचे नियोजन, अंमलबजावणी, संभाव्य दुष्पपरिणाम आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन (Online Registration) कसं करावं याबाबतची प्रक्रिया आता जाणून घेऊयात.

कोरोना लशीचे नियोजन केव्हाही घोषित होऊ शकतं?

कोरोनावरील विविध लशींच्या चाचण्या आता अंतिम टप्प्यात आल्या आहेत. लवकरच केंद्र सरकार लशीकरण अभियानाला सुरुवात करण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक माहितीसाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी www.mohfw.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.

कोविड-19 (Covid-19) लस ही एकाचवेळी सर्वांना दिली जाणार का?

लशींची सध्याची उपलब्धता बघता केंद्र सरकारने ज्या गटांना अधिक धोका आहे, अशा गटांची प्राधान्याने लशीकरणासाठी निवड केली आहे. यामध्ये आरोग्य कर्मचारी (Health workers) आणि फ्रंटलाईन वर्कर्सचा (Frontline Workers) समावेश आहे. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात 50 वर्षांवरील व्यक्ती तसेच 50 पेक्षा कमी वयाच्या परंतु अन्य गंभीर आजार (comorbid) असणाऱ्या व्यक्तींना प्राधान्याने लस दिली जाणार आहे.

कोरोना लस सर्वांनी घेणं बंधनकारक आहे का?

कोविड-19 वरील लस घेणं ऐच्छिक असणार आहे. पण या रोगापासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी वेळापत्रकानुसार कोरोनाचं लशीकरण करून घेणं आवश्यक आहे. कुटुंबातील सदस्य, मित्र, नातेवाईक आणि सहकारी तसंच संपर्कातील व्यक्तींमध्ये या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून लशीकरण करून घेण्याचा सल्ला सरकारनं दिला आहे.

अल्पावधीत चाचणी करण्यात आलेली ही लस सुरक्षित आहे का?

नियामक संस्थांनी लस सुरक्षित आणि कार्यक्षम आहे, असं स्पष्ट केल्यानंतर ती देशभरात वितरित केली जाणार आहे.

सध्या कोरोनाग्रस्त (कन्फर्म किंवा संशयित) असलेल्या व्यक्तीला लस देता येते का?

एखादी व्यक्ती कोरोनाग्रस्त असेल किंवा संशयित रुग्ण असेल तर अशा व्यक्तीमुळे लशीकरणाच्या ठिकाणी अन्य व्यक्तींना संसर्ग होण्याचा धोका आहे. या कारणामुळे संसर्गग्रस्त व्यक्तीमधील लक्षणे कमी झाल्यानंतर 14 दिवसांनी त्या व्यक्तीस लस दिली जाईल.

कोरोनामुक्त व्यक्तीला लस घेणं आवश्यक आहे का?

हो, कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तीला वेळापत्रकानुसार लस घेणं गरजेचं आहे. कारण यामुळे त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल.

उपलब्ध लशींपैकी प्रशासन नेमकी लस कशी निवडणार?

देशात लशीला परवाना देण्यापूर्वी क्लिनकल ट्रायल (Clinical trial) झालेल्या लशींची कार्यक्षमता आणि सुरक्षितता औषध नियमकांकडून तपासली जाते. त्यामुळे परवानाप्राप्त लशी या तुलनेने कार्यक्षम आणि सुरक्षित असतात.

हे वाचा - DON'T WORRY तुम्हाला कोरोना लस मिळाली नाही तरी औषध तयार; व्हायरसपासून करणार बचाव

कोरोनामध्ये लस बदलून चालत नाही, त्यामुळे लशीकरणासाठी एकाच लशीचा वापर निश्चित केला जातो.

कोरोना लस+2 ते +8 अंश सेल्सिअस तापमानात ठेवण्याची आणि आवश्यक तापमानात तिची वाहतूक करण्याची सुविधा भारतात उपलब्ध आहे?

जगातील सर्वात मोठा लशीकरण कार्यक्रम भारतात राबवला जातो. या माध्यमातून 26 दशलक्षाहून अधिक नवजात बालकं आणि 29 दशलक्षांवर गर्भवती महिलांचं लशीकरण केलं जातं. देशातील मोठी लोकसंख्या पाहता हा कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी त्या पद्धतीनं तयारी केली जात आहे.

भारतातील लस अन्य देशांतील लशींप्रमाणे प्रभावी असेल का?

हो, भारतातील कोरोना प्रतिबंधक लस ही अन्य कोणत्याही देशांनी विकसित केलेल्या लशींप्रमाणेच प्रभावी असेल. लशीची कार्यक्षमता आणि सुरक्षितता तपासण्यासाठी विविध टप्प्यांत लशीची चाचणी करण्यात येत आहे.

मी लस घेण्यास पात्र आहे हे कसं समजावं?

देशात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्स या गटाला लस दिली जाणार आहे. तसेच 50 पेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना प्राधान्यानं लस दिली जाणार आहे. लसीसाठी पात्र नागरिकांना नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर (Registered Mobil Number) आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात येईल. तसंच त्यांना लशीकरणाचं ठिकाण आणि त्यासाठी वेळ याबाबतची माहिती दिली जाईल. लशीकरणाचा लाभ मिळावा आणि नोंदणी प्रक्रियेत गैरसोय होऊ नये यासाठी ही सुविधा देण्यात येणार आहे.

एखाद्या व्यक्तीस आरोग्य विभागाकडे नोंदणी न करता लस मिळू शकते का?

नाही, कोरोना प्रतिबंधक लशीकरणासाठी पात्र लाभार्थ्यांना नोंदणी आवश्यक आहे. नोंदणीनंतर संबंधित व्यक्तीस लशीकरणाचे ठिकाण, वेळ याची माहिती दिली जाणार आहे.

पात्र लाभार्थ्यांना नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

खाली नमूद केलेले कोणतेही ओळखपत्र नोंदणीस्थळी दाखवणं आवश्यक आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स (Driving Licence)

कामगार मंत्रालयाच्या योजनेंर्तगत देण्यात आलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

मनरेगाचे जॉब कार्ड (MANAREGA Job Card)

खासदार, आमदार किंवा एमएलसी यांनी दिलेले अधिकृत ओळखपत्र

पॅन कार्ड (Pan Card)

हे वाचा - बापरे! इथं लोक जाणूनबुजून कोरोना पॉझिटिव्ह होणार; शरीरात जीवघेणा व्हायरस होणार

बॅंक किंवा पोस्टाचे पासबुक

पासपोर्ट (Passport)

निवृत्तीवेतनाची कागदपत्रे

केंद्र, राज्य किंवा पब्लिक लिमिटेड कंपन्यांचे सर्व्हिस ओळखपत्र

मतदार कार्ड (Voter ID)

नोंदणीवेळी फोटो आयडी आवश्यक असेल का?

नोंदणीवेळी फोटो आयडी देणं आवश्यक आहे. लशीकरणावेळी त्याची पडताळणी केली जाणार आहे.

एखाद्या व्यक्तीने नोंदणीवेळी फोटो आयडी दिला नाही तर त्या व्यक्तीचे लशीकरण केलं जाणार नाही का?

पात्र व्यक्तीला लस दिली आहे किंवा नाही, हे समजण्यासाठी लशीकरणाच्या ठिकाणी लाभार्थ्यांची नोंदणी आणि पडताळणीसाठी फोटो आयडी देणे आवश्यक आहे.

लशीकरणाच्या तारखेविषयीची माहिती पात्र लाभार्थ्यास कशी मिळणार?

ऑनलाईन नोंदणीनंतर लाभार्थ्यास नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर लशीकरणाची वेळ, ठिकाण आणि दिनांक एसएमएसद्वारे कळवण्यात येणार आहे.

लशीकरण झालेल्या लाभार्थ्यास लशीकरण पूर्ण झाल्यानंतरच्या स्थितीची माहिती मिळेल का?

होय, कोरोना प्रतिबंधक लशीचा डोस घेतल्यानंतर लाभार्थ्यास नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस पाठवला जाईल. लशीचे सर्व डोस दिल्यानंतर लाभार्थ्यास नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर क्युआर कोडवर आधारित प्रमाणपत्र पाठवलं जाईल.

कर्करोग (Cancer), मधुमेह (Diabites), उच्च रक्तदाब (Hypertension) आदी आजारांवरील औषध घेत असलेली व्यक्ती कोरोना प्रतिबंधक लस घेऊ शकते का?

हो, एखादी व्यक्ती एकापेक्षा अधिक गंभीर आजारांवर औषध घेत असेल तर ती अति जोखीम गटात येते. त्यामुळे या व्यक्तीला कोरोना प्रतिबंधक लस घेणं गरजेचं आहे.

लशीकरणाच्या ठिकाणी कोणत्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे?

लस घेतल्यानंतर संबंधित व्यक्तीने लशीकरण केंद्रावर किमान अर्धा ते एक तास विश्रांती घ्यावी. तसंच या दरम्यान कोणताही त्रास जाणवू लागल्यास तातडीने आरोग्य अधिकारी, एएनएम किंवा आशा वर्कर्सशी संपर्क साधावा. तसंच लशीकरण केंद्रावर मास्क वापरणं (Mask), हात सॅनिटायझरनं (Sanitizer) स्वच्छ करणं आणि सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) ठेवणं बंधनकारक आहे.

कोरोना प्रतिबंधक लशीचे संभाव्य दुष्परिणाम कोणते?

सुरक्षितता सिद्ध झाल्यानंतरच कोरोना प्रतिबंधक लस वापरली जाणार आहे. इतर लशींप्रमाणेच काही व्यक्तींमध्ये सौम्य ताप, इंजेक्शन टोचल्याच्या ठिकाणी वेदना आदी दुष्परिणाम दिसून येऊ शकतात. सुरक्षित लशीकरणाच्या दृष्टीकोनातून लशीशी संबंधित दुष्परिणामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्याचे संबंधित राज्यांना सांगण्यात आलं आहे.

लशीचे किती आणि कशा अंतराने डोस घ्यावे लागतील?

लशीकरणाच्या वेळापत्रकानुसार एका व्यक्तीला लशीचे दोन डोस 28 दिवसांच्या अंतराने घ्यावे लागतील.

अँटिबॉडीज (Antibodies) कधी विकसित होतात?

पहिला डोस घेतल्यानंतर की दुसऱ्या डोसनंतर की त्यानंतर कोरोना प्रतिबंधक लशीचा दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यात अँटिबॉडीज तयार होतात.

First published:

Tags: Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus