Congo Fever: या आजाराने झाला होता तिघांचा मृत्यू, जाणून घ्या याची लक्षणं

Congo Fever: या आजाराने झाला होता तिघांचा मृत्यू, जाणून घ्या याची लक्षणं

या तापाच्या रुग्णांच्या शरीरातून रक्त वाहू लागतं आणि शरीराचे महत्त्वपूर्ण भाग काम करणं बंद होतं.

  • Share this:

काही दिवसांपूर्वी गुजरातमध्ये कांगो तापाची साथ जोरात होती. या तापाने आतापर्यंत तिथे तीनजणांचा मृत्यू झाला असून आठ लोकांचे रक्ताचे नमुने सकारात्मक आढळले. अजूनही आरोग्य विभाग रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवत आहेत. कांगो ताप हा विषाणूंद्वारे पसरणारा एक आजार आहे. हा आजार पाळीव प्राण्यांच्या त्वचेवर असणाऱ्या किटाणूमुळे होतं. या किटाणूचं नाव आहे 'हिमोरल'. गुरं पाळणाऱ्यांना हा आजार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता जास्त असते.

नक्की कांगो ताप काय आहे आणि त्याची लक्षणं काय आहेत-

या तापाकडे दुर्लक्ष केलं तर तो जीवघेणा ठरू शकतो. या विषाणूचा संसर्ग झालेल्या 30 ते 80 टक्के रुग्णांचा मृत्यू होतो. हा आजार प्राण्यांमध्ये असणाऱ्या 'हिमोरल' पॅरासाइटमुळे माणसांमध्ये पसरतो. कांगो तापाचे रुग्ण हे जास्त करून पश्चिम आणि पूर्व आफ्रिकेत दिसतात. हा रोग पिसूच्या माध्यमातून जनावरांमध्ये पसरतो.

कांगो तापाची लक्षणं-

या तापाच्या रुग्णांच्या शरीरातून रक्त वाहू लागतं आणि शरीराचे महत्त्वपूर्ण भाग काम करणं बंद होतं. रुग्णांचे स्नायू असह्यपणे दुखू लागतात आणि ताप येतो. याशिवाय डोकेदुखी, चक्कर येणं, प्रखर प्रकाश पाहिल्यावर चिडचिड होणं आणि डोळ्यांमधून पाणी येण्यासारख्या समस्या दिसून येतात. तसेच रुग्णांना उल्टी, घसा खवखवणं आणि पाठ दुखीसारख्या समस्याही उद्भवतात. या तापात डेंग्यूप्रमाणेच प्लेटलेट्स काउंट कमी होतात.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

फ्लर्ट करण्यात या राशींच्या मुली असतात Expert, मुलांना वाटतं आहे प्रेम

दररोज फक्त 5 मिनिटं योग करण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

Wax करताना या गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका...

VIDEO: शरद पवार ईडी कार्यालयात जाण्याआधी जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

First Published: Sep 27, 2019 11:32 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading