मुंबई, 24 मार्च : लव्ह मेकींग सेशनपूर्वी योग्य कंडोम निवडणं हे गरजेचं आणि मजेदार असतं. सध्या मार्केटमध्ये कंडोमचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. फ्लेवर्डपासून डॉटेडपर्यंत आपल्या व्यक्तिमत्वाला सूट करणारे कंडोमचे अनेक प्रकार दुकानांमध्ये उपलब्ध आहेत. परंतु त्यांचा वापर करण्यापूर्वी त्याविषयी जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
भारतीयांमध्ये सध्या या फ्लेवर्ड कंडोमची मोठी क्रेझ पाहायला मिळत आहे. ओरल सेक्समुळे (Oral Sex) फ्लेवर्ड कंडोमचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला. प्लेन कंडोमचा वास दूर व्हावा याकरिता बाजारात फ्लेवर्ड कंडोम आणला गेला. सध्या बाजारात फ्लेवर्ड कंडोममध्ये स्ट्रॉबेरी,आरेंज, मिंट, द्राक्षे, केळी, बबलगम, चॉकलेट, व्हॅनिला किंवा कोला फ्लेवरला सर्वाधिक पसंती मिळताना दिसते.
ओरल सेक्ससाठी सुरक्षित आहे का?
ओरल सेक्ससाठी फ्लेवर्ड आणि रंगीत कंडोमचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. कंडोम उत्पादक ओरल सेक्ससाठी त्यांची उत्पादने सुरक्षित आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी पुरेशी खबरदारी घेत असल्याचा दावा करतात. म्हणूनच फ्लेवर्ड कंडोमचा संतुलित वापर केल्यास कोणतंही नुकसान होत नाही. काही अतिसंवेदनशील लोकांना समस्या उदभवू शकतात. पण पुरेशी सावधगिरी बाळगत यावर मात केली जाऊ शकते.
रसायनांचा होतो वापर
अनेक कंडोम अन्न आणि औषध प्रशासनाने मंजूर केलेले असतात. तसंच त्यासोबत आरोग्य सुरक्षाही सुनिश्चित केलेली असते. पण फ्लेवर आणि कंडोम कलर मॅच करण्यासाठी उत्पादक कंपन्या सिंथेटिक रंगांचा (Synthetic Colours) वापर करतात. केळी फ्लेवर्ड कंडोमला केळीसारखा (Banana) पिवळा रंग किंवा स्ट्रॉबेरी फ्लेवरला तसाच लाल रंग देण्यासाठी रसायनांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
हे वाचा - अरे बापरे! खोकला झाला म्हणून डॉक्टरकडे गेली आणि छातीतून निघालं चक्क कंडोम
फ्लेवर्ड कंडोम वापरल्याने सर्वसामान्यपणे पुरुषांना फारसा कोणताही त्रास होत नाही. परंतु ओरल किंवा इंटरकोर्समुळे महिलांना व्हजायनामध्ये खाज, जळज, सूज किंवा घसा खवखवणं आदी समस्या जाणवतात. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
आनंद आणि सेक्ससाठी या कंडोम्सचा करा वापर
फ्लेवर्ड कंडोम
फ्लवेर्ड कंडोम ओरल सेक्ससाठी उत्तम असतात. याचे अनेक फ्लेवर्स बाजारात उपलब्ध आहेत. जर तुम्ही याचा वापर व्हेजिनल किंवा अनल सेक्स करताना करणार असाल तर तुमच्या जोडीदाराला यीस्ट इन्फेक्शन होऊ नये यासाठी कंडोमचा फ्लेवर शुगर फ्री आहे ना याची खात्री करा.
डॉटेड कंडोम
सेक्स करताना तुम्हाला अधिक मजा हवी असेल तर डॉटेड कंडोम (Dotted Condom) हा सर्वात चांगला पर्याय आहे. टेक्सचर्ड किंवा स्टडेड कंडोम्स केवळ तुम्हालाच नाही तर तुमच्या जोडीदारालाही सुखद अनुभव देतात.या कंडोम्सवर दाणेदार पदार्थ असतो. सेक्स दरम्यान या पदार्थामुळे तुमचा जोडीदार अधिक उत्तेजित होण्यास मदत होते.
सुपर थिन कंडोम
जर तुम्ही कंडोम वापरत आहात परंतु तुम्हाला सेक्सचा कंडोम फ्री आनंद हवा असेल तर तुम्हाला सुपर थिन कंडोम (Super thin Condom) नक्की आवडेल. हा एक ट्रान्सपरंट किंवा पारदर्शी कंडोम असतो,त्याची निर्मिती शिरलोन मटेरिअल पासून केलेली असते. त्याचा स्पर्श अगदी स्किनसारखा असतो. अवांछित गर्भधारणा किंवा लैंगिक आजारांपासून संरक्षण करण्यासाठी हा कंडोम खूप प्रभावी ठरतो.
प्लेजर शेप्ड कंडोम
हा कंडोम दोन्ही जोडीदारांची संवेदनशीलता मोठ्या प्रमाणात वाढवते. याची टीप सैल आणि मोठी असते.
ग्लो इन द डार्क कंडोम (Glow in the Dark Condom)
जर तुम्ही किंकी सेक्सचे शौकीन असाल तर हा कंडोम तुमच्यासाठी योग्य आहे. 30 सेकंद प्रकाशात ठेवल्यानंतर हा कंडोम अंधारातही चमकतो. हा नॉन टॉक्सिक असून त्यात तीन थर असतात. आतील आणि बाहेरील थर हे लॅटेक्सने तयार केलेला असतो. मधला थर हा सुरक्षित रंगद्रव्याने बनलेला असतो,यामुळे हा कंडोम चमकतो.
हे वाचा - डिओडोरंट वापरल्यामुळे ब्रेस्ट कॅन्सर होतो का?
कंडोम खरेदी करतेवेळी तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. जेव्हा तुम्ही कंडोम खरेदी कराल,त्यावेळी त्यावरील लेबल जरूर चेक करा. तसंच गर्भधारणा टाळण्यासाठी आणि एसटीडी बचावासाठी त्या कंडोमला एफडीएनं मान्यता दिली आहे का ते तपासा. जर अशी मान्यता असेल तर ते कंडोम खरेदी करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sexual health