बीजिंग, 01 ऑक्टोबर : कोरोनाव्हायरसच्या (coronavirus) साथीने संपूर्ण जग त्रस्त असतानाच ब्युबॉनिक प्लेग या आजाराचे रुग्ण आता चीनमध्ये सापडत आहेत. उत्तर चीनमधील मंगोलियामध्ये कोरोनापेक्षाही खतरनाक मानल्या जाणाऱ्या Bubonic plague चा उद्रेक झाला आहे. मंगोलियामध्ये आतापर्यंत 22 लोकांना या रोगाची लागण झाली आहे. तर, तीन जणांचा या रोगामुळे मृत्यू झाला आहे. यात तीन वर्षांच्या बाळाचाही यात समावेश आहे.
14 व्या शतकाच्या मध्यात या आजाराने युरोप आणि आशियामध्ये धुमाकूळ घातला होता. कोट्यवधी नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर चीन, भारत, सीरिया आणि इजिप्तमध्येदेखील मोठ्या प्रमाणात या आजारानी नागरिकांचा मृत्यू झाला होता.
या आजाराचे विषाणू सर्वांत प्रथम युरोपमधून आलेल्या व्यापारी जहाजांमधील कामगारांमध्ये आढळून आले होते. 1347 मधील ऑक्टोबर महिन्यात 12 जहाजं युरोपमध्ये आली होती. या जहाजांमधील कामगारांना या विषाणूची लागण झाली होती. यामध्ये जहाजावरील अनेक कामगारांचा मृत्यू झाला होता तर अनेक कामगारांची तब्येत अतिशय नाजूक झाली होती.
हे वाचा - भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश; कोरोनापासून बचाव आणि उपचाराचा मार्ग सापडला
14 व्या शतकात ब्युबॉनिक प्लेगमुळे आशिया, युरोप आणि आफ्रिका खंडात तब्बल दोन कोटी लोकांचा बळी गेला होता. तेव्हापासूनच ब्युबॉनिक प्लेगला ब्लॅक डेथ (black death) असं म्हटलं जातं.
कसा पसरतो ब्युबॉनिक प्लेग?
ब्युबॉनिक प्लेग हा प्राण्यांतून माणसांमध्ये संक्रमित होणारा आजार आहे. प्राण्यांच्या शरीरावर असणाऱ्या पिसवांमुळे हा आजार होतो. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार Yersinia pestis bacteria मुळे हा आजार होतो. केवळ प्लेगची लागण असलेल्या प्राण्याच्या संपर्कातून या आजाराची लागण होऊ शकतो. संक्रमित व्यक्तीमुळे दुसऱ्या व्यक्तीला हा आजार होत नाही.
ब्युबॉनिक प्लेगची लक्षणं?
ताप, अंगदुखी, डोकेदुखी, सांधेदुखी ही या आजाराची लक्षणं आहेत. त्याचबरोबर मानेवर, काखेत किंवा जांघेत गाठीदेखील येतात. शरीरावर मोठ्या गाठी तयार होतात. या गाठींना ब्युबो असं म्हटलं जातं. जर मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला तर या गाठींमध्ये पू तयार होतो. या गाठी खूप दुखतात. यामुळे शरीरातील रक्तप्रवाहामध्ये अडथळा येऊन शरीरातील पेशी मृत होतात.
हे वाचा - कॅन्सरला दूर ठेवायचं आहे मग दररोज बिनधास्त खा पिझ्झा पण...
त्यामुळे अशी लक्षणं दिसल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.