Home /News /lifestyle /

लग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर, वाचा काय आहे विमा पॉलिसी

लग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास मिळणार इन्शूरन्स कव्हर, वाचा काय आहे विमा पॉलिसी

एखाद्या कारणामुळे तुमचे लग्न रद्द झाल्यास काही विमा कंपन्या झालेल्या खर्चासाठी इन्शूरन्स विमा कव्हर देत आहेत.

    मुंबई, 30 सप्टेंबर : भविष्य सुरक्षित करण्यासाठी, अपघात झाल्यास आर्थिक साहाय्य मिळावे, आजारपणात मदत व्हावी याकरता विमा काढला जातो. विम्यामध्ये केली जाणारी गुंतवणूक एक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. दरम्यान काही विमा कंपन्या एका अनोख्या परिस्थितीसाठी देखील विमा ऑफर करत आहेत. काही विमा कंपन्या लग्नाआधी नवरा किंवा नवरी पळून गेल्यास विमा देतात. हो तुम्ही वाचलं ते खरं आहे, काही विमा कंपन्या अशा प्रकारचा विमा ऑफर करत आहेत. अशाप्रकारचा इन्शूरन्स कव्हर देणाऱ्या कंपन्यांच्या इन्शूरन्स प्लॅनबाबत जाणून घेऊयात. लग्नाआधी नवरी किंवा नवरा पळून गेला, तर काही विमा कंपन्या तुमच्यासाठी इन्शूरन्स कव्हर देतात. खूप कमी लोकांना अशा प्रकारच्या विमा योजनेबद्दल माहित आहे. या पॉलिसीअंतर्गत तुम्ही लग्नासाठी केलेल्या सजावट किंवा इतर खर्चासाठी लागलेल्या पैशांसाठी संबंधित विमा कंपनीकडे दावा करू शकता. दैनिक भास्करने याबाबत वृत्त दिले आहे. (हे वाचा-खरीप पिकाच्या विक्रीनंतर शेतकऱ्यांना त्वरित मिळणार पैसे, सरकारचा मोठा निर्णय) काय आहे वेडिंग इन्शूरन्स पॉलिसी? लग्नासाठी देखील अनेक कंपन्यांनी इन्शूरन्स पॉलिसी बनवली आहे. आवश्यकतेनुसार तुम्ही वेडिंग इन्शूरन्स पॉलिसीचे पॅकेज घेऊ शकता. तुमच्या सोयीनुसार या पॅकेजची निवड करता येते. या पॅकेजअंतर्गत मिळणारे अनेक लाभ तुम्हाला घेता येतात. वेडिंग इन्शूरन्सची आवश्यकता काय? लग्नासाठी मोठा खर्च केला जातो. यामध्ये अनेक गोष्टी असतात. हॉल किवा रिसॉर्टच्या अ‍ॅडव्हान्सचा खर्च असतो. यावर इन्शूरन्स मिळतो. त्याचप्रमाणे ट्रॅव्हल एजन्सीला दिलेल्या अ‍ॅडव्हान्स पेमेंटवर, हॉटेलच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंवर, लग्नपत्रिकांचा खर्च, सजावट यावरील खर्चावर इन्शूरन्स असतो. (हे वाचा-1 ऑक्टोबरपासून बदलणार हे नियम, तुमच्या खिशावर कसा होणार परिणाम जाणून घ्या) त्यामुळे लग्न कोणत्याही कारणाने रद्द झाल्यास, तुमचे दागिने चोरी झाल्यास, अपघात झाल्यास अशा अनेक समस्यांअंतर्गत हा वेडिंग इन्शूरन्स तुमच्यासाठी आर्थिक साहाय्य म्हणून काम करेल. एका योग्य विमा पॉलिसीअंतर्गत तुम्ही तुमच्या नुकसानाची भरपाई करू शकता.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या