नवी दिल्ली, 18 जानेवारी : वेगवेगळ्या भाज्यांमध्ये आपण मटार (Green Peas) वापरत असतो, त्यामुळे भाज्यांची चव वाढते, मटार खायला जवळपास सर्वांनाच आवडतात. मात्र, हिवाळ्यात मुबलक मिळणारे मटार इतर हंगामात मिळत नाहीत. इतरवेळी आपल्याला मग केमिकलद्वारे प्रिजर्व केलेले मटार मिळतात, जे आरोग्यासाठी घातक असतात. यासाठी आपण घरीच वर्षभर पुरतील इतके मटार साठवून ठेवू शकतो. मटार वर्षभर साठवून ठेवण्याचे खूप सोपे उपाय आहेत. तुम्हालाही वर्षभर मटार खायला आवडत असतील तर आम्ही तुम्हाला त्यांची साठवणूक करण्याचे दोन उपाय सांगणार आहोत, ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा (Green Peas Storage Tips) होऊ शकतो.
हिरवे वाटाणे दोन प्रकारे साठवले जाऊ शकतात. एक म्हणजे त्यांना उकडवून साठवणे आणि दुसरा मार्ग म्हणजे ते न उकडता साठवणे. आज आम्ही तुम्हाला मटार घरी दोन्ही प्रकारे कसा साठवायचा त्याविषयी सांगतो.
हिरवे वाटाणे कसे साठवायचे (Green Peas Storage Tips)
1. न उकडता असे साठवा
मटार दीर्घकाळ साठवून ठेवण्यासाठी शक्यतो पेन्सिल मटार घ्या. कारण ते खाण्यासही अधिक गोड असतात आणि त्याचे दाणे जास्त पिकलेले नसतात. आता मटार जेवढे साठवायचे आहे तेवढे सोलून घ्या आणि मटारचे मोठे दाणे वेगळे करा आणि बारीक-लहान दाणे वेगळे करा. लक्षात घ्या की, आपण एकदम छोटे दाणे साठवण्यासाठी वापरणार नाही. आता एक टीस्पून मोहरीचे तेल घ्या (एक किलो मटारसाठी सुमारे 1 टीस्पून मोहरीचे तेल वापरले जाते). आता सोललेल्या मटारवर मोहरीचे तेल टाका आणि दोन्ही हातांनी मटारमध्ये चांगले मिसळा. यामुळे फ्रीजरमध्ये ठेवल्यावर मटारांवर बर्फ चिकटणार नाही. मोहरीचे तेल थंडीतही लवकर गोठत नाही, म्हणून त्याचा वापर केला जातो. आता मटार पॉलिथिन पिशव्यांमध्ये भरून रबर बँड लावा. या पिशव्या फ्रीजमध्ये ठेवा. जेव्हा वापरायचे आहेत तेव्हा पॉलिथिनमधून मटार काढा आणि नंतर रबर बँड लावून ठेवा.
हे वाचा -
Kidney Care Tips: किडनी निकामी करण्यास कारणीभूत ठरतात या 5 गोष्टी; आहारातील प्रमाण असावं मर्यादितच
2. उकडवून साठवण्याची पद्धत
प्रथम वरील पद्धतीप्रमाणेच मटार सोलून घ्या. त्यातील मोठे दाणे आणि बारीक दाणे वेगळे करा. मोठे दाणे आपण साठवण्यासाठी वापरणार आहोत. या पद्धतीने मटार साठवण्यासाठी नेहमी फक्त चांगल्या प्रतीचे मोठे मटार वापरा. आता मटार दोनदा पाण्याने स्वच्छ धुवा. आता एका मोठ्या भांड्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवा. पाणी उकळायला लागल्यावर वाटाणे पाण्यात टाका. दाणे पाण्यात 2 मिनिटे उकळा, त्यानंतर गॅस बंद करा.
हे वाचा -
लघवीच्या समस्येशिवाय किडनी खराब होण्याची अशी असतात लक्षणं; त्याकडे दुर्लक्ष पडेल महागात
आता चाळणीच्या साहाय्याने पाणी काढून टाका आणि मटार बाहेर काढा. आता दुसरे भांडे घ्या आणि त्यात बर्फाचे पाणी किंवा थंड पाणी घ्या. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही साधे पाणी घेऊन त्यात बर्फाचे मोठे तुकडे टाकू शकता. आता मटार थंड पाण्यात टाका. मटार थंड झाल्यावर पाण्यातून बाहेर काढून जाड कोरड्या कपड्यावर पसरवून वाळवा. पाणी पूर्णपणे सुकल्यावर मटार पॉलिथिन पिशवीमध्ये रबर बँडने पॅक करा किंवा एखाद्या हवाबंद टाईट डब्यात ठेवा आणि रेफ्रिजरेटरमध्ये ठेवून द्या. अशा प्रकारे आपण एक वर्षासाठी मटार साठवू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.