Home /News /lifestyle /

येणारी सोमवती अमावस्या तुमच्या जीवनात आणेल सुख-समृद्धी आणि शांती; फक्त करा `या`गोष्टी

येणारी सोमवती अमावस्या तुमच्या जीवनात आणेल सुख-समृद्धी आणि शांती; फक्त करा `या`गोष्टी

करा `या`गोष्टी

करा `या`गोष्टी

या दिवशी पितरांच्या शांती आणि सद्गतीसाठी श्राद्ध, तर्पण आणि गरीब, गरजूंना दान करावं, असं जाणकार सांगतात

  मुंबई, 26 मे:  हिंदू धर्मात पौर्णिमा (Purnima) आणि अमावास्या (Amavasya) या तिथींना विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. राखी पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा, मार्गशीर्ष महिन्यातली पौर्णिमा अशा जवळपास प्रत्येक महिन्यातल्या पौर्णिमेचं खास असं वैशिष्ट्य असतं. त्याचप्रमाणे सोमवती अमावास्या आणि शनी अमावास्या यादेखील पूजाविधी आणि उपासनेच्या दृष्टीनं महत्त्वाच्या मानल्या जातात. सोमवती अमावास्या (Somvati Amavasya) आणि शनी अमावास्या हा दुर्मीळ योग मानला जातो. जीवनात यश, सुख-समृद्धी लाभावी यासाठी सोमवती अमावास्येला काही विशिष्ट उपाय, उपासना किंवा पूजाविधी करावा, असं जाणकारांचं मत आहे. येत्या सोमवारी अर्थात 30 मे 2022 रोजी सोमवती अमावास्या आहे. या दिवशी पितरांच्या शांती आणि सद्गतीसाठी श्राद्ध, तर्पण आणि गरीब, गरजूंना दान करावं, असं जाणकार सांगतात. याविषयीची माहिती देणारं वृत्त `झी न्यूज हिंदी`ने प्रसिद्ध केलं आहे. मालकाच्या Work From Home मुळे आजारी पडली मांजर; डॉक्टरांनी सांगितलं शॉकिंग कारण
  दक्षिण भारत (South India) आणि उत्तर भारतात (North India) वेगवेगळं पंचांग आहे. उत्तर भारतीय पंचांगानुसार येत्या सोमवारी ज्येष्ठ अमावास्या तर दक्षिण भारतीय पंचांगानुसार वैशाख अमावास्या आहे. त्यामुळे दोन्ही पंचांगांनुसार या दिवशी अनुक्रमे वटसावित्री व्रत आणि शनी जयंती (Shani Jayanti) आहे. 30 वर्षांनी शनिदेव कुंभ या स्वराशीत असल्याने या सोमवती अमावास्येला अधिक महत्त्व आहे. तसंच या दिवशी सर्वार्थ सिद्धी आणि सुकर्मा योग येत आहेत. या दिवशी दान आणि पुण्य कर्म केल्यास सर्व पाप नष्ट होते आणि जीवनात सुख-समृद्धी येते, असं जाणकार सांगतात.
  सोमवती अमावास्येला पवित्र नदीत (River) स्नान करावं. हे शक्य नसेल तर पवित्र नदीचं जल पाण्यात मिसळून त्याने स्नान करावं. यामुळे सर्व पाप नष्ट होतं. पितृदोष दूर व्हावा, यासाठी सोमवती अमावास्येला पितरांना जल अर्पण करावं. असं केल्यानं पितर प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात. यामुळे कुटुंबात सुख-समृद्धी, समाधान नांदते आणि कुटुंबाची प्रगती होते. सोमवती अमावास्येला वटवृक्षाची पूजा करावी. या वृक्षाच्या मुळाशी जल अर्पण करावे. यामुळे जीवनातले कष्ट, दुःख दूर होतं. हंगामातील पहिल्या पावसात भिजणं त्रासदायक ठरेल; इतक्या समस्या सुरू होऊ शकतात
  हिंदू धर्मात दानाला (Donate) खूप महत्त्व आहे. सोमवती अमावास्येच्या दिवशी अवश्य दान करावं, असं जाणकार सांगतात. या दिवशी गरीब, गरजूंना दान केल्यानं कुंडलीतले शनी आणि चंद्राचे दोष दूर होतात. तसंच पितृदोषातून मुक्ती मिळते. सोमवतीला पाण्याने भरलेलं भांडं, छत्री, चपला, अन्न, काळे कपडे दान करणं सर्वांत चांगलं मानलं जातं. जीवनात यश मिळावं, प्रगती व्हावी, तसंच सुख लाभावं यासाठी सोमवती अमावास्येला हे उपाय करावेत.
  First published:

  Tags: Religion, Shani Jayanti

  पुढील बातम्या