• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Airtel चा सर्वात स्वस्त मोबाईल फोन सेवेचा दावा; 'हा' आहे सर्वात स्वस्त प्लॅन!

Airtel चा सर्वात स्वस्त मोबाईल फोन सेवेचा दावा; 'हा' आहे सर्वात स्वस्त प्लॅन!

Airtel ने ग्राहकांसाठी एक धमाकेदार प्लॅन आणला आहे. हा प्लॅन अगदी स्वस्त आणि त्यासोबत आकर्षक ऑफरदेखील आहेत.

 • Share this:
  मुंबई, 10 जुलै : एअरटेलने ग्राहकांसाठी एक धमाकेदार प्लॅन आणला आहे. हा प्लॅन अगदी स्वस्त आणि त्यासोबत आकर्षक ऑफरदेखील आहेत. जाणून घ्या काय आहे हा प्लॅन आणि त्यासोबत मिळणारे फायदे. एअरटेलने शंभर रुपयांपेक्षा कमी म्हणजे 97 रुपयांचा प्रिपेड प्लॅन आणला आहे. या प्लॅनची व्हॅलिडिटी 14 दिवसांची आहे. 2GB डेटासोबत तुम्हाला या प्लॅनमध्ये अनलिमिडेट कॉलिंग आणि प्रत्येक दिवसाला 100 SMS मोफत मिळतात. मागील वर्षी सप्टेंबरमध्ये असाच 97 रुपयांचा प्लॅन आणला होता. त्यामध्ये 1.5GB डेटा मिळत होता आणि लिमिटेड म्हणजे350 मिनीटे कॉलिंग मिळत होतं. पण यात आता वाढ करण्यात आली आहे. एअरटेलच्या ऑफिशिअल साईटवर दिलेल्या माहितीनुसार हा प्लॅन सध्या आंध्र प्रदेश, तेलंगना आणि कर्नाटक मध्ये उपलबद्ध आहे. मात्र जिओप्रमाणे एअरटेल कोणत्याही प्रकारचं थर्ड पार्टी सबस्क्रिप्शन देत नाहिये. एअरटेलने या प्लॅनला "Special Recharge-STV Combo" असं नाव दिलं आहे. त्याच्या ऑफिशिअल साईटवर जाऊन तुम्ही या प्लॅनची अधिक माहिती घेऊ शकता. सेल्फी काढल्याने नुकसान होत आहे पर्यावरणावर, जाणून घ्या काय आहेत परिणाम जाणून घ्या काय आहे 148 चा प्लॅन याआधी एअरटेलने 148 रुपयांचा प्लॅन आणला होता. आताचा नवा 97 रुपयांचा प्लॅन काहीसा 148 सारखाच आहे. 148 मध्ये ग्राहकांना 28 दिवसांसाठी 3GB डेटासोबत तुम्हाला या प्लॅनमध्ये अनलिमिडेट कॉलिंग आणि प्रत्येक दिवसाला 100 SMS मोफत मिळतात. सावधान! अपडेटचा दावा करण्यारं 'हे' फेक अ‍ॅप एक कोटी लोकांनी केलंय डाऊनलोड वर्षाच्या 1,699 च्या प्लॅनमध्ये बदल जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षक करण्यासाठी एअरटेलने एक वर्षाच्या 1,699 प्लॅनमध्येही बदल केला आहे. यापूर्वी या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 1GB इंटरनेट डेटा मिळत होता. आता मात्र बदल करण्यात आले असून अनलिमिटेड कॉलिंग आणि SMS बेनेफिट्सच्या सोबत रोज 1.4GB डेटा इंटरनेट डेटा मिळणार आहे. SPECIAL REPORT: काय आहे सलमान-कतरिनाच्या लग्नाचं सत्य?
  Published by:Arundhati Ranade Joshi
  First published: