तुम्हालाही आहेत का ‘या’ समस्या, शुद्ध तुपाचं सेवन ठरेल फायदेशीर

तुम्हालाही आहेत का ‘या’ समस्या, शुद्ध तुपाचं सेवन ठरेल फायदेशीर

हजारो वर्ष जुन्या आयुर्वेदात तुपाचं सेवन आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. मात्र सध्याच्या काळात तुप खाल्ल्यानं वजन वाढण्याची चिंता लोकांना सतावत असते.

  • Share this:

मुंबई, 22 जुलै : हजारो वर्ष जुन्या आयुर्वेदात तुपाचं सेवन आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. मात्र सध्याच्या काळात तुप खाल्ल्यानं वजन वाढण्याची चिंता लोकांना सतावत असते. मात्र हा समज चुकीचा असून शुद्ध तुपाचं सेवन शरीरासाठी खूपच फायदेशीर आहे. हे फक्त तुमच्या शरीराला रोगांपासून वाचवत नाही तर लहान मुलं तसेच गर्भवती महिलांनाही याचा फायदा होतो. जाणून घेऊया शुद्ध तुपाच्या सेवनानं होणारे हे 7 फायदे...

हृदय रोगांपासून संरक्षण

गायीच्या दूधापासून तयार करण्यात आलेलं शुद्ध तूप हृदय रोगांपासून आपलं संरक्षण करतं. नियमित शुद्ध तुपाचं सेवन केल्यानं रक्त आणि आतड्यांमधील अनावश्यक कॉलेस्ट्रॉल कमी करतं आणि चांगले कॉलेस्ट्रॉल वाढवतं. शुद्ध तुपात कॅल्शिअम, फॉस्फरस, मिनरल्स आणि पोटॅशिअम सारखे पोषक तत्व असतात. कॉलेस्ट्रॉल कंट्रोलमध्ये राहिल्यानं तुमचं हृदय व्यवस्थित कार्यरत राहतं आणि हृदयाशी संबंधीत सर्व आजार कमी होतात.

लसूण खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला आजारांपासून ठेवतील दूर...

रक्तपुरवठा सुरळित ठेवतं

शुद्ध तुपात विटामिन K-2 मुबलक प्रमाणात असतं. हे विटामिन ब्लड सेल्समध्ये जाऊन कॅल्शिअम कमी करण्याचं काम करतं ज्यामुळे तुमचा रक्त पुरवठा सुरळित राहतो.

फॅट कमी करतं

शुद्ध तुपामुळे शरीरातील असिडचं प्रमाण वाढतं. त्यामुळे पचनक्रिया सुरळित होते. शुद्ध तुपाच्या सोवनानं शरीरातील फॅटचं रुपांतर विटामिनमध्ये होतं.

दातांच्या दुखण्यानं त्रासलात? हे घरगुती उपाय नक्की करून पाहा

त्वचेला चमकदारपणा येतो

शुद्ध तुप त्वचेसाठी फायदेशीर मानलं जातं. यातील एंटिऑक्सिडेंट्स तुमच्या स्किनला मुलायम आणि चमकदार बनवतात.

हाडांना मजबूत बनवतं

शूद्ध तुपाच्या सेवनातून हाडांसाठी आवश्यक कॅल्शिअम तुम्हाला मिळतो. ज्यामुळे तुमची हाडं आणखी मजबूत होतात.

मायग्रेनवर उपायकारक

जर तुम्ही गायीच्या तूपाच सेवन करत असाल तर हे मायग्रेनवर औषधासारखं काम करतं. शूद्ध तुपाचे 2-3 थेंब नाकात टाकल्यानं मायग्रेनचं दुखणं कमी होतं.

मान्सून रोमँटिक डेटवर जाण्याचा प्लान करताय, मग असं जपा तुमचं आरोग्य!

गरोदर महिलांना एनर्जी देतं

गरोदर महिलांना शुद्ध तुप खायला दिल्यानं त्यांच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाचं शरीर मजबूत होतं. तसेच त्याच्या मेंदूचाही चांगला विकास होतो.

========================================================

First published: July 22, 2019, 10:00 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading