Monsoon Tips: पावसाळ्यात या परफ्यूमचा वापर एकदा करून पाहाच!

Monsoon Tips: पावसाळ्यात या परफ्यूमचा वापर एकदा करून पाहाच!

तुम्हाला घरातून बाहेर पडताना परफ्युम वापरायची सवय असेल तर पावसाळ्यात काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं लागतं.

  • Share this:

पावसाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात कोणत्या रंगाचे कपडे घालावेत आणि कोणते घालू नये याबाबत आपण जशी काळजी घेतो तशीच काळजी त्वचेचीही घेतली पाहिजे. पावसाळ्यात कोणते ब्युटी प्रोडक्ट वापरायचे याची विशेष काळजी घ्यावी लागते. तुम्हाला घरातून बाहेर पडताना परफ्युम वापरायची सवय असेल तर पावसाळ्यात काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं लागतं. कारण सगळ्या ऋतूंमध्ये तुम्ही एकाचप्रकारचे परफ्यूम वापरू शकत नाही. नेमके कोणते परफ्यूम पावसाळ्यात वापरणं चांगलं हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...

फ्लोरल परफ्यूम- नावाप्रमाणेच हा परफ्यूम फुलांपासून तयार केला जातो. यात गुलाब, लिली, जास्मीनसारखी फूलं असतात. हा परफ्यूम लावल्याने फूलांचा सुगंध आसपास पसरतो.

वुडी परफ्यूम- सौम्य सुगंधापासून गडद सुगंधापर्यंतचे प्रकार या परफ्यूममध्ये उपलब्ध असतात. यात चंदन, देवदार आणि अनेक मसाल्यांचा वापर केलेला असतो.

ओरिएण्टल परफ्यूम- तुम्हाला जर फिकट सुगंध आवडत असेल तसेच पार्टनसरसोबत पार्टी किंवा डिनरला जात असाल तर परफ्यूमचा हा प्रकार तुम्ही नक्की वापरू शकता. या परफ्यूममुळे पार्टनर तुमच्याकडे अधिक आकर्षित होईल.

सिट्रस परफ्यूम- जर तुम्हाला फिकट सुंगध आवडतो तर तुम्ही एकदा या प्रकरचा परफ्यूम वापरा. संत्र, लिंबू अशा वेगवेगळ्या प्रकारात हा परफ्यूम बाजारात उपलब्ध आहे.

परफ्यूम कसा लावावा- फार कमी लोकांना परफ्यूम कसा लावायचा हे माहीत असतं. ज्यांची त्वचा रूखी असते त्यांनी नाडीच्यावर परफ्यूमचा स्प्रे मारावा. तसेच मानेवर किंवा कानाच्या मागे परफ्यूम लावू शकता.

टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सुचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा.

आयुर्वेदानुसार श्रावणात हे पदार्थ कधीही खाऊ नयेत!

पॉर्न पाहणं वाईट नसतं, हे आहेत त्याचे तीन प्रकार

उशीरापर्यंत रात्री जागायची सवय आहे तर वेळीच व्हा सावध!

तुम्ही पाहू नाही शकणार असा VIDEO, शाळेच्या संचालकाने विद्यार्थ्यांना केली बेदम मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Aug 13, 2019 02:10 PM IST

ताज्या बातम्या