Happy Mother's Day: आईच सर्व काही करते! तिच्यासाठी असणाऱ्या या दिवसाचं काय आहे महत्त्व?

Happy Mother's Day: आईच सर्व काही करते! तिच्यासाठी असणाऱ्या या दिवसाचं काय आहे महत्त्व?

Mother's Day 2021: दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केलाजातो. त्यामुळे यंदा तो नऊ मे रोजी साजरा होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 06 मे: दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे (Mother's Day 2021) साजरा केलाजातो. त्यामुळे यंदा तो नऊ मे रोजी साजरा होणार आहे. आई आणि मूल (Mother & Child) यांच्यातलं नातं हे जगातलं सर्वांत सुंदर नातं असतं, ज्यात कोणतीही अट, कोणतीही अपेक्षा नसते आणि प्रचंड प्रेम असतं. आईसाठी कोणतेही शब्द, लेख, कविता किंवा काहीही लिहिलं, तरी ते कमीच पडतं. कारण कितीही काही केलं, तरी आईचं प्रेम हे त्या सगळ्या गोष्टींपेक्षा अधिक ठरतं. आईचं प्रेम आणि समर्पण भावने प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कदाचित आयुष्यही कमी पडेल. या पार्श्वभूमीवर, मदर्स डे ही आपल्या आईप्रति प्रेम, आदर व्यक्त करण्याची एक उत्तम संधी आहे. मदर्स डे चा इतिहास आणि महत्त्व जाणूनघेऊ या.

9 मे 1914 रोजी अमेरिकेचे (USA) तत्कालीन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी एक कायदा पारित केला होता. त्यानुसार, दर महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मदर्स डे साजरा केला जाऊ लागला. अमेरिकेत याची सुरुवात झाली आणि नंतर भारतासह जगातल्या अनेक देशांमध्ये हा दिवस साजरा केला जाऊ लागला.

हे वाचा-मेकअपच्या हौसेसाठी स्थापन केली कंपनी, Corona काळात; लाखोंची उलाढाल

अमेरिकेतल्या कार्यकर्त्या अॅना जार्विस यांचं आपल्या आईवर खूप प्रेम होतं. त्यांनी स्वतः लग्न केलं नाही आणि मुलांचं पालन पोषणही केलं नाही. त्यांच्या आईच्या मृत्यूनंतर आई प्रति प्रेम व्यक्त करण्यासाठी त्यांनी मदर्स डे या संकल्पनेची सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू अनेक देशांमध्ये ही संकल्पना पोहोचली. आता मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी (Second Sunday in May) मदर्सडे जगभर साजरा केला जातो.

आईचा त्याग, बलिदान, करुणा, दया आणि निस्वार्थ प्रेमाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मदर्स डे साजरा केला जातो. अनेक जण आईला या दिवशी काही विशेष भेटवस्तू देतात (Gifts), ग्रीटिंगकार्ड देतात किंवा  जे काही शक्य असेल ते देतात. आईवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी खरं तर कोणत्याही विशिष्ट दिवसाची गरज नाही. तरीही हा एक दिवस ठरवला गेला असल्यामुळे त्या दिवसाचं औचित्य साधून आईबद्दलचं प्रेम व्यक्त केलं जातं.

हे वाचा-सेलिब्रेटी न्युट्रीशनिस्ट ऋजुता दिवेकर यांनी दिला Quarantine Diet Plan

जगातल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये अनेक कवी, लेखकांनी आईबद्दलच्या भावना, तिची महती लेख, गोष्टी किंवा कवितांमधून व्यक्त केली आहे. मराठीत फ. मुं. शिंदे यांची 'आई' ही कविता प्रचंड गाजलेली आहे. त्यांच्या या कवितेच्या समारोपाच्या या ओळी आईविषयी बरंच काही नेटक्या शब्दांत सांगून जातात.

आई खरंच काय असते?

लेकराची माय असते

वासराची गाय असते

दुधाची साय असते

लंगड्याचा पाय असते

धरणीची ठाय असते

आई असते जन्माची शिदोरी

सरतही नाही उरतही नाही!

First published: May 5, 2021, 10:10 PM IST
Tags: mother

ताज्या बातम्या