Home /News /lifestyle /

आज आणि उद्या दिसणार Cold Moon; या वर्षातील ही शेवटची संधी सोडू नका

आज आणि उद्या दिसणार Cold Moon; या वर्षातील ही शेवटची संधी सोडू नका

यावर्षी शनी आण गुरु (Saturn and Jupiter) एकमेकांच्या जवळ आल्याची ग्रेट कंजक्शन (Great Conjunction) मोठी खगोलशास्त्रीय घटना अनुभवली. आता आकाश निरीक्षकांना (Sky Watchers) वेध लागले आहेत ते यावर्षीच्या आणखी एका पण अखेरच्या महत्वपूर्ण पर्वणीचे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 29 डिसेंबर: यावर्षी शनी (Saturn) आणि गुरु (Jupiter) हे दोन मोठे ग्रह एकमेकांच्या अगदी जवळ आल्याची मोठी खगोलशास्त्रीय घटना आपण अनुभवली. या खगोलशास्त्रीय घटनेला ग्रेट कंजक्शन (Great Conjunction) म्हणतात. आता आकाश निरीक्षकांना (Sky Watchers) वेध लागले आहेत ते यावर्षीच्या अखेरच्या पण महत्वपूर्ण पर्वणीचे. हे पर्व आहे पूर्ण चंद्र दर्शनाचे. याला कोल्ड मून (Cold Moon) असेही म्हटलं जातं. 2020 मधील 13वा आणि अखेरचा पूर्ण चंद्र दोन दिवस दिसणार आहे. संपूर्ण ग्रेगोरियन वर्षातील ही सर्वोच्च घटना म्हणून नोंदली जाईल. ऐतिहासिक गुरु-शनि युती ही आकाश निरीक्षकांसाठी एक मोठी पर्वणी ठरली होती. हा योग अनेक वर्षांनंतर होत असल्याने आकाश निरीक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता होती. त्यानंतर अशीच उत्सुकता कोल्ड मूनबाबतही आकाश निरीक्षकांमध्ये आहे. द ओल्ड फार्मर्स अल्मानाकने (The Old Farmers Almanac) दिलेल्या माहितीनुसार, 29 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 7 वाजून 54 मिनिटांनी आणि 30 डिसेंबर 2020 रोजी 8 वाजून 57 मिनिटांनी या पूर्णाकृती आणि मोठ्या चंद्राचे म्हणजेच कोल्ड मूनचे दर्शन होईल. सुर्यास्ताच्या काही वेळ अगोदरपासूनच लोकांना या डिसेंबरमधील पूर्ण चंद्राचे दर्शन होऊ लागेल, असेही अल्मानाकने स्पष्ट केले. 2020 मधील कोल्ड मून का 2020 आहे खास? हा कोल्ड मून (Cold Moon) हा संपूर्ण आकाशाच्या एका विशिष्ट उंचीवर असेल, त्यामुळे तो दीर्घकाळापर्यंत क्षितीजावर दिसेल. यंदाच्या वर्षातील सर्वात मोठी रात्र असलेल्या दिवशी चंद्राचे हे रुप दिसणार असून यास लाँग नाईट मून (Long Night Moon) असंही म्हटले जाते. चंद्राचे हे रुप दिसण्याचा हा दिवस ख्रिसमसनंतरचा आहे. त्यामुळेच या पूर्ण चंद्राला युरोपमध्ये Moon After Yule असे म्हणतात. (हे वाचा-काय सांगता?... या उद्योजकाने बांधलं समुद्रावर तरंगणारं घर) ओल्ड फार्मर्स अल्मानाकने दिलेल्या माहितीनुसार, कोल्ड मून हे नाव मुळच्या अमेरिकन लोकपरंपरेतून आले आहे. या परंपरेनुसार या शब्दाचा अर्थ 'या वर्षातील शांत परिस्थिती' असा होतो. फोर्ब्सने दिलेल्या वृत्तानुसार, पूर्ण चंद्राचे दर्शन जगभरात दोन वेगवेगळ्या तारखांना होणार आहे. अशिया पॅसिफिक (Asia Pacific), युरोप (Europe) आणि अफ्रिकेत (Africa) कोल्ड मून 30 डिसेंबरला दिसणार असून, दक्षिण आणि उत्तर अमेरिकेत (South And North America) तो 29 डिसेंबरला दिसेल. यानंतर पुढील तीन दिवस या पुर्ण चंद्राचे दर्शन घेता येणार असल्याचे फोर्ब्सने म्हणले आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या