किमोथेरेपीप्रमाणे होत नाहीत दुष्परिणाम; कॅन्सरग्रस्तांसाठी वरदान ठरतेय इम्युनोथेरेपी

किमोथेरेपीप्रमाणे होत नाहीत दुष्परिणाम; कॅन्सरग्रस्तांसाठी वरदान ठरतेय इम्युनोथेरेपी

इम्युनोथेरेपीचा उपयोग इतर आजार बरे करण्यासाठीदेखील होतो.

  • Last Updated: Aug 19, 2020 04:08 PM IST
  • Share this:

वातावरणातील अनिष्ट बदल अयोग्य खानपान आणि दिनचर्या यामुळे कॅन्सरचा धोका खूप वाढला आहे. myupchar.com चे ऐम्सशी संबंधित डॉ. उमर अफरोज यांनी सांगितलं, कॅन्सर होण्याचं मुख्य कारण वातावरणातील बदल आहेत. अनेकदा कॅन्सरच्या रुग्णांना कळतच नाही की त्यांना या भयंकर आजाराने ग्रासलं आहे. कॅन्सरवर उपचार करण्याच्या अनेक थेरेपी उपयुक्त सिद्ध झाल्या आहेत. म्हणूनच आज कॅन्सरला उपचार नाही असे म्हणता येत नाही. कॅन्सरसाठी साधारणपणे किमोथेरेपीचा उपयोग केला जातो. अलीकडच्या काळात इम्युनोथेरेपीचाही उपयोग केला जाऊ लागला आहे. जाणून घेऊया काय आहे इम्युनोथेरेपी –

अशी कार्य करते इम्युनोथेरेपी

शरीरातील रोगप्रतिकार शक्तीचे काम आहे बाहेरून आलेल्या संक्रमणाला ओळखून ते नष्ट करणं. पण ज्याची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असते, म्हणजेच आजारांशी लढण्याची ताकद कमी असते, त्यांच्या शरीरात संक्रमण पसरतं, त्यामुळे चांगल्या पेशी नष्ट होऊ लागतात. कॅन्सरच्या आजारातसुद्धा रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. कॅन्सरच्या रुग्णांना इम्युनोरेपीचा उपयोग करून बरं करता येतं. कॅन्सरच्या पेशीवर एक विशिष्ट प्रथिनाचं आवरण असतं, त्याला अँटीजेन म्हणतात. अँटीजेन रोग प्रतिकारकता निर्माण करतात. अँटीजेन असामान्य पेशींना ओळखून नष्ट करतात.

या थेरेपीमध्ये रसायनांचा उपयोग केला जातो

इम्युनोथेरेपीमध्ये काही रसायनं वापरली जातात. त्यांना बॉयोलॉजिकल रिस्पॉन्स मॉडीफायर असं म्हटलं जातं. तसं पाहिलं तर हे रसायन शरीरात नैसर्गिकरित्या उपलब्ध असतात. पण त्यांना वाढवण्यासाठी इम्युनोथेरेपीचा उपयोग केला जातो.

इम्युनोथेरेपीचे हे फायदे आहेत

शरीरातील रोगप्रतिकारक पेशी कॅन्सरच्या पेशींशी लढण्यास मदत करतात. त्याने रुग्णाची आजाराशी लढण्याची शक्ती इतकी मजबूत होते की तो कॅन्सरचा मुकाबला करू शकतो. असे अनेक लोक आहेत त्यांना इम्युनोथेरेपीचा खूप फायदा झाला आहे. प्रत्येक व्यक्तीच्या गरजांना ओळखून इम्युन-बूस्टर थेरेपी दिली जाते. रोगप्रतिकारक पेशी थेट कॅन्सरच्या पेशींवर हल्ला करतात, त्याने शरीरातील चांगल्या पेशींवर त्याचा वाईट परिणाम होत नाही. त्यामुळे कॅन्सर पुन्हा होण्याची शक्यता कमी असते. इम्युनोथेरेपीचे कुठलेही इतर दुष्परिणाम नाहीत. या थेरेपीचा उपयोग इतर आजार बरे करण्यासाठी पण होतो.

इतर थेरेपींपेक्षा जास्त चांगली आहे इम्युनोथेरेपी

इम्युनोथेरेपीचे कुठलेच दुष्परिणाम नाहीत, शरीरावर या थेरेपीचा कुठलाही वाईट प्रभाव पडत नाही. तर दुसरीकडे किमोथेरेपीमुळे रुग्णाची रोग प्रतिकारशक्ती कमजोर होते, कारण या थेरेपीमध्ये शरीरातील चांगल्या पेशी देखील नष्ट होतात. नेहमी असं दिसून येतं की किमोथेरेपीनंतर रुग्नाचे केस पूर्णपणे गळून जातात. म्हणूनच आजकाल इम्युनोथेरेपी सगळ्यात उत्तम सिद्ध होत आहे. जर कॅन्सरने पुढची पायरी गाठली असेल तर इम्युनोथेरेपीचा उपयोग केला जातो. त्याने कॅन्सर लवकर बरा होतो.

myupchar.com च्या डॉ. आकांक्षा मिश्रा म्हणाल्या, कॅन्सरसारख्या भयंकर आजारापासून वाचण्यासाठी आपल्या आयुष्यात योग्य आहार आणि स्वस्थ्य जीवनशैली आचरणात आणली पाहिजे, त्याने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते आणि आजार दूर राहतात.

अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - आरोग्याच्या सामान्य समस्या

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: August 19, 2020, 4:08 PM IST

ताज्या बातम्या