फॅशनेबल चपला भोवरीसाठी ठरतायेत कारणीभूत; अशी घ्या काळजी

फॅशनेबल चपला भोवरीसाठी ठरतायेत कारणीभूत; अशी घ्या काळजी

पायाला भोवरी (foot corn) आल्यावर चालणंही अशक्य होतं.

  • Last Updated: Sep 15, 2020 02:00 PM IST
  • Share this:

फॅशनच्या नादात आकर्षक दिसण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे फुटवेअर आणि त्यांची विक्री बाजारात वाढली आहेत. आज प्रत्येकाला नवीन ट्रेंड अनुसरण करायचा आहे. बर्‍याच वेळा, नवीन-फॅशनचे पादत्राणे बाजारात आरामदायक नसतात, तरीही लोक ते घालतात आणि फूटकॉर्न सारख्या समस्या उद्भवतात. फूटकॉर्न म्हणजे काय, त्रप ची समस्या काय आहे ते जाणून घेऊया.

फूटकॉर्न म्हणजे काय?

फूटकॉर्न त्वचेवर होतात. ते कडक असतात आणि त्याचे थर जाड होतात. सहसा ते पायाच्या बोटांमध्ये, अंगठ्याला किंवा तळव्याला होतात. ही एक शारीरिक समस्या आहे, यामुळे खूप वेदना होतात आणि चालतानादेखील त्रास होतो. जर त्याचा वेळीच इलाज केला नाही तर भोवरी वाढत जाते.

फूटकॉर्नची लक्षणं

myupchar.com शी संबंधीत एम्सचे डॉ. उमर अफरोज यांनी सांगितलं, पायाच्या बोटांवर, तळाशी एक गोल तयार होतो. त्याच्या त्वचा लालसर होते. चालताना त्रास होतो, त्वचेवर कोरड्या मेणासारखा थर असतो. ही सर्व भोवरीची लक्षणंअसू शकतात.

फूटकॉर्न होण्याची कारणं

  • फूटकॉर्न बहुतेक वेळा चुकीची पादत्राणं घातल्यामुळे उद्भवतात. म्हणूनच आपल्या पायासाठी नेहमी आरामदायक पादत्राणं निवडा.
  • चपलांशिवाय खूप वेळ जमिनीवर चालण्याने पायावर दाब येतो त्याने भोवरी होते. जे लोक खूप वेळ घट्ट बूट किंवा सँडल घालतात त्यांनाही भोवरी होऊ शकते.
  • सतत खेळणाऱ्या खेळाडूंना देखील भोवरी होऊ शकते. पायाच्या एकाच भागावर सतत दबाव पडल्याने भोवरी होत असते. ही समस्या जे लोक सडपातळ असतात किंवा वयाच्या 50 वर्षांपेक्षा जास्त असतात त्यांना जास्त होते.

असा करा भोवरीवर उपचार

भोवरी होऊ नये म्हणून अशा चपला, बूट वापरणं बंद करा ज्याने तळव्यावर दबाव येतो. बूट घालत असाल तर मोजे जरूर वापरा त्याने वेदना होणार नाहीत.  भोवरीसाठी एक्युपंक्चर उपचारांची मदत घेऊ शकता. या शिवाय होमिओपॅथिक औषधंही उपयोगी आहेत. याने भोवरी ठीक होते.

त्वचेवर सूज असेल तर बर्फाने शेका त्याने सूज उतरते. शिवाय बाजारात कॉर्न प्लास्टरदेखील मिळू लागले आहेत. हे प्लास्टर गोलाकार असतात. याला भोवरीवर लावल्याने आराम मिळतो आणि हळूहळू भोवरी बरी होते. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्त शुक्ला यांनी सांगितलं, काही घरगुती उपचार जसं एरंडेलच्या तेलाची मालिश, सैंधव मीठ, सफरचंदाचे व्हिनेगर, लसूण, पपई, लिंबू, किंवा जीवनसत्व ई असलेल्या पदार्थांच्या सेवनाने भोवरी ठीक होण्यास मदत होते.

अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - कुरुप

न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.

अस्वीकरण: आरोग्य विषयक समस्या आणि त्याविषयीचे उपचार याची माहिती सर्वाना सहज सुलभतेने कुठल्याही मोबदल्याशिवाय उपलब्ध व्हावी हा या लेखांचा हेतू आहे. या लेखनामध्ये प्रकाशित माहिती म्हणजे तज्ञ अधिकृत डॉक्टरांच्या तपासणी, रोगनिदान, उपचार आणि वैद्यकीय सेवेचा पर्याय नाही. जर तुमची मुले, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक यापैकी कुणीही आजारी असतील, त्यांना याठिकाणी वर्णन केलेली काही लक्षणे दिसत असतील तर, कृपया तत्काळ आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटा. डॉक्टरांच्या मार्गदर्शना शिवाय स्वतः, तुमची मुले, कुटुंब सदस्य, किंवा अन्य कुणावरही वैद्यकीय उपचार करू नका किंवा औषधे देवू नका. myUpchar आणि न्यूज18 यावर प्रकाशित माहिती, त्या माहितीच्या अचूकतेवर, या माहितीच्या परिपूर्णते वर विश्वास ठेवल्याने, तुम्हाला कुठलीही हानी झाली किंवा काही नुकसान झाले तर, त्याला myUpchar आणि न्यूज18 जबाबदार असणार नाही, हे तुम्हाला मान्य आहे, आणि त्याच्याशी तुम्ही सहमत आहात.

First published: September 15, 2020, 2:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading