अती पाणी प्यायल्यामुळे होतात 'या' समस्या, येऊ शकतो मृत्यू

अती पाणी प्यायल्यामुळे होतात 'या' समस्या, येऊ शकतो मृत्यू

उत्तम आरोग्यासाठी, चांगल्या त्वचेसाठी भरपूर पाणी प्या असा सल्ला नेहमी दिला जातो. पण भरपूर म्हणजे किती हे समजून घेतलं पाहिजे. कारण प्रमाणापेक्षा पाणी प्यायल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. कधी कधी यात मृत्यूही येतो.

  • Share this:

मुंबई, 16 जुलै : पाणी हा सजीवांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. पाण्याशिवाय जीवन अशक्य आहे. त्यामुळे सध्या पृथ्वी व्यतिरिक्त इतर ग्रहांवरही पाण्याचा शोध घेतला जात आहे.  उत्तम आरोग्यासाठी, चांगल्या त्वचेसाठी भरपूर पाणी प्या असा सल्ला नेहमी दिला जातो. पण भरपूर म्हणजे किती हे समजून घेतलं पाहिजे. कारण प्रमाणापेक्षा पाणी प्यायल्यास गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. कधी कधी यात मृत्यूही येतो. आपल्या शरीरात 60% पाणी असतं तसंच मेंदूचा 75% भाग हा पाण्यानं व्यापलेला आहे. पाण्याशिवाय मनुष्यच काय पण इतर कुठलाही सजीवही जगू शकत नाही. पाणी प्यावं, भरपूर पाणी प्यावं हा आरोग्य सल्ला अनेक वेळा दिला जातो. पोटाच्या तक्रारी दूर होण्यासाठी, चांगल्या त्वचेसाठी, केसांच्या आरोग्यासाठी सतत पाणी प्यावं असंही सांगितलं जातं. पाणी कमी प्यायलं गेलं तर डिहायड्रेशन होतं आणि मृत्यू येण्याएवढं ते गंभीर असतं. पण जसं कमी पाण्यामुळे नुकसान होतं, तसं प्रमाणाबाहेर पाणी प्यायल्यामुळेसुद्धा नुकसान होऊ शकतं. त्यासाठी जाणून घ्यायला हवं..  मानवी शरीरात किती पाण्याची आवश्यकता असतं आणि प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्यास काय समस्या होऊ शकतात.

काय आहे हायपोनाट्रेमिया

वैज्ञानिकांच्या संशोधननुसार आपल्या शरीरात पाण्याची जेवढी आवश्यकता आहे. त्यापेक्षा जास्त पाणी प्यायल्यास आपल्या शरीराचं नुकसानही होऊ शकतं. अति प्रमाणात पाण्याचं सेवन तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरत यात तुमचा मृत्यूही होऊ शकतो. संशोधनानुसार पाण्याच्या अति सेवनानं हायपोनाट्रेमिया नावाची एक समस्या निर्माण होते. कमी वेळात खूप जास्त पाणी प्यायल्यानं ही समस्या निर्माण होते.

हायपोनाट्रेमिया एक इलेक्ट्रोलाइट असंतुलन आहे. सामान्यपणे आपल्या शरीरात आपल्या शरीरातील रक्तात 135 ते 145 एमईक्यू प्रति लीटर सोडियमची मात्र असते.

 दिवसाच्या सुरुवातीला या गोष्टी केल्या तर यश तुमचंच!

शरीरात सोडियमचं प्रमाण संतुलित असणं खूप गरजेच असतं मात्र जास्त पाणी प्यायल्यानं हे प्रमाणं कमी होतं आणि यामध्ये व्यक्तीचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो.

काय आहे ओव्हरहायड्रेशन?

हायपोनाट्रेमियाच्या आधी प्रत्येकालाच एक समस्या नेहमी येते ती म्हणजे, ओव्हरहायड्रेशन. जास्त पाणी प्यायल्यानं तुमच्या शरीराच तापमान, अपचन आणि उत्सर्जन यासारख्या समस्या येतात. यालाच ओव्हरहायड्रेशन म्हणतात. जर शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सची जास्त प्रमाणात घट झाली तर ओव्हरहायड्रेशन नंतर हायपोनाट्रेमियाची स्थिती येते. ज्यामुळे मृत्यू ओढावू शकतो.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण; 150 वर्षांनंतर येतोय 'हा' दुर्मीळ योग

आवश्यक तेवढंच पाणी प्या.

अनेकदा जास्त पाणी प्या अशा सूचना दिल्या जातात. पण अशा सुचनांचं पालन करण्यापेक्षा तुम्हला तहान लागेल एवढंच पाणी प्या. प्रत्येकाच्या शरीराची गरज कमी अधिक असते. त्यामुळे ऋतूनुसार त्या-त्या व्यक्तीच्या शारीरिक क्षमतेनुसार त्याला लागणाऱ्या पाण्याचं प्रमाण कमी अधिक असतं.

सामान्यपणे एक तासात 1 लीटर पाणी प्यायला हवं असं मानलं जातं. मात्र हे प्रमाण प्रत्येकाच्या शरीरासाठी योग्य असतंच असं नाही. दिवसभरातून जवळपास 4 ते 8 लीटर पाणी प्यावं असं मानलं जातं मात्र यातही तुमच्या शरीराची गरज ओळखून तसेच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पाणी प्यायला हवं. तसेच पाणी पिण्याच्या वेळा आणि सवयी बदलायला हव्यात.

नदीवर तरंगणारं हॉटेल : बांधून तयार होण्यापूर्वीच बुकिंग सुरू

==================================================================

VIDEO : मुलांना मांडीवर घेऊन वाचवलं अन् तिने मृत्यूला कवटाळलं!

First Published: Jul 16, 2019 08:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading