Home /News /lifestyle /

व्यायामानंतर श्वास घ्यायला त्रास म्हणजे अस्थमा असतो का?

व्यायामानंतर श्वास घ्यायला त्रास म्हणजे अस्थमा असतो का?

अनेकांमध्ये व्यायामादरम्यान (excercise) किंवा व्यायामानंतर दम्यासारखी (asthma) लक्षणं दिसतात.

  • myupchar
  • Last Updated :
    फिट आणि हेल्दी शरीरासाठी नियमित व्यायाम (excercise) करणं आवश्यक आहे. मात्र अनेकांना वर्कआउट्स केल्यानंतर दम्याची (asthma) लक्षणं दिसून येतात. व्यायामादरम्यान किंवा नंतर खोकला, श्वास घेण्यात अडचण, घरघर, छातीत घट्टपणा किंवा वेदना होतात. दमा हा श्वसन रोग आहे ज्यामुळे श्वास घेण्यास अडचण येते. myupchar.com शी संबंधित एम्सचे डॉ. नबी वाली म्हणाले, व्यायाम केल्यानं फुफ्फुसातील वायुमार्ग संकुचित होतो आणि व्यायामामुळे ही समस्या उद्भवते. याला वैद्यकीय भाषेत एक्सरसाइज इंड्युस्ड ब्राँकायटिस (excercise induceed bronchitis) म्हणतात आणि सोप्या भाषेत सांगायचं तर व्यायामाद्वारे होणारा दमा देखील म्हणतात. हे दम्याचे मूळ कारण नसलं तरी दमा असलेल्या लोकांमध्ये श्वासोच्छवासाच्या समस्येस चालना देणारी अनेक कारणांपैकी एक म्हणजे व्यायाम होय. दम्याचा त्रास असलेल्या जवळजवळ 90 टक्के लोकांमध्ये एक्सरसाइज इन्ड्युस ब्रोन्कोकॉन्ट्रिक्शन होतो. व्यायामादरम्यान काही घटक दम्याचा लक्षणांसाठी कारणीभूत असतात ज्यात थंड आणि कोरडी हवा, वायू प्रदूषण किंवा धूर, उच्च परागकण संख्या, जोरात श्वास घेणे, क्लोरीनचा धूर, अप्पर रेस्पीरेटरी इन्फेक्शन, जिममधील क्लीनर, परफ्यूम, ताजे पेंट किंवा नवीन उपकरणं, स्वच्छ उपकरणांसाठी रासायनिक द्रव्यांचा वापर समाविष्ट आहेत. हवेच्या कोरडेपणामुळे आणि सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमानात व्यायामाद्वारे दम्याचा त्रास होण्याची शक्यता असते. कोरड्या हवेमध्ये वेगवान श्वासोच्छ्वास वायुमार्ग निर्जलीकरण करतो, ज्यामुळे तो संकुचित होतो आणि यामुळे शरीरातील वायूप्रवाह थांबतो. हे वाचा - कोरोनापासून बचावासाठी कधी आणि किती वेळा प्यावा काढा? जर व्यायामादरम्यान किंवा त्या नंतर होणाऱ्या दम्याचा त्रासावर ताबडतोब उपचार केला गेला नाही आणि ही लक्षणं 60 मिनिटांपेक्षा जास्त काळ राहिल्यास आपल्यावर परिणाम करू शकतात,.अशा लोकांना डॉक्टर व्यायामापूर्वी किंवा दीर्घ काळासाठी स्थिती नियंत्रित करण्यासाठी नियमित औषधाचा सल्ला देऊ शकतात. लोक व्यायामादरम्यान किंवा नंतर होणार्‍या दम्याच्या लक्षणांची तीव्रता रोखू किंवा कमी करू शकतात. औषध वापरण्याविषयी डॉक्टरांच्या सूचनांचे अनुसरण करा. हे वाचा - Parkinson मुळे पुतिन राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा देणार? काय आहे का आजार? दमा असलेल्या रुग्णांनी व्यायामाच्या वेळीही त्यांच्याबरोबर इनहेलर ठेवावा. व्यायामापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवा जसं की व्यायामापूर्वी हलक्या एक्सरसाईज करा. यामुळे वायुमार्ग मोकळा होईल आणि श्लेष्मा गोठण्यास प्रतिबंध होईल. जर आपण थंडीच्या दिवसात घराबाहेर व्यायाम करत असाल तर नाक आणि तोंडाला स्कार्फ लावा. व्हायरल इन्फेक्शन असल्यास व्यायाम टाळा. असे व्यायाम करा, ज्यामुळे दम्यासारखी समस्या उद्भवणार नाही. जोरदार श्वास घेण्याच्या व्यायामामुळे वायुमार्गात अडथळा येण्याची शक्यता असते. अधिक माहितीसाठी वाचा आमचा लेख - दम्यावर: लक्षणे, कारणे, उपचार, औषध... न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या, विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार, डॉक्टरांच्या सोबत काम करून, आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
    First published:

    Tags: Fitness, Health, Lifestyle

    पुढील बातम्या