News18 Lokmat

'या' 5 घरगुती उपायांनी दूर पळवा गुडघेदुखी

आजीबाईच्या बटव्यात बरीच औषधं दडलीयत. म्हणजे तुम्ही घरच्या घरी उपाय करून गुडघेदुखीच्या त्रासातून मोकळं होऊ शकता. जाणून घेऊ घरगुती औषधं.

News18 Lokmat | Updated On: Mar 27, 2019 05:33 PM IST

'या' 5 घरगुती उपायांनी दूर पळवा गुडघेदुखी

मुंबई, 27 मार्च : गुडघेदुखी हल्ली सर्वसामान्य झालीय. पूर्वी वाढत्या वयात व्हायची. पण हल्ली हा त्रास तरुणांमध्येही आढळतो. गुडघेदुखीमुळे अनेक जण डाॅक्टरांकडे उपचारासाठी जात असतात. पण अनेक बराच काळ औषधं घेऊनही उपयोग होत नाही. दुखणं जैसे थे राहातं.

तुम्हाला हे माहीत आहे का, की आजीबाईच्या बटव्यात बरीच औषधं दडलीयत. म्हणजे तुम्ही घरच्या घरी उपाय करून या त्रासातून मोकळं होऊ शकता. जाणून घेऊ घरगुती औषधं

बर्फ

तुमचे गुडघे दुखतायत, ते सुजलेत तर तुम्हाला बर्फ वापरून आराम वाटेल. एका टाॅवेलमध्ये बर्फाचे तुकडे बांधा आणि दुखऱ्या जागेवर 10 ते 15 मिनिटं रगडा. गुडघेदुखी कमी होईल.

सफरचंदाचा रस

Loading...

एक चमचा सफरचंदाचा रस पाण्यात घालून ते पाणी प्या. हे नियमित केल्यानं गुडघ्याचं दुखणं दूर पळतं.

ढोबळी मिरची

लाल आणि काळ्या रंगाची ढोबळी मिरची या दुखण्यावर औषधी आहे. त्याचं सेवन केल्यानं दुखणं कमी होईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

आलं

आल्याचा काढा गुडघेदुखीवर रामबाण उपाय. ज्यांना हे दुखणं आहे, त्यांनी आल्याचा काढा नियमित घ्यावा. पेशींना दुखापत झाली असेल तर त्यावरही परिणामकारक आहे.

हळद

नॅशनल सेंटर फॉर कंप्लीमेंट्री अँड अल्टरनेटिव मेडिसिनमध्ये आलेल्या माहितीनुसार हळद गुडघेदुखीवर परिणाम करते. हळद सांधेदुखीवरही प्रभावी आहे. गरम दुधात हळद टाकून प्यायलं तर नक्कीच आराम पडतो.

नियमित व्यायाम

गुडघेदुखीवर डाॅक्टरांचा सल्ला घेऊन नियमित व्यायाम करा. शिवाय गरम पाण्यानं शेक दिला तरीही फरक जाणवेल.


VIDEO : अशा प्रकारे 180 सेकंदात पाडला लाईव्ह सॅटेलाईट; मिशन शक्ती कसं झालं यशस्वी पाहा


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: knee Pain
First Published: Mar 27, 2019 05:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...