मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Immunity वाढवतं, BP नियंत्रणात ठेवतं हे फळ; फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

Immunity वाढवतं, BP नियंत्रणात ठेवतं हे फळ; फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

किवी हे पोषक घटकांचे जणू पॉवरहाऊस आहे. आरोग्यासाठी त्याचे आश्चर्यकारक फायदे पाहता, आरोग्य तज्ज्ञ प्रत्येकाला किवी खाण्याची शिफारस करतात. किवी (kiwis fruit) खाल्ल्याने शरीराला कसा फायदा होतो ते जाणून घेऊया.

  • Published by:  News18 Desk
नवी दिल्ली, 06 ऑक्टोबर : लहान हिरव्या रंगाचं किवी फळ विविध गुणांनी समृद्ध आहे. त्यात जीवनसत्त्वे बी, सी, अँटिऑक्सिडंट्स, फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियम विपुल प्रमाणात (kiwis fruit amazing benefits) आढळतात. किवी हे पोषक घटकांचे जणू पॉवरहाऊस आहे. आरोग्यासाठी त्याचे आश्चर्यकारक फायदे पाहता, आरोग्य तज्ज्ञ प्रत्येकाला किवी खाण्याची शिफारस करतात. किवी (kiwis fruit) खाल्ल्याने शरीराला कसा फायदा होतो ते जाणून घेऊया. किवी डीएनए चांगला ठेवते - तणाव, धूम्रपान, कर्करोग, केमोथेरपी, रेडिएशन, अधिक औषधे आणि प्रदूषण यांचा आपल्या डीएनएवर परिणाम होतो. यामुळे मूत्रपिंड (किडनी), यकृत आणि मेंदूशी संबंधित अनेक प्रकारचे रोग होतात. किवी डीएनए चांगला ठेवण्याचे काम करते. संशोधनात असे दिसून आले आहे की, किवीच्या नियमित सेवनाने कोलन कर्करोगाचा धोका कमी होतो. हे वाचा - Job Alert: जिल्हा न्यायालय गडचिरोली इथे 7वी पास उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी; तब्बल 47,600 रुपये मिळणार पगार रोग प्रतिकारशक्ती वाढते - किवीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि शरीराला रोगांपासून दूर ठेवते. किवीला उत्तम प्रतिकारशक्ती वाढवणारे फळ मानले जाते. रक्तदाब नियंत्रित करते - 2014 मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार एका दिवसात सुमारे 2-3 किवी खाल्ल्याने रक्तदाब कमी होतो. हे जास्त काळ खाल्ल्याने उच्च रक्तदाब, स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका किंवा हृदयाशी संबंधित आजार दूर राहतात. रक्त गोठणे कमी करते - किवी रक्त गोठण्यास कमी होण्यास मदत करतात. दररोज २-३ किवी खाल्ल्याने रक्त गोठणे दूर होऊ लागते. हे फळ रक्तातील चरबीचे प्रमाण कमी करण्यास मदत करते. हे वाचा - ऑनलाइन ऑर्डर केली पॉवर बँक, घरी आली विट; अनेकांनी शेअर केला खरेदीचा भयंकर अनुभव जखम भरण्यास मदत करते - जर तुम्हाला दुखापत झाली असेल किंवा तुमच्यावर शस्त्रक्रिया झाली असेल तर नक्कीच किवी खा. यामुळे तुमची ताकद जलद भरून येईल. किवीमध्ये आढळणारे नैसर्गिक संयुगे आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ जखमेला लवकर भरून काढतात. हे मधुमेही रुग्णांच्या बेडसोर्स, बर्न्स आणि पायांच्या अल्सरमध्ये देखील मदत करते.
First published:

Tags: Health, Health Tips

पुढील बातम्या