• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • प्लेटलेट्स वाढवणारं किवी 5 आजारांनादेखील ठेवतं दूर

प्लेटलेट्स वाढवणारं किवी 5 आजारांनादेखील ठेवतं दूर

पावसाळ्यात संसर्गाचा धोका जास्त असतो, अशावेळी जर शरीराला सर्वच पोषक द्रव्ये एकत्र मिळाले तर फायदा होतो. किवी असंच फळ आहे त्यासारखं दुसरं नाही.

 • myupchar
 • Last Updated :
 • Share this:
  पावसाळ्यात शरीराच्या कमजोर प्रतिकारशक्तीला उत्तम ठेवण्यासाठी किवी हे फळ लाभदायक आहे. किवीमध्ये अनेक पौष्टिक द्रव्ये असतात. हे असे फळ आहे जे पावसाळ्यात होणाऱ्या अनेक आजारांपासून आपल्याला वाचवू शकते. पावसाळ्यात संसर्गाचा धोका जास्त असतो, अशावेळी जर शरीराला सर्वच पोषक द्रव्ये एकत्र मिळाले तर फायदा होतो. किवी असंच फळ आहे त्यासारखं दुसरं नाही. डॉक्टरसुद्धा पावसाळ्यात किवी फळ खाण्याचा सल्ला देतात. myupchar.com च्या डॉ. अप्रतीमा गोयल यांनी सांगितलं, चेहऱ्यावरील सुरुकुत्या कमी करण्यासाठीदेखील कीवीचा उपयोग होतो. प्लेटलेट्स वाढवते किवी किवी या फळाचा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे की ते शरीरातील रक्तामध्ये घटणाऱ्या प्लेटलेट्स (तंतू कणिका) लवकर वाढवतात. पावसाळ्यात डेंग्यूसारखा संसर्गजन्य आजार पसरतो. डेंग्यूमध्ये रुगांच्या शरीरातील प्लेटलेट्स वेगानं कमी होऊ लागतात, अशा परिस्थितीत किवी खाणं लाभदायक आहे. किवी पचन सुधारते पावसाळ्यात पचनाच्या तक्रारी वाढतात. त्यासाठी किवी फळाचा रस घेणं लाभदायक आहे. किवीमधील तंतुमय पदार्थ पचनक्रिया सुधारतात आणि त्याने पोटाच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळते. ज्या लोकांना वात, अपचन, बद्धकोष्ठता या समस्या आहेत त्यांनी किवीचा रस रोज प्यायला हवा. त्याने त्यांना लवकर बरं वाटतं. अस्थमाच्या रुग्णांसाठी रामबाण उपाय किवीचा रस जर अस्थमाच्या रुग्णांनी घेतला तर त्यांना त्याचा सगळ्यात जास्त फायदा होतो. अस्थमामध्ये श्वसन क्रिया सुरळीतपणे काम करण्यासाठी किवीमध्ये असलेले गुण लाभदायक होतात. फुफ्फुसांशी संबंधित अन्य आजारांमध्येदेखील किवी उपयुक्त आहे. प्रतिकारशक्ती चांगली करतं किवी कोरोना संक्रमणाच्या काळात शरीराची रोग प्रतिकारशक्ती उत्तम राखणं आवश्यक आहे. किवी फळ हे काम करतं. याचा रस रोग प्रतिकारक पेशींना सक्षम ठेवतो आणि प्रतिकारशक्तीला मजबूत करतो. किवीमध्ये एक टक्का लोह असते, त्यामुळे ज्यांच्या शरीरात हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं त्यांच्यासाठी ते फायद्याचे आहे. गर्भवती महिलांनी या फळाचं सेवन जरूर केलं पाहिजे. myupchar.com चे डॉ. लक्ष्मीदत्ता शुक्ला यांच्यानुसार, मुलांना किवी खाऊ घातलं तर त्यांचा विकास वेगानं होतो. हृदय रुग्णांनी जरूर खावं किवी अयोग्य दिनक्रमाने एका विशिष्ट वयानंतर अनेकांना उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते. रक्तवाहिन्यांमध्ये निर्माण होणारं अडथळे आणि वाढलेलं कोलेक्ट्रोल हे उच्च रक्तदाबाचे मुख्य कारण आहेत. किवीमध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असतं ते उच्च रक्तदाबाची समस्या कमी करण्यात लाभदायक आहे. दृष्टी चांगली होते वैज्ञानिक अभ्यासानुसार, किवी फळाचा रस प्यायल्यानं डोळ्यांची दृष्टी जाण्याच्या समस्येपासून वाचता येते. आजकाल लोकांना अनेक तास संगणकावर आणि मोबाइलवर काम करावं लागतं त्यामुळे दृष्टी कमजोर होण्याचा धोका वाढतो. त्यांनी रोज किवी खावं. किवी हे जीवनसत्व सी आणि ए चा मुख्य स्त्रोत आहे. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख निरोगी राहण्याच्या टिप्स न्यूज18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्याविस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत. myUpchar.com या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकारडॉक्टरांच्या सोबत काम करूनआपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात.
  First published: