मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

चॉपिंग बोर्ड निवडण्यासाठी या Tips आहेत फायद्याच्या; संपेल भाजी चिरताना होणारा त्रास

चॉपिंग बोर्ड निवडण्यासाठी या Tips आहेत फायद्याच्या; संपेल भाजी चिरताना होणारा त्रास

हल्ली मुलांना स्वयंपाक करायची आवड लागली आहे. मुलांना जेवण बनवायचं असेल एखादी डिश करायची असेल तर, त्यांना त्यात मदत करा किंवा त्यांची मदत घ्या.

हल्ली मुलांना स्वयंपाक करायची आवड लागली आहे. मुलांना जेवण बनवायचं असेल एखादी डिश करायची असेल तर, त्यांना त्यात मदत करा किंवा त्यांची मदत घ्या.

परफेक्ट चॉपिंग बोर्ड (Perfect Chopping Board) निवडायचा कसा हा प्रश्न असतोच. चांगला चॉपिंग बार्ड मिळाला नाही तर,वेळ वाचण्याऐवजी किचनच्या कामातच जास्त वेळ जातो (Time Wasting).

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली,03 ऑगस्ट : भाजी चिरण्यासाठी (Vegetable Cutting) वापरली जाणारी पारंपरिक पद्धतीची विळी केव्हाच आउटडेटेड (Out-dated) झाली आहे. आत्तच्या मॉडर्न किचनमध्ये (Modern kitchen) फुड प्रोससर किंवा चॉपिंग बोर्ड कटिंगसाठी  (Chopping Board For Cutting) वापरला जातो. दरवेळी फुड प्रोससर (Food Processor) वापरणं शक्य नसतं त्यामुळे गृहीणी सर्रास चॉपिंग बोर्ड वापरतात शिवाय त्यावर भाज्या चिरणं सोप आणि वेळ वाचवणारं असतं. पण परफेक्ट चॉपिंग बोर्ड (Perfect Chopping Board) निवडायचा कसा हा प्रश्न असतोच. चांगला चॉपिंग बार्ड मिळाला नाही तर,वेळ वाचण्याऐवजी किचनच्या कामातच जास्त वेळ जातो (Time Wasting). परफेक्ट चॉपिंग बोर्ड मिळण फार कठीण असतं. कारणं बाजारात विवध प्रकारचे, आकाराचे चॉपिंग बोर्ड उपलब्ध असतात. त्यामुळे खरेदीसाठी गेल्यावर नेमकं काय घ्यायचं हा प्रश्न पडतो. त्यामुळे चॉपिंग बोर्ड निवडताना या सोप्या टिप्स (Easy Tips)वापरा म्हणजे, भाज्या, फळं आणि मांससुद्धा कटिंग करता येईल.

('या' पद्धतीने करा चविष्ट कोशिंबीर तयार; इम्युनिटी वाढेल, वजन होईल कमी)

लाकडी चॉपिंग बोर्ड घ्या

बाजारात लाकडाचे, प्लास्टिकचे, स्टील आणि बांबूचेही चॉपिंग बोर्ड उपलब्ध आहेत. पण लाकडी चॉपिंग बोर्ड स्वयंपाकघरासाठी चांगला असतो. यामुळे भाज्या पटकन कापल्या जातील आणि चाकूची धार खराब होणार नाही. तसंच भाज्या किंवा मांस कापताना जास्त आवाज येणार नाही. चांगल्या लाकडाचा भक्कम चॉपिंग बोर्ड निवडा.

कटिंग स्पीड तपासा

चॉपिंग बोर्डवर कटिंग करताना सहजता महत्त्वाची आहे. त्यामुळे त्यावर सुरीने चिरत असताना स्मूद कटिंग व्हायला हवी. त्यासाठी चॉपिंग बोर्डची जाडी, लांबी, क्वॉलिटी पहा. जेवढा गुळगुळीत असेल तेवढा चांगला.

(डासांनीच काढणार मलेरियाचा काटा; मादी डासांना नपुसंक बनवून होणार आजाराचा खात्मा)

चॉपिंग बोर्डचा आकार पाहा

चॉपिंग बोर्ड विकत घेताना त्याच्या आकारालाही महत्त्व द्या. फार छोट्या चॉपिंग बार्डमुळे भाज्या चिरताना बाहेर सांडतील. शक्यतो 12 बाय 18 किंवा 15 बाय 20 इंचाचा चॉपिंग बोर्ड निवडणं चांगलं. यामुळे भाज्या खाली सांडणार नाहीत आणि किचन प्लॅटफॉर्म खराब होऊन जास्त साफसफाई करावी लागणार नाही.

(Kaolin clay: ही माती त्वचेवर करेल चमत्कार; नितळ, कुठे मिळेल, कशी वापराल?)

बाजारात गोल, चौकनी आणि आयताकृती चॉपिंग बोर्ड मिळतात. शक्यतो आयताकृतीच घ्यावा म्हणजे कापलेल्या भाज्या त्यावरच ठेवता येतात. चॉपिंग बोर्ड वापरल्यानंतर स्वच्छ धुवून ठेवावा. यावर भाज्या तशाच राहिल्या तर, बुरशी पकडण्याची शक्यता असते.

First published:

Tags: Lifestyle, Tips, Vegetables