नवी दिल्ली, 24 डिसेंबर : आपल्या देशात गव्हाच्या पिठाच्या पोळ्या (चपाती) बहुतेक सगळीकडे बनवल्या जातात. सगळीकडे रोटी किंवा पोळी किंवा भाकरी बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या असल्या तरी याशिवाय पोटही भरत नाही हेच खरं. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, डाळींसह गोल आणि मऊ पोळ्यांच्याही वेगवेगळ्या प्रकारांचा आहारात समावेश केला जातो. पोळी गव्हाच्या पिठापासून बनवली जाते. यासाठी पीठ, पाणी आणि तेलाच्या साहाय्याने विशिष्ट पद्धतीनं पीठ मळलं जातं. पीठ जितकं चांगलं मळावं तितकी पोळी चांगली (Kitchen Tips) बनते असे म्हणतात.
पीठ चांगले मळल्यानंतर मळलेलं पीठ थोड्या वेळाने घट्ट होतं, ज्यामुळं त्याच्या पोळ्यादेखील कडक होतात, अशी तक्रार अनेक महिला करतात. पोळी कडक होण्यामागील अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे कणीक व्यवस्थित मळलेली नसणं. आज अशा काही टिप्स जाणून घेऊ, ज्यामुळं तुमची पोळी जास्त काळ मऊ (dough fresh for a long time) राहण्यास मदत होईल. टीव्ही 9 ने यासंबंधी माहिती दिली आहे.
जास्त पाणी वापरणं टाळा
जेव्हा तुम्ही पोळीसाठी पीठ मळून घ्याल, तेव्हा त्यात सुरुवातीलाच जास्त पाणी घालू नका. जास्त पाण्यानं कणीक व्यवस्थित मळणं कठीण होतं. पीठ मळताना नेहमी थोडं थोडं पाणी घाला आणि जर पीठ खूप सैल झालं तर थोडं कोरडं पीठ घालून कणकेचा गोळा पुन्हा मळावा.
मळताना थोडं तेल घाला
पोळ्यांचं पीठ मळताना कणकेत थोडं तेल किंवा तूप घालावं. तेल किंवा तूप घातल्यानं पोळ्या बराच काळ मऊ राहतात.
कोमट पाणी किंवा दूध वापरा
कणीक मऊ करण्यासाठी, नेहमी कोमट पाणी किंवा थोडं दूध पिठात घालावं. गव्हाची मऊ कणीक तयार करण्यासाठी पीठ 10-15 मिनिटं चांगली मळून घ्या. कणीक ओल्या कापडानं झाकून ठेवा.
हे वाचा - तुम्हीही ब्रेडचा करपलेला भाग खाता का? मग महाभयंकर आजाराला निमंत्रण देताय
हवाबंद डब्यात साठवा
पीठ उरले असेल तर ते कधीही फ्रीजमध्ये उघडं ठेवू नये. नाहीतर, ते खराब होईल. कणीक फ्रिजमध्ये ठेवण्यासाठी नेहमी हवाबंद डब्यात ठेवा.
कणकेवर तूप किंवा तेल वापरावं
पीठ खराब होऊ नये म्हणून त्यावर तूप किंवा तेलाचा पातळ थर लावून फ्रीजमध्ये ठेवू शकता. कणकेला तेल लावल्यानं ती कोरडी किंवा काळी होत नाही. म्हणून जेव्हा जेव्हा पोळ्या बनवल्या जातात, तेव्हा त्या मऊ होतात.
हे वाचा - Muscle Pain: हिवाळ्यात शरीराच्या या अवयवांमध्ये होतात सतत वेदना; हे उपाय ठरतील गुणकारी
कणीक प्लास्टिक आवरण किंवा अॅल्युमिनियम फॉइलनं झाकून ठेवावी
तुम्ही जेव्हा कणीक वापरून झाल्यानंतर फ्रिजमध्ये ठेवता, तेव्हा ती हवाबंद डब्यात ठेवा आणि प्लास्टिकच्या आवरणानं किंवा अॅल्युमिनियम फॉइलनं झाकून ठेवा.
(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य गृहितकांवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips