• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • किचनमधल्या प्लास्टिक डब्यांवरचे चिकट डाग कसे काढाल? हे आहेत साधे-सोपे उपाय

किचनमधल्या प्लास्टिक डब्यांवरचे चिकट डाग कसे काढाल? हे आहेत साधे-सोपे उपाय

तेलाचे, लोणच्याचे डाग लागलेले प्लॅस्टिकचे चिकट डबे कसे साफ करायचे हा प्रश्न सतावत असेल तर हे आहेत सोपे उपाय..

  • Share this:
दिल्ली, 23 नोव्हेंबर: हल्ली तुमच्याआमच्या प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात म्हणजेच किचनमध्ये (Kitchen) प्लास्टिकचे कंटेनर (Plastic Container) किंवा जार असतातच. अगदी डाळ-तांदूळ साठवण्यासाठीही हे प्लास्टिकचे साधे जार/डबे वापरले जातात किंवा नॉनस्टिक जारही वापरले जातात. आता किचन म्हटलं, की विविध प्रकारच्या फोडण्या आल्या. अनेकदा काही पदार्थ करताना, फोडणी करताना वगैरे अशा प्लास्टिक कंटेननरवर डाग (Oil Stain) पडतात. हे डाग कसे घालवायचे हा मोठा प्रश्न असतो. हे डबे स्वच्छ (Clean) ठेवायचे असतील, तर ते रोज टिश्यू पेपरनं पुसून घ्यावेत; पण रोज हे काम करणं खरं तर अवघड आहे, कंटाळवाणं आहे. तुमच्याकडच्या प्लास्टिकच्या डब्यांवरही असे डाग पडले असतील, तर ते घालवण्यासाठी काही अगदी सोप्या युक्त्या सांगत आहोत. या ट्रिक्समुळे (Simple Tricks) तुमचा वेळही वाचेल आणि हे डबे स्वच्छही राहतील. असे घालवा हे हट्टी डाग ( How To Remove Oil Stains) 1. बेकिंग सोड्याचा वापर (Baking Soda) एका वाडग्यात बेकिंग सोडा आणि पाणी मिक्स करून त्याची पेस्ट बनवा. कंटेनरवरच्या डागावर ही पेस्ट लावा आणि 30 मिनिटं तशीच ठेवा. अख्खं गावच राहतं Live In मध्ये; लग्नाविनाच एकमेकांबरोबर राहतात जोडपी अर्ध्या तासानं ते पुसून घ्या किंवा धुऊन टाका. कंटेनरवरचा डाग गायब झाल्याचं लक्षात येईल. 2. मिठाचा वापर (Salt) प्लास्टिकच्या डब्यांवर अनेकदा चिकटपणा येतो. मिठाचा वापर करून हे चिकट डाग घालवता येतात. कोमट पाण्यात एक छोटं फडकं भिजवून घ्या आणि त्याला मीठ लावून डागावर घासा. डाग पूर्ण निघेपर्यंत दोन-तीनदा अशाच प्रकारे कापडाने डागावर घासत राहा. 3. हँड सॅनिटायझरचा वापर (Hand Sanitizer) असे चिकट डाग घालवण्यासाठी हँड सॅनिटायझरचा वापरही केला जाऊ शकतो. रबिंग अल्कोहोलही यासाठी उपयुक्त आहे. डाग पडलेल्या ठिकाणी हँड सॅनिटायझर लावा आण दोन मिनिटं तसंच राहू द्या. Health tips : पचनक्रिया चांगली ठेवण्यासाठी द्राक्ष आहे फायदेशीर,संशोधनातून सिद्ध त्यानंतर ते भांडं किंवा डबा स्वच्छ पुसून घ्या. 4. पांढरं (व्हाइट) व्हिनेगार (White Vinegar) एक कप पाण्यात दोन मोठे चमचे पांढरं व्हिनेगार घाला आणि प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये थोडा वेळ ठेवा. त्यानंतर तो डबा किंवा कंटेनर नेहमीसारखं धुऊन घ्या. डाग खूपच चिकट असेल तर व्हिनेगार एक रात्रभर तसंच राहू द्या आणि सकाळी डबा धुऊन घ्या. 5.ॲस्पिरिनचा वापर (Aspirin) आपल्या सगळ्यांना ॲस्पिरिन टॅबलेट माहिती आहे. एरव्ही औषध म्हणून वापरली जाणारी ही गोळी चिकट डाग घालवण्याच्या कामातही उपयोगी पडते. कोमट पाण्यात ॲस्पिरिनची गोळी टाका आणि डाग असलेला डबा किंवा कंटेनर या पाण्यानं पुसून घ्या. उरलेल्या पाण्यात कंटेनर दोन तासांसाठी ठेवून द्या. तुमच्या घरातल्या प्लास्टिकच्या डब्यांवर पडलेले चिकट घालवण्यासाठी हे अगदी घरगुती आणि साधे-सोपे उपाय करून बघा. तुमचे जुने डबेही तुम्हाला अगदी नव्यासारखे वाटतील.
First published: