Kidney stone मुतखड्याचा त्रास असेल तर 'हे' 6 पदार्थ खाणं आजच कमी करा

काही पदार्थांमध्ये ऑक्झिलेटचं प्रमाण जास्त असतं. ते शरीरातल्या कॅल्शियमसोबत मिसळून त्याचे खडे तयार होतात. Kidney Stone चा किंता मुतखड्याचा त्रास असणाऱ्यांनी असे पदार्थ टाळायला हवेत.

News18 Lokmat | Updated On: Jul 29, 2019 09:00 PM IST

Kidney stone मुतखड्याचा त्रास असेल तर 'हे' 6 पदार्थ खाणं आजच कमी करा

पालक आणि भेंडी या भांज्यांमध्ये ऑक्झिलेट या घटकाचं प्रमाण जास्त असतं. हे ऑक्झिलेट शरीरातल्या कॅल्शियमला एकत्रित करतं आणि मूत्रामार्गे बाहेर पडण्यास त्रास होतो. किडनीमध्ये हळूहळू कॅल्शियमचे खडे तयार होतात.

चहा सगळ्यांनाच आवडतो. मात्र, चहा मुतखडा होण्यासाठी एक मुख्य कारण होऊ शकतं. जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास असेल तर, चहा पिणं तुमच्यासाठी धोकादायक आहे. त्याचं कारण असं की, चहा प्यायल्याने खड्याचा आकार अधिक वाढायला लागते. त्यामुळे चहा पिणं वेळीच थांबवा.

जेवणामध्ये टोमॅटोचा वापर टाळणं शक्यच नाही. सॅलडमध्ये, भेळेतही त्याचा वापर आवर्जून होतो. पण, टोमॅटोमध्येही ऑक्झिलेटचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे मुतखड्यांचा त्रास होऊ शकतो.

मीठाशिवाय जेवण परिपूर्ण होत नाही. मीठानेच जेवणाला चव येते. पण, काही जण मीठाचा जास्त वापर करतात. एवढचं नाही तर, ताटातही मीठ घेऊन पदार्थावर जास्तीचं मीठ टाकून घेतात. हे अतिशय हानिकारक आहे. त्यामध्ये असणारं सोडियम शरीरात गेल्यावर कॅल्शियममध्ये रुपांतरीत होतं आणि त्याचे खडे होण्यास सुरुवात होते.

मांसाहारी खाण्याचे अनेक फायदे आहेत. शरीराला ते उपयुक्तही आहे. त्याचप्रमाणे त्याचा एक दुष्परिणाम हा आहे की, त्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण अधिक असतं. जे किडनीमध्ये प्युरीनची मात्रा वाढवतं. प्युरीनचं प्रमाण वाढल्याने युरिक अॅसिडमध्येही वाढ होऊन किडनी स्टोन म्हणजेच मुतखड्याचा त्रास सुरु होतो. त्यामुळे मांसाहार करणाऱ्या लोकांनी ते प्रमाणात खावं.

Loading...

बीट हे अनेक पोषक घटकांनी युक्त असून त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिवापर हा वाईटचं असतो. तसंच काहीसं बीट खाल्ल्याने होतं. तुम्ही जास्त प्रमाणात बीट खात असाल तर, तुम्हाला मुतखड्याची समस्या होऊ शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 29, 2019 09:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...