मुंबई, 04 जुलै : मानवी शरीरात किडनी खूप महत्त्वाची आहे. किडनीमुळे आपले रक्त स्वच्छ होते आणि शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात. पण, मधुमेहाच्या आजाराने किडनी खराब होऊ शकते. किडनीचे नुकसान टाळण्यासाठी रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
मधुमेहामुळे मूत्रपिंडाचे नुकसान कसे होते?
जर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणाबाहेर गेली तर हळूहळू किडनीमध्ये असलेल्या रक्तवाहिन्यांचा समूह खराब (ग्रुप ऑफ ब्लड वेसेल्स) होतो. जेव्हा या रक्तवाहिन्या कमकुवत होऊ लागतात, तेव्हा मूत्रपिंड योग्यरित्या रक्त स्वच्छ करू शकत नाही. त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या सुरू होते आणि किडनीही खराब होऊ शकते.
किडनी वाचवण्यासाठी साखरेची पातळी नियंत्रित ठेवा
आरोग्य तज्ज्ञांच्या मते किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णाने साखर नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी आपण आपल्या जीवनशैलीत अनेक बदल घडवून आणले पाहिजेत, जसे की-
- खाण्या-पिण्याची विशेष काळजी घेणे.
- राग नियंत्रणात ठेवा.
- ताण-तणाव घेऊ नका.
-नियमित व्यायाम करा.
- रोज योगासने करा.
जर तुम्हाला रक्तदाबाची समस्या असेल तर ती नियंत्रणात ठेवा
खूप दिवसांपासून पोट दुखत असेल तर सोनोग्राफी टेस्ट आणि IgA नेफ्रोपॅथी टेस्ट करून घ्या.
हे वाचा -
पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार
अशा पदार्थांपासून लांब रहा -
जास्त मीठ खाऊ नका.
जास्त पोटॅशियम असलेल्या भाज्या अतिप्रमाणात खाऊ नका. (उदा. बटाटा, टोमॅटो, किवी, संत्रा, एवोकॅडो)
दूध, दही, चीज असे पदार्थदेखील मर्यादित प्रमाणात खा. कारण त्यात फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते.
बाहेरील पाकिटबंद वस्तूंचे सेवन करू नका.
लोणची, सुके मासे आणि शीतपेयांचे जास्त सेवन करू नका.
हे वाचा -
Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.