2010 मध्ये पाचवीच्या मुलानं केलेली 2020 ची भविष्यवाणी ठरली खरी; तो PHOTO VIRAL

10 वर्षांपूर्वी शाळेकडून प्रसिद्ध झालेल्या एका पुस्तकात या मुलानं जी प्रतिक्रिया दिली होती, ती आता व्हायरल होऊ लागली आहे.

10 वर्षांपूर्वी शाळेकडून प्रसिद्ध झालेल्या एका पुस्तकात या मुलानं जी प्रतिक्रिया दिली होती, ती आता व्हायरल होऊ लागली आहे.

  • Share this:
मुंबई, 29 डिसेंबर : 2020 हे वर्ष सर्वांना कायम लक्षात राहिल. कारण या वर्षातल्या घडामोडी होत्याच तशा. सगळं जग बंद झालं होतं या वर्षात. कोरोना महासाथ (Corona Pandemic) आली आणि नंतर सगळं चित्रच पालटत गेलं. सगळीकडे लॉकडाउन (Lockdown) होत गेलं आणि महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी ठप्प झाल्या. प्रत्येक जण कोरोना प्रतिबंधक लशीची (Vaccine) वाट पाहतो आहे. असं असताना 2020 हे वर्ष लक्षात राहिलं नाही, तरच नवल. अशा स्थितीत 10 वर्षांपूर्वीच कोणी या सगळ्या परिस्थितीचे संकेत दिले असल्याचं कळलं तर? हो! तसंच घडलं आहे केव्हिन सिंग (Kevin Singh) नावाच्या एका व्यक्तीबाबत. मोठा माणूस नाही तर एक कॉलेजमधील मुलगा. 10 वर्षांपूर्वी तो जेव्हा पाचवीत होता, त्यावेळी शाळेकडून प्रसिद्ध झालेल्या एका पुस्तकात त्याच्या दोन ओळी प्रसिद्ध झाल्या होत्या. त्या ओळी असलेला फोटो आता व्हायरल होतो आहे आणि याचं कारण म्हणजे त्या ओळी होत्या 2020 या वर्षाबद्दलच्या. त्यात केव्हिनने म्हटलं होतं की,  "2020 या वर्षासाठी माझी भविष्यवाणी अशी आहे, की या वर्षात सगळे जण शांततेने राहतील आणि तेव्हाच्या प्रत्येक रोगावर उपचार शोधून काढतील" 'फ्रीझिंग कोल्ड टेक्स' (Freezing Cold Takes) नावाच्या एका ट्विटर पेजवर (Twitter) त्या पुस्तकातल्या त्या भविष्यवाणीचा फोटो 24 डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला. त्यानंतर तो भलताच व्हायरल झाला. 70 हजारांहून अधिक जणांनी तो फोटो लाइक केला असून, सुमारे आठ हजार जणांनी तो रिट्वीट केला आहे. स्टीव्हन रिव्हेरा नावाच्या दुसऱ्या एका मुलाच्या भविष्यवाणीचाही फोटो त्यात आहे. नवभारत टाइम्सने त्याबद्दलचं वृत्त दिलं आहे. हे वाचा - बापरे! महासागरांचा जलस्तर वाढण्याचा धोका, पण या समुद्राबाबत आली धक्कादायक माहिती केव्हिनच्या भविष्यवाणीचा हा फोटो खुद्द केव्हिन सिंगने स्वतःही रिट्वीट केला आहे. वेगळ्या अर्थाने केलेल्या या भविष्यवाणीचा सध्याच्या स्थितीनुसार वेगळाच अर्थ निघत असल्याने हा फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Viral) झाला असावा. केव्हिनने त्या वेळच्या या भविष्यवाणीबद्दल 'सॉरी'ही म्हटलं आहे. अर्थात लोकांनी या योगायोगाची खूप मजा घेतली एवढं खरं. हे वाचा -  9 वी पास मुलानं भारतीय जुगाड करत बनवली भन्नाट बाईक एकंदरीत 2020 या वर्षाबद्दल पूर्वी जे काही बोललं गेलं होतं आणि ज्या काही नोंदी होत्या, त्या लोकांनी या वर्षाच्या संदर्भाने जुळवून पाहायचा प्रयत्न केला. याआधीही असं अनेकदा झालं होतं. या प्रकरणात मात्र भविष्यवाणी वर्तवणारा मुलगा पाचवीत असल्यामुळे त्याची गोष्ट लोकांना अधिक भावली आणि अधिकाधिक लोकांनी ती शेअर केली असावी.
Published by:Priya Lad
First published: