नवी दिल्ली, 27 डिसेंबर : आजच्या जीवनशैलीत जवळपास प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या तणावाशी झुंजत आहे. दीर्घकाळ तणाव (Stress) कायम राहिल्याने नैराश्य येते. त्यामुळे अनेक प्रकारचे मानसिक आजार शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे नैराश्याच्या (Depression) स्थितीवर वेळीच मात करणे चांगले. युकेमध्ये नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की केटामाइन थेरपीमुळे (Ketamine Therapy) नैराश्य आणि आत्महत्येच्या विचारांची (suicidal thoughts) लक्षणे झपाट्याने कमी होतात. एक्सेटर विद्यापीठाच्या (University of Exeter) शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासादरम्यान, यापूर्वी प्रकाशित झालेल्या 83 शोधनिबंधांमधून पुरावे गोळा करण्यात आले. यादरम्यान, गंभीर नैराश्यामध्ये (severe depression) केटामाइन थेरपीच्या परिणामकारकतेचे भक्कम (Ketamine Therapy Reduces Depression Rapidly) पुरावे मिळाले.
अभ्यासात असे आढळून आले की, पहिल्या उपचारानंतर नैराश्य किंवा आत्महत्येच्या विचारांची लक्षणे एक ते चार तासांत कमी होतात आणि त्याचा प्रभाव दोन आठवडे टिकतो. काही पुराव्यातून असे दिसून आले आहे की, ही थेरपी दोनदा केल्याने त्याचा प्रभाव दीर्घ कालावधीसाठी राखला जाऊ शकतो. तथापि, परिणाम किती काळ टिकेल याबद्दल अधिक दर्जेदार संशोधन आवश्यक आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष 'ब्रिटिश जर्नल ऑफ सायकियाट्री ओपन'मध्ये प्रसिद्ध झाले आहेत.
हे वाचा - Reduce Belly Fat: सुटलेलं पोट म्हणजे अनेक आजारांना निमंत्रण; हे घरगुती उपाय करून रहाल फिट
तज्ज्ञ काय म्हणतात
एक्सेटर विद्यापीठातील या अभ्यासाचे मुख्य लेखक मर्वे मोल्लाहमेटोग्लू यांच्या मते, 'आम्ही आमच्या अभ्यासात केटामाइनच्या उपचारात्मक प्रभावाबाबत आतापर्यंतचे सर्वात व्यापक पुनरावलोकन केले आहे. आमच्या संशोधनाचे निष्कर्ष असे सुचवतात की, केटामाइन थेरपीमुळे नैराश्य आणि आत्महत्येचे विचार वेगाने कमी होतात.
हे वाचा - थंडीच्या दिवसात Heart Attack चा धोका अधिक; व्यायाम करताना या गोष्टींची खबरदारी घ्या
त्यांनी सांगितले की, अभ्यासाचे निष्कर्ष या अर्थाने महत्त्वाचे आहेत की, केटामाइन केवळ नैराश्य आणि आत्महत्येच्या विचारांपासून त्वरित बरे होण्यास मदत करत नाही तर पीडित व्यक्तीचे संरक्षणही होते . केटामाइन थेरपी मनोविकारांमध्ये देखील फायदेशीर आहे. जसे की अस्वस्थता, एखाद्या आघातानंतरचा ताण आणि एखाद्या घटनेमुळे वेड लागणे. परंतु, या थेरपीसाठी योग्य मार्गदर्शक तत्त्वे आणि मानक प्रक्रिया निश्चित करणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips