लग्न होईना म्हणून फिल्मी स्टाइल 'बदला'; वैतागलेल्या तरुणाने शेजाऱ्याच्या दुकानावर JCB चढवला

लग्न होईना म्हणून फिल्मी स्टाइल 'बदला'; वैतागलेल्या तरुणाने शेजाऱ्याच्या दुकानावर JCB चढवला

आपल्या लग्नात (Wedding) आपला शेजारी अडचण निर्माण करत असल्याचा आरोप या तरुणानं केला आहे.

  • Share this:

कन्नूर, 28 ऑक्टोबर : लग्नाबाबत (wedding) प्रत्येकाची काही स्वप्नं असतात. आपल्याला चांगला जोडीदार मिळावा, आपलं थाटात लग्न व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. लग्नाचं वय झालं की आपल्यालाही लग्नाची आस लागते आणि मग आपणच आपला जोडीदार शोधू लागतो. अनेकदा लग्नासाठी समोरून मागण्या येतात मात्र काही कारणांमुळे लग्न होत नाही. असे कित्येक तरुण-तरुणी आहेत ज्यांचं काही ना काही कारणांमुळे लग्न जमत नाही. मात्र लग्न न जमण्याचं कारण एखादी व्यक्ती असेल तर मग लग्न न जमणाऱ्या व्यक्तीच्या मनात त्या व्यक्तीबाबत सुडाची भावना निर्माण होते.

आपलं लग्न होत नाही म्हणून वाट्टेल त्या मार्गाने बदला घेतला जातो हे आपण फिल्ममध्ये पाहत आलोच आहे. मात्र केरळमधील  (Kerala) एका तरुणाने ते प्रत्यक्षात केलं आहे. लग्न होत नसल्याने वैतागलेल्या या तरुणाने थेट शेजाऱ्याच्या दुकानावरच बुल्डोझर चढवला आहे. कन्नूरमध्ये (Kannur) ही घटना घडली आहे.

30 वर्षांचा अल्बिन मॅथ्यूने आपला शेजारी सोजीचं दुकान तोडलं आहे. परिसरातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार अल्बिन आणि सोजी दोघंही शेजारी आहेत. मात्र त्यांच्यामध्ये नेहमी भांडणं होतात. दोघांमध्येही चांगले संबंध नाहीत.

हे वाचा - गर्लफ्रेंडच्या हत्येच्या आरोपात आजन्म कारावास; जेलमधूनच कमवतोय वर्षाला 8 लाख

अल्बिनने आपल्या सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला होता. ज्यामध्ये त्याने सोजीच्या दुकानात अवैध धंदे चालत असल्याचा आरोप केला होता. सोजीच्या दुकाना जुगार आणि दारू विक्री केली जाते, असं अल्बिननं सांगितलं. यामुळे परिसरातील नागरिकांना त्रासही होतो. याबाबत आपण वारंवार पोलीस गावातील अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. मात्र ना पोलिसांनी कारवाई केली ना गावातील अधिकाऱ्यांनी. त्यामुळे आपणच कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचं अल्बिननं सांगितलं.

हे वाचा - अरे हा येडा की खुळा? यूट्यूबरने जाळली 1.10 कोटींची मर्सिडीज; पाहा VIDEO

अल्बिननं याच व्हिडीओत सोजी आपल्या लग्नात अडथळा ठरत असल्याचं सांगतिलं. आपल्या लग्नासाठी आलेल्या मागण्यांमध्ये तो अडचण निर्माण करत होता. ज्यामुळे त्याचं लग्न जमत नव्हतं. त्यामुळे वैतागलेला अल्बिनने सोजीचा बदला घ्यायचा ठरवलं. तो सोजीच्या दुकानाजवळ बुल्डोजर घेऊन पोहोचला आणि बुल्डोजर थेट दुकानावरच चढवला. त्यानं सोजीचं दुकान पाडलं. या दुकानामुळे लग्न जमत नव्हतं म्हणून त्याने फिल्मी स्टाईल बदला घेतला. पोलिसांनी अल्बिनवर कारवाई केली आहे.

Published by: Priya Lad
First published: October 28, 2020, 4:49 PM IST

ताज्या बातम्या