Home /News /lifestyle /

18 कोटींचं औषध लागणाऱ्या SMA ग्रस्त चिमुकल्याच्या पालकांना मोठा दिलासा; आजाराला प्रतिबंध करण्याचा मार्ग सापडला

18 कोटींचं औषध लागणाऱ्या SMA ग्रस्त चिमुकल्याच्या पालकांना मोठा दिलासा; आजाराला प्रतिबंध करण्याचा मार्ग सापडला

मिसकॅरेज, , प्रिक्लेम्पसिया आणि वेळेआधी डिलीव्हरी या सगळ्या गोष्टी महिलेच्या इम्युन रिस्पॉन्सने ठरतात. तर, पार्टनरचे स्पर्म देखील याला कारणीभूत असतात.

मिसकॅरेज, , प्रिक्लेम्पसिया आणि वेळेआधी डिलीव्हरी या सगळ्या गोष्टी महिलेच्या इम्युन रिस्पॉन्सने ठरतात. तर, पार्टनरचे स्पर्म देखील याला कारणीभूत असतात.

SMA हा दुर्मिळ आनुवंशिक आजार आहे. त्यामुळे आता उपचार झाले तरी पुढील पिढीला त्याचा धोका आहेच.

    कोची, 15 जुलै : महाराष्ट्राची तीरा कामत , वेदिका शिंदे, हैदराबादमधील अयांश गुप्ता आणि आता केरळमधील अरिफ... यांच्यासारखी कितीतरी चिमुकली स्पायनल मस्क्युलर एट्रोफी (Spinal Muscular Atrophy) या दुर्मिळ आजाराशी लढा देत आहे.  SMA या आजारावर फक्त एकमेव औषध आहे, जे जगातील सर्वात महागडं औषध आहे. ज्याची किंमत तब्बल 18 कोटी रुपये आहे. किती तरी पालकांना उपचारांचा हा खर्च परवडणारा नसतो आणि मग आपल्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरू होते. क्राऊड फंडिंगच्या माध्यमातून पैसा जमा केला जातो. पण इतका खर्च करूनही काही फायदा नाही. कुटुंबातील पुढील पिढीला या आजाराचा धोका असतोच कारण हा आनुवंशिक आजार आहे. पण आता या आजाराला रोखण्याचा मार्ग सापडला आहे, केरळच्या क्राफ्ट हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरने SMA आजाराला प्रतिबंध करण्याचा मार्ग शोधला आहे.  रुग्णालयाने तीन प्रेग्नन्सीचा अभ्यास केला. कपलला प्रिइम्पलेमेंटेशन जेनेटिक टेस्ट अंतर्गत त्यांच्या SMA हिस्ट्रीचं निदान होतं. त्यानंतर त्यांना IVF PGT-M ट्रिटमेंटमार्फत येणाऱ्या बाळाला या आजारापासून पूर्णपणे मुक्त आणि निरोगी केलं जातं. ज्यामुळे पुढे येणारी पिढीसुद्धा एसएमएमुक्त राहू शकते. हे वाचा - भारतात वाढतायत ‘हे’ तीन गंभीर आजार, कोरोनासोबत याकडेही ठेवा लक्ष रिपोर्टनुसार क्राफ्ट हॉस्पिटलचे डॉ. नौसिन मजैद यांनी सांगितलं, SMA आजारामुळे किती तरी मुलांचा मृत्यू होतो. या आजारावरील औषधही अनेकांना परवडण्यासारखं नाही. त्यामुळे योग्य तंत्रज्ञान आणि पद्धतीने या आनुवंशिक आजाराचं समूळ उच्चाटन करणं ही आमची जबाबदारी आहे, असं आम्ही समजतो. जेणेकरून पुढे जाऊन या कुटुंबावर आपल्या मुलांना बरं करण्यासाठी अशा महागड्या औषधांच्या खर्चाचं ओझं नसेल.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Kerala

    पुढील बातम्या