महिला पोलीस ऑफिसरने केलेलं टक्कल पाहून अनुष्का शर्मा झाली चाहती, तुम्हीही कराल कौतुक

महिला पोलीस ऑफिसरने केलेलं टक्कल पाहून अनुष्का शर्मा झाली चाहती, तुम्हीही कराल कौतुक

महिला पोलीस अधिकारीने तिचे केस कापले.. फक्त कापलेच नाहीत तर पूर्ण टक्कल केलं. याच कामासाठी त्यांचं भरभरून कौतुक केलं जात आहे.

  • Share this:

केरळमधील एका महिला पोलीस अधिकाऱ्याचं भरभरून कौतुक केलं जात आहे. याचं कारणंही खास आहे. महिला पोलीस अधिकारीने तिचे केस कापले.. फक्त कापलेच नाहीत तर पूर्ण टक्कल केलं. तिच्या टक्कल केल्याचं कौतुक देशभरात केलं जात आहे. केरळमधील त्रिशूर जिल्ह्यातील इरिनजालकुडा येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी अपर्णा लवकुमार यांनी कर्करोगग्रस्त पीडितांसाठी टक्कल केलं. याच कामासाठी त्यांचं भरभरून कौतुक केलं जात आहे. विशेष म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्रामवर अपर्णा यांचा फोटो शेअर करत हार्टचं इमोजी टाकून तिला पाठिंबा दिला.

द न्यूज मिनिटने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी अपर्णा लवकुमार यांनी कर्करोग पीडितांसाठी विग तयार करता यावं यासाठी त्यांचे गुडघ्यापर्यंत लांब असणारे केस कापले. 46 वर्षीय अपर्णा म्हणाल्या की,  पाचवी इयत्तेत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीला त्या भेटल्या. ती मुलगी कर्करोगाशी लढत होती. तिला भेटल्यानंतरच त्यांनी केस दान करण्याचा निर्णय घेतला. त्या म्हणाल्या की, 'अशा मुलांना केस नसण्यामुळे अनेकदा चिडवलं जातं. आजार आणि उपचारांसंदर्भातील मुद्द्यांशिवाय अनेक लोक त्यांच्याकडे निरखून पाहत असतात. त्यांना सर्वसामान्यांप्रमाणे वागवलं जात नाही.'

हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना त्या म्हणाल्या की, 'मी जे काम केलं ते फारच लहान आहे. एक- दोन वर्षात माझे केस येतील. खरंतर कौतुक त्यांचं झालं पाहिजे जे गरजूंसाठी अवयव दान करतात.'

Congo Fever: या आजाराने झाला होता तिघांचा मृत्यू, जाणून घ्या याची लक्षणं

फ्लर्ट करण्यात या राशींच्या मुली असतात Expert, मुलांना वाटतं आहे प्रेम

दररोज फक्त 5 मिनिटं योग करण्याचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

Wax करताना या गोष्टींकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका...

VIDEO: शरद पवार ईडी कार्यालयात जाण्याआधी जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: lifestyle
First Published: Sep 27, 2019 12:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading